लग्न म्हणजे...
आयुष्याच्या एका टप्प्यावर कुणाची तरी साथ हवीशी वाटते...(तात्यासारखा "बाई-बाटली'त न गुंतणारा एखादाच!)
निर्णय कसा घ्यायचा, हे मात्र ठरलेलं नसतं.
"अमक्याची तमकी लग्नाची आहे...' कुणीतरी सुचवतं. "तमका तुला अगदी शोभून दिसेल हो!' भोचक शेजारीण काकू मध्येच नाक खुपसतात.
प्रत्यक्ष निर्णय आपल्यालाच घ्यायचा असतो.
आमची शाळा
ब्लॉगिंगचे वेड हे आता सर्वत्र पसरत आहे. नुकतेच ऐकले, की मी ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेचीही अनुदिनी आहे.
त्यामध्ये शाळेतील विद्यार्थी-शिक्षकांनी आपले लेख व कविता दिलेल्या आहेत.
आमच्या मुंबईतील दहिसरगावचे (आता ते गाव राहिले नाही) हे पहिले हायस्कूल, विद्या प्रसारक मंडळाचे दहिसर विद्या मंदीर.
मुलभुत व बाळबोध
मला एक अतिशय मुलभुत व बाळबोध असा प्रश्ण विचारायचा आहे..
आज प्रत्येक राजकिय पक्ष असे म्हणत असतात कि आमचि फुले डॉ.बाबा साहेब आंबेडकर व शाहु महाराजांच्या विचारांशि बांधिलकी आहे..व आमचि त्या नुसार तशीच वाटचाल चालु आहे..मला व सा~यांना कुणी जाणकार समजावुन सांगु शकेला का..कि हे नेमके विचार काय आहेत..आजच्या काळातहि ते उपयुक्त आहेत का? व खरच राजकिय नेते त्या विचारा प्रमाणे वागतात का?
पराच्या राज्याची भेट
शीर्षक वाचून चमकू नका! क्रांतिबै बालकविता आणि ती पण जनातलं मनातलंमध्ये लिहितेय, झालंय काय तिला? असा विचारही करू नका! ही वार्ता आहे माझ्या अगदी अचानक झालेल्या पराच्या [मिपावरील परिकथेतील राजकुमाराच्या]राज्याच्या धावत्या भेटीची!
[प-यांच राज्य पराच्या राज्याच्या समोर आहे. म्हंजे सौन्दर्य संवर्धन/संगोपन केन्द्र, शुद्ध मराठीत ब्युटी पार्लर!]
त्याचं असं झालं, लेकीची तब्येत ऐन परीक्षेच्या सुरुवातीला बिघडली. इकडे मायचा जीव खालीवर! शेवटी पुण्याला जाऊन प्रत्यक्ष लेकीला भेटून यायचं ठरवलं.
भारतीय रेल्वे आणि लालु यादव.
आताच एका काथ्याकुटाच्या निमित्ताने लालु यादव आणि भारतीय रेल्वेविषयी चर्चा वाचनात आली. भारतीय रेल्वे फायद्यात आणल्यामुळे लालु यादवना बरीच प्रसिद्धी मिळाली असली, तरी बर्याच लोकांमध्ये रेल्वेने नक्कि कोणती धोरणं बदलली आणि कशी ? याविषयी अनभिज्ञता दिसली.
एकम् सत्
अमेरिकेत हा मौसम पदवीदान समारंभाचा आहे. मिडलस्कूल (सातवी), हायस्कूल (१२वी) पासून ते बॅचलर्स आणि इतर उच्चशिक्षणाच्या पदवीदान समारंभास येथे शाळा, विश्वविद्यालये, पालक, शिक्षक, आणि विद्यार्थी सर्वच महत्व देतात. त्या समारंभानंतर होणार्या पार्ट्या आणि त्या समारंभात मिळणारा एखाद्या माननीय पाहुण्याकडून मिळणारा उपदेश हा अतिशय मनापासून ऐकत, कधी कधी त्या पाहुण्याच्या राजकीय/सामाजीक विचारांमुळे धुडकावत, पण त्याला त्या त्यावेळेचे आणि त्या त्या स्थानामधे अनन्यसाधारण महत्व दिले जाते. तो पर्यंत झालेला सर्व त्रास हा मुले आणि पालक विसरून जातात...
कळ्या
तुझी आठवण कधी
पाउल न वाजवता येते,
कधी थैमान घालते तर
कधी कळ्या फुलवते येथे.
जेवणा..शा
माझी प्रेरणा कारुण्याशा... http://misalpav.com/node/7791
एका वरण भाताच्या थाळीसमोरचा तो मत्त भुकेला
चॅपॅक चॅपॅक जिभल्या चाटीत भुरके मारी
भुर्र भुर्र भुर्र भुर्र
लोणच्याच्या फोडीच्या तहवैभवाने टाकलेले गारूड
अन तोंडात डाविकडून उजविकडे खळाळणारा अन्नप्रवाह
चॅपॅक चॅपॅक चॅपॅक चॅपॅक
भाताच्या दलदलीत ओरपणारा स्निग्ध हात
गुलगुलीत स्पर्षाने आणि सात्वीक चवीन जिवाचा खुळखुळा
खुळा रे खुळा, खुळा रे खुळा...
एका जेवणपानावरून पुनश्व हरि ओम
क्षीण नळाखाली अनुमानात कडाडबूम मेघवर्षा
धो धो धो...
अन मग सारंच शांत..
पुढच्या जेवणपानापर्यंत...
Taxonomy upgrade extras
एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा
आजच्या जीवनात सर्वानाच वाढत्या वजनाची काळजी लागलेली असते. वजन ही अशी गोष्ट आहे की जी वाढताना कळत नाही. पण उतरवताना खिशासहीत सगळेच हलके करते.
मी एक अनुभव घेतलेला आहे त्यामुळे वजन एका रात्रीत ( म्हणजे "ओव्हरनाईट" उगाच अपसमज नकोत) दोन ते अडीच किलोने कमी होउ शकते.
कोणतेही विनोदी व्यायाम प्रकार न करता / कोणतेही महाग औषधोपचार न करता वजन दोन ते अडीच किलोने कमी करणे शक्य आहे का?
अनुभवान्ती म्हणेन हे सहज शक्य आहे.
कसे?...... किती जणाना हे माहित करुन घ्यायचे आहे? ...................................................................
मिसळपाव