राजमा
सहित्य -
राजमा १ वाटी (कॅन असतील तर १५ oz चे २ )
२ लहान कांदे - बारिक चिरलेले
१ टोमॅटो- बारिक चिरलेला
१ चमचा धने-जीरे पावडर
अर्धा चमचा गरम मसाला
१ चमचा तिखट
१ चमचा आल-लसूण पेस्ट
पाउण वाटी आंबट दही
चवीनुसार मीठ
२ मोठे चमचे तेल
बारीक कापलेली कोथिंबीर
फोडणीचे साहित्यः- मोहरी, जिरे, हिंग, हळद,
१) राजमा अधल्या दिवशी भिजत घालावा (कॅन असतील तर ही स्टेप टाळावी हे सांगण्याची गरज नाही)
२) राजमा दु प्पट पाणी घालून कुकरमध्ये उकडून घ्यावा
३) कढईमध्ये तेल गरम करुन मोहरी, जिरे घालावे
४) बारिक चिरलेला कांदा फोडणीत टाकावा, गुलाबी होईस्तोवर परतावा, आल-लसूण पेस्ट, गरम मसाला, तिखट, धने-जीरे पावडर, हळद घालून खमंग परतावे. नंतर त्यात दही घालावे व नीट मीक्स करावे. शेवटी टोमॅटो घालून परत खमंग परतावे.
५) तेल बाजूला सुटले की राजमा घालावा. गरजेनुसार पाणी व मीठ घालावे. १० मिनीटे मंद गॅसवर उकळू द्यावे. कापलेली कोथिंबीर टाकून सजवावे.
टीप - राजमा आंबट चांगला लागतो. दही आंबट नसल्यास १ चमचा आमचूर पावडर टाकावी.


वाचने
5843
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
छान
छान आहे तुझी रेसिपी
राजमा
In reply to राजमा by केळ्या
छान
तात्यांचे
In reply to तात्यांचे by विसोबा खेचर
असेच म्हणतो!
In reply to असेच म्हणतो! by ब्रिटिश टिंग्या
पुनर्जन्म
In reply to पुनर्जन्म by अवलिया
ह्म्म्म!
In reply to ह्म्म्म! by ब्रिटिश टिंग्या
परमेश्वरा
मस्तच
मस्त फोटो.
:)
धन्यवाद!
छान