एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा (०२)
एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा
या लेखनमालेच्या पहिल्या भागात काही सदस्यांच्या प्रतिसादास मी सहमत आहे तसाच असहमतही आहे. तरीही मिळालेल्या प्रचम्ड प्रतिसादामुळे ( २६ प्रतिसाद ८६८ वाचने) मी पुढचा भाग लिहीत आहे.
एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवण्याचे तुम्ही ठरवले असेल तर सर्वप्रथम तुमचे अभिनन्दन
तुमच्या निश्चयाला आमचा सलाम. निश्चयी माणसेच जगात यशस्वी ठरतात.
तर मित्रानो आपण आपल्या निश्चयास जागून सुरुवात करुया.
कोणतीही गोष्ट यशस्वी करायची असेल तर त्याची पूर्व तयारी करावी लागते.
आपल्या "एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा" या निश्चयाचेही असेच आहे.
त्या साठी तयारी म्हणून.
ज्यानन्तरचा दुसरा संपूर्ण दिवस मोकळा असेल आणि आपलाच असेल असा कोणताही दिवस निवडावा उदा: शनीवार रवीवार अथवा जोडून सुट्ट्या येतात तो कोणताही दिवस.
सकाळी सकाळी मस्त डब्बल आम्लेट पाव अथवा मिसळ पाव हाणावा.
दुपारच्या जेवणात गुलाबजाम लाडू रसगुल्ले असे गोलवर्गीय पदार्थ खावे
सोबत खमण ढोकळा /उंधीयो असे आरोग्यवर्धक पदार्थ असावेत.
नुसती साधी पोळी खाण्यापेक्षा पुरनपोळी सारखे भरीव काहितरी खावे.
पातळ पदार्थात रस्सा वगैरे आकारान्त पदार्थापेक्षा बासुंदी वगैरे इकारान्त पदार्थ असावेत.
दुपारी शक्यतो सामीश जेवण नसावे.
संध्याकाळे बाहेर फिरायला जाण्यापेक्षा घरातच भेळ कचोरी समोसे वडे असे हलके पदार्थ खावे.
( तरंगतात ते सारे पदार्थ हलके असतात. वडे समोसे कचोरी हे तेलावर तरंगतात)
रात्री जेवणात सामीश असल्यास तळलेली अंडी , खीमा , तंदूरी चिकन , हे पदार्थ असावेत. सोबत तोंडी लावायला बोटीकबाब खीमा कबाब असे कबाब असावेत.
भात वर्गीय पदार्थात बिर्याणी/ पुलाव असे रुचकर पदार्थ असावेत. सोबत मिर्चीचे सालन असावे.
निरामीश असल्यास
लग्नात हमखास करतात ती बटाट्याची लगदा भाजी. पावट्याची उसळ.
भरल्या वांग्याची भाजी , बिरड्यावालाची रस्शाची उसळ. पुरी सारखे हलके पदार्थ
गोडाच्या पदार्थामध्ये आमरस सोबत तळलेले पापड कुरडया व तत्सम हलके पदार्थ.
भात वर्गीय पदार्थात काश्मिरी पुलाव.
जेवण झाल्यावर मुखशुद्धी म्हणून ३.१४२ कप बटरस्कॉच आइसक्रीम खावे
..............................................................................
ही झाली आपल्या "एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा" या निश्चयाची पूर्व तयारी.
पुढच्या भागात प्रत्यक्ष कोर्स बद्दल .......
(क्रमशः)
वर्गीकरण
>>( तरंगतात
(तरंगतात
In reply to (तरंगतात by परिकथेतील राजकुमार
+१
मस्त
आमचा गेस.
In reply to आमचा गेस. by अभिज्ञ
१+
In reply to १+ by विनायक प्रभू
+२
का? व्हाय बॉदर?? हू केअर्स???
का? व्हाय
?
ठ्यॉ
.
माला वाटल
सिंगल माल्ट केव्हा?
हम्म.............. लै दिवस