Skip to main content

पिशितभुजाच्या कान्दिशिक नर्मदांचे विकल मनोरथ

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 31/05/2009 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
अधिपतींनी नेहमीप्रमाणे दरबाराला सुरवात व्हावी अशी आज्ञा केली. दरबाराला सुरवात झाली. किरकोळ तंटे, भांडणे यांचा यथायोग्य निवाडा करुन अधिपतींनी मौजेचे कार्यक्रम सुरु व्हावे असे सांगितले. दरबारी आपले विविध प्रकारचे कौशल्य दाखवित असतांनाच अधिपतींना लहर आली, आणि त्यांनी आपले नृत्यकौशल्य दाखविले. सभाजन अचंबित होवुन टाळ्या वाजवण्याचे विसरुन आपल्या शेजा-यांची बोटे तोंडात घालु लागले. दोन मिनिटांनी गरके घेवुन झाल्यावर "आताच भोजन झाले नाहीतर, कुणाला हार गेलो नसतो!" असे सांगुन अधिपती धापा टाकत सिंहासनावर जावुन बसले.

माझी मद्रास ची सफर- भाग अंतिम

लेखक मस्त कलंदर यांनी रविवार, 31/05/2009 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
... भाग १ ... भाग २ ... भाग ३ तसं बरंचसं लिहून झालंय चेन्नई/मद्रास बद्दल... देवांनी तर सविस्तर लिहिलं आहेच.. नि बरीचशी जनता ही तिकडे राहून आल्यामुळेही अनुभव जवळ्जवळ सारखेच असतील... पण माझ्यामते... आणखी एक-दोन गोष्टींच्या उल्लेखाविना ही सफर नक्कीच अपूर्ण राहिल... पहिली गोष्ट म्हणजे.. दाक्षिणात्यांचं वागणं!!! माझं जन्मगांव सोडलं.. तर माझा संबंध फक्त मुंबईशीच आला.. इतर ठिकाणीही असेच होत असेल असा माझा कयास आहे..

काव्य

लेखक दत्ता काळे यांनी रविवार, 31/05/2009 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
काव्यात हरवलेला मी .. शब्दांना नाही गणती एक सोडावा, दुसर्‍या जोडावे ओळ, शब्द मर्यादेसाठी मनामध्ये उजवे, डावे कुणी म्हणतात . . काव्य असावे छांदस, शब्दांच्या मर्यादेत. मर्यादा सोड्ली तर गैर, नी छंदमुक्त अन स्वैर.. मला नाही वाटंत तसं, कि .. हव्यात मर्यादा काव्यासाठी अथांग सागर, सुसाट वारे खुला निसर्ग सर्वांसाठी एक विचारू तुम्हाला मी. .? जंगलामध्ये आडवाटेवर फुलांची असतेच् ना वस्ती ? रसिक पाखरे येतातच् ना रसभरल्या फळांवरती ? म्हणून कधी वाटते मला.
Taxonomy upgrade extras

चारोळ्या

लेखक स्वप्निल मन यांनी रविवार, 31/05/2009 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
१) आभाळात मेघ दाटून आले की मला कसतरीच होत॑ तुझ्या आठवणी॑च्या पावसाने मन कासाविस होत॑ २) चातक जसा वाट पाहातो पहील्या पावसाची तसा मीही बघतोय वाट तुझ्या प्रेमाची तू फक्त एकदाच कर माझ्यावर प्रेमाचा वर्षाव न॑तर ते पावसासारखे धो धो कोसळणारच आहे माझ्यावरती
Taxonomy upgrade extras

जगायचे स्वतःलाच शोधत!!!

लेखक निशिगंध यांनी रविवार, 31/05/2009 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
तुला शोधता शोधता..... मी हरवून बसलो होतो स्वतःलाच.. आता तुझे विचारही नाहीत मनात मी शोधत आहे माझे मलाच... माझे मलाच... असे काही तरी लिहायचे आणी समजुत घालायची आपल्या मनाची.. पण प्रयत्न केले नाहीत असे नाही.. खुप प्रयत्न केले तीला सांगण्याचे.. पण हरलोच ना शेवटी, कधी आजुबाजुच्यांचा विचार, तर कधी तिचाच. तिला काय वाटेल. मित्र म्हणायचे अरे सांग तीला मग तिलाच ठरवू दे ना.. त्यांना काय जाते सांगायला. मी जाईन इथुन २ महिन्यानी पण तीला अजुन २ वर्ष काढायची आहेत हया महाविद्यालयात.. आणि आईचे निराळेच.. फोटो पाहुन म्हणते छान आहे रे!!

नारळीपाकाचे लाडू

लेखक रेवती यांनी रविवार, 31/05/2009 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: पाव किलो जाड रवा, सव्वा मोठी वाटी नारळाचा चव, पाव किलो साखर, अर्ध्या वाटीपेक्षा थोडे कमी साजूक तूप, पाव वाटी दूध, पाच वेलदोड्यांची पूड, आवडत असल्यास बेदाणे दीड ते दोन टेबलस्पून, साखरेच्या निम्मे पाणी. कृती: रवा गुलाबी रंगावर तूप घालून भाजावा. पाव वाटी दूध शिंपडून पुन्हा भाजावा. आता नारळाचा सव्वा वाटी चव घालून भाजण्यास सुरुवात करावी. रवा फुलू लागेल व कोरडाही होऊ लागेल त्यावेळी परातीत हे मिश्रण काढून घ्यावे. त्याच कढई किंवा पातेल्यात आता पाक करण्यास ठेवायचा आहे. मापाचे पाणी व साखर एकत्र करून मध्यम आचेवर ठेवावे. सतत ढवळत रहावे.

पत्रांमधुनी

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 30/05/2009 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
असेच भेटत राहू आता पत्रांमधुनी सुखदु:खाच्या सांगत गाथा पत्रांमधुनी "फुले मिळाली?" विचारले, अन् पुढे म्हणालिस, "फुलांसवे जर गंधहि जाता पत्रांमधुनी!" वळवाची सर जशी झरावी तसे भेटलो जालावरती येता जाता पत्रांमधुनी खुळ्यासारखे रुसवे-फुगवे, भांडण-तंटे, नको उगाळू त्या कटु वार्ता पत्रांमधुनी मनावेगळ्या मनात जपलेले क्षण हळवे कधी फिरुन येतिल का हाता पत्रांमधुनी? हळूच भिजल्या पापण्यांतला चंद्र हासला, पुन्हा तुझे प्रतिबिंब पहाता पत्रांमधुनी तुला वाचले, तुला जाणले, भरुन पावले! चित्र नको, तू ये ना आता पत्रांमधुनी! अवांतर :-या गझलचं सगळं श्रेय चुचुताईला!

नाती गोती-२

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 30/05/2009 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
Never underestimate spirited women ह्या उक्तीवर माझा संपुर्ण विश्वास आहे. दोन दिवसांनी आई आपल्या मुलीला घेउन घरी आली. ह्यावेळी कधी नव्हे ती बायको पण उपस्थित राहीली. मुलगी आईला उजवी ठरेल दिसायला अशी होती. '"तुला सी.ई.टी त किती मार्क मिळतील असे वाटते " मी विचारले " साधारण १६५ पर्यंत पडतील." मुलगी "तु ओपन मधे बसतेस का?"मी "हो" मुलगी "मग मुंबई मधे मीळणे जरा कठीणच आहे. प्रायवेट सी.ई.टी चे काय? त्यात काय वाटते? तिथे तरी १७०+ मिळतील का? " हो, सर. ह्या वेळेला स्टेट सी.ई.टी मधे फीजीक्स चा पेपर जरा कठीण होता. पण प्रायवेट मधे मिळतील्."-मुलगी "किंवा दुसरा एक उपाय आहे.