२६ जानेवारी २००८. प्रजासत्ताक दिनी कॅप्टन सुनील चौधरी यांना सेना पदक (शौर्य) देण्यात आले.आसामच्या तिनसुखीया जिल्ह्यातील उल्फा दहशतवाद्यांविरुद्ध त्यांनी गाजविलेल्या मर्दुमकीचा सन्मान सेना पदक देऊन करण्यात आला.
दुसर्याच दिवशी म्हणजे दि. २७ जानेवारी २००८ रोजी गुप्तचरांकडून पक्की खबर मिळाली की रंगगढ नावाच्या खेड्यात ७-८ उल्फा दहशतवादी एका घरात लपून बसले आहेत. कॅप्टन चौधरी लगेचच आपल्या सहकार्यांबरोबर त्या खेड्याकडे रवाना झाले. ज्या घरामधे दहशतवादी लपले होते त्या घराभोवती वेढा घालायला त्यांनी सुरूवात केली.
दहशतवाद्यांना याची कुणकुण लागताच ते अंदाधुंद गोळीबार करत घराबाहेर पडले आणि जवळच्या दाट झाडीत लपण्यासाठी पळू लागले. कॅप्टन सुनील चौधरी यांनी तत्काळ गोळीबार करत त्यांचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. त्यांनी एका दहशतवाद्याला ठार केले. दुसर्याला जखमी केले. त्या जखमी दहशतवाद्याने झाडलेली एक गोळी कॅप्टन चौधरी यांच्या छातीत घुसली. तशाही स्थितीत तिसर्या दहशतवाद्याला ते सामोरे गेले. दोघांनी एकमेकावर प्रचंड गोळीबार केला. कमालीचे शौर्य दाखवत कॅप्टन चौधरींनी तिसर्या दहशतवाद्याला सुद्धा कंठस्नान घातले. पण समोरासमोर झालेल्या धुमश्चक्रीत कॅप्टन सुनील चौधरी जबर जखमी झालेले होते.
अतुलनीय शौर्य दाखवून कॅप्टन सुनील चौधरी यांनी देशासाठी आपले प्राण वेचले. त्यांना मरणोत्तर किर्ती चक्र देण्यात आले.
स्व.कॅप्टन सुनील चौधरी यांच्या वडिलांना वाटलं की आपल्या मुलाचा अधिक सन्मान करता आला असता का? त्यांनी सेना अधिकार्यांना एक पत्र पाठवलं. आणि माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली. त्यावर सेनेकडून त्यांना लेखी कळवलं गेलं की तुम्ही भारतीय आहात हे आधी सिद्ध करा. तुमचं राष्ट्रीयत्व सिद्ध करा.
कॅप्टन सुनील चौधरींचे वडील सेनेत लेफ्टनंट कर्नल आहेत. ते अजूनही सेवेत आहेत. भारतीय सेनेत लेफ्टनंट कर्नल या हुद्द्यावर असलेल्या, देशासाठी प्राण वेचलेल्या एका हुतात्म्याच्या वडिलांना सांगितलं जातंय की माहिती हवी असेल तर आधी राष्ट्रीयत्व सिद्ध करा म्हणून.....
या संदर्भातील व्हिडिओ इथे पहा.
ही नोकरशाही म्हणा, बाबूगीरी म्हणा, कारकुनी फराटा म्हणा, की लाल फितीचा कारभार , तुमच्याकडे असे काही अनुभव असतील,तर कृपया लिहा.
वाचने
2853
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
हुह !
+१
In reply to हुह ! by परिकथेतील राजकुमार
अत्यंत चुकीचे आहे
असेच म्हणतो
In reply to अत्यंत चुकीचे आहे by वेताळ
सुनीलसारखे शहीद ज्या देशात आहेत त्या भारताचा
सहमत.
In reply to सुनीलसारखे शहीद ज्या देशात आहेत त्या भारताचा by चतुरंग
खुपच वाईट.
लाज वाटते . .
२६/११ हल्ल्यात शहीद झालेले