Skip to main content

अंत

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 19/05/2009 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
फुलत्या क्षणी फुलणे ना जमले सुकताना ही खंत नको गंधित होउन बहरुन जावे, पाचोळ्यापरी अंत नको जगणे अवघड झाले तेव्हा दिला सुरांनी जन्म नवा जन्मांतरी हे सूर भिनावे, नुसता कोकिळकंठ नको रंग-रूप, रस-गंध साठवित फुलाफुलावर लहरत जावे फूलपाखरू जीवन व्हावे, कोशातिल सुरवंट नको क्षणाक्षणाला कणाकणातुन उसळावे चैतन्य अनोखे खळाळते आयुष्य असावे, गती कधीही संथ नको अद्भुत काही असे घडावे असणे-नसणे सार्थ ठरावे रडतच आलो, रडवून गेलो इतका साधा अंत नको
Taxonomy upgrade extras

फडफड फडफड फडकतो.....

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी मंगळवार, 19/05/2009 03:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी टीव्ही म्हणजे फक्त संध्याकाळीच आणि ते पण फक्त एकच वाहिनी... खरं म्हणजे तेव्हा वाहिनी / चॅनल वगैरे शब्दच माहित नव्हते. टीव्ही हा एकच शब्द. तर, अशा त्या टीव्हीवर कधीमधी समूहगान असा एक प्रकार असायचा (आणिबाणी नुकतीच संपली होती पण काही नवीन प्रकार देऊन गेली होती, त्यातलेच समूहगीत हे एक). त्या समूहगीतांमधे एक गाणे नेहमी ऐ़कू यायचे... "ध्वज विजयाचा उंच धरा रे..." त्यातले ते लांबवलेले हुंऽऽऽ चांगलेच आवडायचे. पण ध्वज / झेंडा वगैरे काही प्रकार असतो हे तेव्हाच लक्षात आले होते. थोडं मोठं झाल्यावर मी आणि माझी आई एक खेळ खेळायचो. नकाशात एखादं गाव शोधायचं किंवा देश शोधायचा.

बेणारे

लेखक शरदिनी यांनी मंगळवार, 19/05/2009 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
बेणारे युद्धपिपासू साम्राज्यटोळ्यांच्या शोकसंघर्षातून गर्वल्यालेला बधिराsकांत तोंडी लावायला लब्धप्रतिष्ठित सुरुंगा-तुरुंगांच्या चित्ताकर्षक बाजारगप्पा चिअर्स चिअर्स आणि विद्धनजरेने पहायची पैलतीरावरच्या बेणारेची सुटकाधडपड किंवा वितळून राहायचे ऐलतीरी झारीतल्या शुक्राचार्यासारखे आळोखे पिळोखे देऊन कंटाळा आल्यावरती मात्र टाळ्या पिटून निघून जायचे उगाच तो आकांत मनाला चिकटला तर काय घ्या म्हणत म्हणत की "अशी धडपड अनुभवायची म्हन्जे " हौ एक्सायटिंग नै "? १८ मे २००९, पुणे
Taxonomy upgrade extras

बालसाहित्य

लेखक अनिल सोनुने यांनी मंगळवार, 19/05/2009 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नमस्कार, काही दिवसापूर्वी मी मराठी मुलांसाठी तयार केलेल्या संकेतस्थळाला आपण भरभरुन प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांच्या प्रेरणेनेच मी आता नव्या स्वरुपात संकेतस्थळ तयार केले आहे. आपल्याला ते आवडेल, उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे. कृपया बालजगत.कॉम ला भेट द्यायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्याकडे मुलांसाठी उपयोगी पडेल असे लेख, गोष्टी, गाणी इ. असतील तर अवश्य पाठवा. आपल्या नावासहित ती प्रसिद्ध केली जातील. तसेच संकेतस्थळ चांगले करण्यासाठी आपल्या सूचना, प्रतिक्रिया अवश्य पाठवा.

`उत्तर'क्रिया!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 18/05/2009 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणूक निकालाची धामधूम संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून राज ठाकरे त्यांच्या नित्यक्रमाला लागले होते. नाही म्हटलं, तरी प्रचार संपूनही प्रत्यक्ष निकालापर्यंत गडबड कायम होतीच. बेरजा वजाबाक्‍यांची चर्चा सुरू होती, समीकरणं मांडली जात होती. प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी तर मनसेची दिवाळीच साजरी झाली होती. पहिल्याच निवडणुकीत अनेक उमेदवारांनी लाख-दीड लाख मतांपर्यंत बाजी मारली होती. अधिक जोर लावला असता, तर आणखी काही जागा जिंकलोही असतो, अशी परिस्थिती होती. लोकांच्या अगदी "मनसे' प्रतिसादामुळं सगळेच भारावले होते.

लग्न म्हणजे...

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 18/05/2009 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या एका टप्प्यावर कुणाची तरी साथ हवीशी वाटते...(तात्यासारखा "बाई-बाटली'त न गुंतणारा एखादाच!) निर्णय कसा घ्यायचा, हे मात्र ठरलेलं नसतं. "अमक्‍याची तमकी लग्नाची आहे...' कुणीतरी सुचवतं. "तमका तुला अगदी शोभून दिसेल हो!' भोचक शेजारीण काकू मध्येच नाक खुपसतात. प्रत्यक्ष निर्णय आपल्यालाच घ्यायचा असतो.

आमची शाळा

लेखक वडापाव यांनी सोमवार, 18/05/2009 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉगिंगचे वेड हे आता सर्वत्र पसरत आहे. नुकतेच ऐकले, की मी ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेचीही अनुदिनी आहे. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थी-शिक्षकांनी आपले लेख व कविता दिलेल्या आहेत. आमच्या मुंबईतील दहिसरगावचे (आता ते गाव राहिले नाही) हे पहिले हायस्कूल, विद्या प्रसारक मंडळाचे दहिसर विद्या मंदीर.

मुलभुत व बाळबोध

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 18/05/2009 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
मला एक अतिशय मुलभुत व बाळबोध असा प्रश्ण विचारायचा आहे.. आज प्रत्येक राजकिय पक्ष असे म्हणत असतात कि आमचि फुले डॉ.बाबा साहेब आंबेडकर व शाहु महाराजांच्या विचारांशि बांधिलकी आहे..व आमचि त्या नुसार तशीच वाटचाल चालु आहे..मला व सा~यांना कुणी जाणकार समजावुन सांगु शकेला का..कि हे नेमके विचार काय आहेत..आजच्या काळातहि ते उपयुक्त आहेत का? व खरच राजकिय नेते त्या विचारा प्रमाणे वागतात का?

पराच्या राज्याची भेट

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 18/05/2009 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचून चमकू नका! क्रांतिबै बालकविता आणि ती पण जनातलं मनातलंमध्ये लिहितेय, झालंय काय तिला? असा विचारही करू नका! ही वार्ता आहे माझ्या अगदी अचानक झालेल्या पराच्या [मिपावरील परिकथेतील राजकुमाराच्या]राज्याच्या धावत्या भेटीची! [प-यांच राज्य पराच्या राज्याच्या समोर आहे. म्हंजे सौन्दर्य संवर्धन/संगोपन केन्द्र, शुद्ध मराठीत ब्युटी पार्लर!] त्याचं असं झालं, लेकीची तब्येत ऐन परीक्षेच्या सुरुवातीला बिघडली. इकडे मायचा जीव खालीवर! शेवटी पुण्याला जाऊन प्रत्यक्ष लेकीला भेटून यायचं ठरवलं.