मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही ग्राफिटीज्

राज-निती · · जनातलं, मनातलं
ससा 'भित्रा' पण शर्यतीत आरंभ 'शूर'. कधी कधी संशयाची पाल चुकचुकत नाही, तेव्हां जास्तच संशय येतो. 'चिरतारूण्याचे' रहस्य 'म्हातारपणात' असतं.

वाचने 3335 वाचनखूण प्रतिक्रिया 15

लक्ष्मणसुत 23/02/2009 - 17:51
बाबा तुझी गराफिटी लै भारी ब्वॉ. लक्ष्मणसुत

ब्रिटिश टिंग्या 23/02/2009 - 18:07
सही आहेत! :)

हेरंब 24/02/2009 - 08:41
वाहते ती अक्कल राहते ती बुद्धी !

In reply to by JayGanesh

राज-निती 25/02/2009 - 19:50
जय गणेश, आपला अभिप्राय इतरांपेक्षा वेगळा आहे. पण खरं सांगू का, कुणालाही आपल्या मराठीचं असं 'वेड' लागलेलं केव्हाही चांगलच. त्याच कारण म्हणजे 'शहाण्या' माणसालाच चांगल 'वेड' लागू शकतं.

JayGanesh 24/02/2009 - 08:53
आणखी एक.... ''काळ्या म्हशीने पोंड्स पावडर लावु नये.''

In reply to by JayGanesh

नरेश_ 25/02/2009 - 20:00
ब्यूटी -पार्लर मध्ये तर आजाबात जाऊ नये !!! सही /- आगरी बोली - आगरी बाना.

In reply to by नरेश_

लक्ष्मणसुत 25/02/2009 - 20:08
ब्यूटी -पार्लरचा आपला काय अनुभव आहे? आम्हालाबी सांगाना राव. लक्ष्मणसुत उवाच्

दत्ता काळे 24/02/2009 - 10:34
लई बहारी. मलापण एक सुचलीये, ती अशी : एकत्र नांदलेल्यांचे कालांतराने मार्ग भिन्न होतात - चकणा पोटातच राहतो आणि . . . दारू डोक्यात जाते.

In reply to by दत्ता काळे

छोटा डॉन 25/02/2009 - 20:05
झक्कास , चालु द्यात ..! ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती 25/02/2009 - 21:05
डानरावांची सोडून बाकी सगळ्या ग्राफिट्या (बघा शोधला की नाही मराठी शब्द!) आवडल्या. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

नितीनमहाजन 26/02/2009 - 10:44
सरळ मार्गी माणसाला लहानपणी चांगले वळण लागलेले असते. नितीन