श्रीलंका सरकारचे अभिनंदन !!
लिट्टेचा सर्वेसर्वा प्रभाकरनला ठार करून श्रीलंकेच्या सैन्याने जो दैदिप्यमान विजय मिळविला आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक
अभिनंदन! प्रभाकरनसारख्या क्रूरकर्म्याचा अंत करून महिन्द्र राजपक्षे व सनथ फोन्सेका यांनी संपूर्ण मानववंशावर थोर
उपकार केले आहेत असेच मला वाटते.
गेली तीस वर्षे हा देश लिट्टे आणि इतर फुटीर तमिळ अतिरेक्यांशी लढा देत आहे. इतका छोटा देश स्वतःच्या अस्तित्वासाठी, सिंहली
अस्मितेसाठी झगडतो हे निश्चितच कौतूकास्पद आहे. ह्या युद्धात आत्तापर्यंत हजारो निरपराध नागरिक, सैनिक, पोलिस, राजकिय नेते
आणि एक अध्यक्ष समर्पित झाले आहेत. भारतानेही अनेक सैनिक आणि राजीव गांधी गमाविले आहेत.
मिसळपाव