Skip to main content

ए.डी.एच.डी.

लेखक दशानन यांनी सोमवार, 10/08/2009 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
ए.डी.एच.डी. = अटेंशन डेफिसिट हाईपरेक्टिविटी डिसाअर्डर एका सात वर्षाच्या मुलाबद्दल त्याला ए.डी.एच.डी. आहे असे सागितले आहे, ह्या आजार मेडिसीन ने ठीक होऊ शकतो की फक्त काउंसलिंगद्वारे पण ठीक होऊ शकतो :? जर कोणाकडे योग्य माहीती असेल तर मदत करावी ही विनंती.

रव्या-खोबर्‍याची भाकरी - एक झटपट मधल्या वेळचे खाणे

लेखक सुनील यांनी सोमवार, 10/08/2009 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य - रवा किसलेले खोबरे (प्रमाण रव्याच्या किमान अर्ध्याने) आले हिरवी मिरची मीठ पाणी तेल कृती - १) आले, हिरवी मिरची आणि खोबरे वाटून घ्या २) त्यात चवीपुरते मीठ घाला ३) त्यात थोडे (रवा बुडेल इतपत) पाणी घाला ४) रवा घालून सर्व मिश्रण एकजीव करा ५) त्याचे छोटे गोळे करून भाकरीसारखे थापा ६) तापलेल्या तव्यावर तेल टाकून, भाकर्‍या दोन्ही बाजूने खरपूस भाजा टीपा - १) आले आणि हिरवी मिरची यांचे प्रमाण आपापल्या चवीनुसार ठरवावे २) ह्या भाकरीस वेगळ्या तोंडीलावण्याची गरज नाही (आले-मिरची-मीठामुळे) ३) चिमूटभर साखर (वैकल्पिक) घालता येईल ४) रवा घातल्यानंतर ताबडतोब भाकर्‍या करायला घ्या.

विषाणू

लेखक अ-मोल यांनी सोमवार, 10/08/2009 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटेचा अलार्म वाजला तसे सूर्य महाराज खडबडून जागे झाले. स्नान आटोपून, चहा घेवून, न्याहारी करून ते पृथ्वीच्या दिशेने जाण्यासाठी रथात बसणार इतक्यात सूर्यीणबाई कडाडल्या, “अहो, विसरभोळेपणा कधी जाणार तुमचा?” आता काय झालं, असा प्रश्न पडून सूर्य महाराज मागे वळले, तर सूर्यीणबाई हातात मास्क घेवून उभ्या. “पृथ्वीकडे जायचं म्हटलं की तुम्हाला नेहमीच घाई असते हो, मग सख्खी लग्नाची बायकोही दिसेनाशी होते. शून्यनगरीत स्वाईन फ्लूची साथ चालू आहे माहिती आहे ना, हा मास्क नाकावर चढवा आधी अन मग उधळा कुठं उधळायचं ते.” एरवी अख्ख्या जगाला आपल्या झळांनी सळो की पळो करून सोडणारे सूर्य महाराज..

पुण्यातील १५ 'स्वाइन फ्लू' चाचणी केंद्रे

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 10/08/2009 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
१.Erandwane:Nalstop Chowk,near padale palace,karve road, pune-4. Contact: Dr. SaritaGanala, Phone:9764000939. २.Anandibai Narhar Gadgil hospital:Near mhatre Bridge,Dattawadi. Contact,Dr.Jyotsna Khole, Phone:9422987953. ३.Balaji Rakhmaji Gaikwad Hospital: Opposite Lingayat Creamatorium,Timber market Ganj Peth. Contact:Dr.Sandhya Bahule. ४.Kalavatibai MavaleHospital: 283,Near Modi Ganpati,Narayan Peth.

रोग प्रतिकारशक्ती

लेखक अजय भागवत यांनी सोमवार, 10/08/2009 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
साथीच्या रोगांमध्ये ज्यांची रोग प्रतिकारशक्ती जास्त असते त्यांना त्याचा कुठेनकुठेतरी फायदा होतच असणार. सध्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यांकडे लक्ष दिल्यास त्यात ऍन्टी-ऑक्सिडंट्स, भरपूर प्रथिने असलेले आहार, व्हायटामिन्स (प्रामुख्याने सी), व स्वच्छतेची काळजी (आंतर्बाह्य सुरक्षा) हेच उपाय सुचविलेले दिसत आहेत. प्लेटलेटस काऊंट हा एक ह्या चर्चेशी जोडला जाणारा आणखी एक विषय. लढाई करायची तर सैन्याची जादा कुमक असणे महत्वाचे. सध्या आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने (बहीण, मामेभाऊ) हे सगळे करत आहोत.

चले जाव!

लेखक विकास यांनी सोमवार, 10/08/2009 02:03 या दिवशी प्रकाशित केले.
आज ऑगस्ट ९. ६७ वर्षांपुर्वी आजच्या दिवशी मुबईतील ऑगस्ट क्रांतीमैदानावर अरूणा असफली यांनी झेंडा उंचावला आणि ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध चलेजाव ची घोषणा झाली. आज हा चर्चा प्रस्ताव केवळ विंदांच्या भाषेत "इतिहासाचे अवजड ओझे घेऊन डोक्यावर ना नाचा" या उद्देशानेच म्हणजे केवळ उर भरून येऊन लिहीण्यासाठीचा नाही आहे. त्यावेळेस कोण बरोबर आणि कोण चूक, चळवळ यशस्वी होती का अयशस्वी वगैरेचा काथ्याकुट करायला देखील नाही आहे.

मॅरेज लाईफ.....१

लेखक मस्त कलंदर यांनी रविवार, 09/08/2009 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
हॅलो, वेळ आहे का रे या रविवारी?? का रे? अरे आपल्याला एका काम आहे मुंबईत!! मला तुझी मदत लागेल... रविवारी..... ?? बघतो.. बघु नकोस मी वाट पाहतोय. नि तू इकडे येतोहेस हे नक्की. आता हे लक्षात ठेऊन तू बाकीचं प्लॅनिंग कर. अरे पण काय आहे ते सांग ना.. ते नंतर सांगतो सविस्तर बोलू ना आपण.... तरी पण... फोनपेक्षा सविस्तर भेटून बोलू..... पराला निखिलचा अचानक फोन आला आणि मुंबईला का बोलावतोय ते तो सांगायला तयार नव्हता.... काही विचारले तर तू फक्त ये इकडे असं म्हणत होता.. शनिवारी संध्याकाळी निखिलने पराला पुन्हा फोन केला.. उद्या निघतोयस ना पाचच्या बस ने? पाच??? अरे तेव्हा तर माझी मध्यरात्र होते..!!!

गोरख कल्याण

लेखक अन्वय यांनी रविवार, 09/08/2009 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
गोरख कल्याण हा अनेकांप्रमाणे माझाही अत्यंत आवडता राग आहे. हा राग रात्रीच्या पहिल्या प्रहारात गातात असे म्हणतात. (अचूक वेळ माहीत नाही. याबाबत तात्या अधिकाराने बोलू शकतात.) पण या रागाची सुरावट ही रात्रीच्या वातावरणाला अजिबात पोषक नाही, असे माझे मत आहे. याविषयी कुणाचे म्हणणे वेगळेही असू शकेल. पण मला हा राग ऐकला किंवा पेटीवर वाजविला की उत्तर रात्री अगदी पहाट होताना एकाद्या मंदिरातून संगीत ऐकू यावे, असा भास होतो. हा राग मी पहिल्यांदा कोणत्याही मंदिरात वगैरे एकलेला नाही. प्रथम संजीव अभ्यंकरची ध्वनिफित ऐकली होती. त्यानंतर जसराज ऐकले आणि नंतर अनेक गायकांना ऐकले आहे.

स्वाईन फ्लू चा विळखा...

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 09/08/2009 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाईन फ्लू चे आत्तापर्यंत ५ बळी. पुण्यानंतर आता मुंबईतही लागण.. उत्तर न मिळालेले काही प्रश्न - हा रोग असाध्य आहे का? टॅम्लिन फ्लू की कायसं, एवढं एकच औषध उपयोगी आहे का? फक्त हवेतूनच पसरतो की अन्न्-पाण्यातूनही? लक्षणं काय आहेत? कुणीतरी योग्य ती वैद्यकीय माहिती पुरवावी... तात्या.