सूहास (verified= न पडताळणी केलेला)गुरुवार, 27/08/2009 20:14
पार्श्वभाग ::
रोजप्रमाणे काल,आज,उद्याही अफगानीस्तामधील काबुल ह्या गावी बॉम्ब फेकाफेकीचा सोहळा (फेस्टिवल) १-२७ ऑगस्ट पर्यंत साजरा झाला.
कुठच्यातरी रूढींवर आधारित ह्या कार्यक्रमाच्या स्थळी पाकीस्ताच्या लष्कर-ए-तोयबा शाखेने गोळीबार केला नाही, कारण तुम्हाला काय वाटते ते सुचवा.
(सगळे काही वजनानुसार(आपआपल्या) झेपेल ईतकेच घेणे)
१)लष्कर्-ए-तोयबा तेथील कार्यकर्तेही त्यात परंपरेनुसार सामिल झाले होते
२)लष्कर्-ए-तोयबा तेथील शाखा ह्या बाबतीत फारशी उत्साही नाही .त्यांच्याकडे पुरेसा शत्रसाठा उपलब्ध नव्हता.
३)लष्कर-ए-तोयबाचा ह्यात पुढाकार नव्हता, सबब गोळीबार करण्यात त्यांना काही स्वारस्य नव्हते .
४)तिथे गोळीबार करणे स्वतःच्या जीवितास(अल-कायदा ने ठोकले असते) धोकादायक ठरू शकले असते
इतर काही नाही.....
सू हा स...
आजच्या बातम्यांत, मिटिगेशन म्हणून 'हे टोमॅटो फारसे स्वादिष्ट नसतात' असे सांगण्यात आले.
पण ते चांगले असतात, नासके वगैरे काही नसतात. आणी त्यांची लागवड त्या क्षेत्रात मुद्दाम ह्या सोहळ्यासाठीच करतात, म्हणे!
माझे मत: "ह्यात हिंदूंचा पुढाकार नव्हता, सबब निदर्शने करण्यात त्यांना काही स्वारस्य नव्हते" ला आहे.
मात्र अजून विचार केल्यावर अजून एक शक्यता डोकावला: अनिसचे कार्यकर्ते परंपरेने सामील नाही पण त्यांच्या पारंपारीक पद्धतीने विरोध करायला गेले आणि मग इतरांनी "सामान्य जनांच्या" परंपरेने त्यांना टोमॅटो मारून टोमॅटो फेस्ट साजरा केला... :-)
टोमॅटो फेकण्यामागे नक्की कोणती अंधश्रद्धा आहे आणि अंनीसनी कशाचा निषेध करायला हवा होता त्याबद्दल वाचकांचे मत कळ्ल्यास मत बनवणे सोपे जाईल.
---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान
अंनिसच्या निषेध न करण्यामागे बारामतीच्या काकांचा हात आहे असे येथील काही जाणकारांचे मत आहे..! त्यानिमित्ताने का होईना टोम्याटो उत्पादकांचा फायदाच होईल (मग ते स्पेन मधील का असेनात?) असे त्यांना वाटते असे जाणकार म्हणतात..! अशा प्रकारचा एक उत्सव ते पुढील वर्षी पासून बारामतीत चालू करणार आहेत अशी बातमी आहे! हा उत्सव IPL सारखा महिनाभर चालेल..
या समारंभासाठी काही टन टोम्याटो त्यांनीही पाठविल्याची विरोधी गोटात चर्चा आहे आणि त्यामुळेच त्यांनी आपले वजन वापरुन स्पेनच्या अंनिसशाखेस निदर्शन करण्यापासून अडवले म्हणे! काकांची "टोम्याटो लीग" उत्पादकांपेक्षा व्यापारीहिताची आहे अशी टीकाही काही लोकांनी केलीय...!
--सुहास
अंनिस ने जहर -ए- खुष फेस्टिवल साजरा करावा. जयंतरावांची आयडीया ढापली.
खरतर आमच्या डोक्यात irrational day साजरा करावा अशी आयडीया खुप दिवस आहेच. त्यादिवशी काही बी केल तरी चालनं. समदा हिशोब चुकता करायचा म्हणजे इतर दिवशी रॅशनल राहता येईल अशी सोय.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
खरतर आमच्या डोक्यात irrational day साजरा करावा अशी आयडीया खुप दिवस आहेच.
आमचे पूर्वज द्रष्टे होते, म्हणून त्यांनी होळी चा सण चालू केला. ;)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
हॅहॅहॅ अग्दी सहमत आहे.
बेंबी च्या देठापासुन बोंब मारली कि नाभिचक्र कार्यान्वित होते व इतर चक्रांना कार्यान्वित करते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
२६ ऑगस्ट म्हणजे यंदा?
सन्जोप राव
किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है
जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है
प्रदीप-जी,
तुमच्या लेखाचा/कौलाचा रोख चांगला आहे, पण तुमचा मुद्दा किती लोकांच्या काळजाला भिडला कुणास ठाऊक!
स्पेनमध्ये लोक एक tradition म्हणून अन्नाची नासाडी करतात, पण कुणी निषेध करत नाहींत हे दिसत आहे, पण भारतात कुणी असे केले तर 'होळीचा सण' साजरा होईल यात शंका नाहीं!
पण मी 'अंनिस'चा समर्थक आहे. माझ्या मते टोमॅटो नासणे अंधश्रद्धा या सदरात मोडत नाहीं तर ते एक 'अमीरी' (किंवा माज) चे लक्षण वाटते ("टोमॅटो भरपूर आहेत व आम्ही ते नासणार" हा खाक्या दिसतो.)
सुधीर काळे, सध्या मुक्काम ओबमांच्या पंढरपुरी (हो, वॉशिन्ग्टन डीसी येथे)!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9
|| पण मी 'अंनिस'चा समर्थक आहे.
माझ्या मते टोमॅटो नासणे अंधश्रद्धा या सदरात मोडत नाहीं तर ते एक 'अमीरी' (किंवा माज) चे लक्षण वाटते ("टोमॅटो भरपूर आहेत व आम्ही ते नासणार" हा खाक्या दिसतो.)
........म्हणूनच असे मत झाले असावे कारण सगळे अनिस वाले फक्त हिंदूंच्याच मागे लागतात ही वस्तुस्थिती म्हणजे कोंबडे झाकले तरी ते आरवायचे राहत नाही...........अन्य कोणत्याही धर्मातील अंधश्रद्धेबाबत अंनिस ने कधीही ब्र काढला असल्याचे दाखवून द्या.
कारण अंधश्रद्धेपोटी टोमॅटो नासले की मग त्याला माज म्हणा, किंवा अन्य काही, त्यामुळे अंधश्रद्धा लपत नाही, हे परंपरेने चालत येते.
>>अनिस वाले फक्त हिंदूंच्याच मागे लागतात
ही पन एक अंधश्रद्धाच आहे. माझ्या माहितीप्रमाणे कोठल्यातरी दर्ग्यापाशी एक दगड आहे आणि तो हलवता येत नाही. पण त्या दर्ग्यातल्या पीराचे (?) नाव घेतले की तो सहज हलवता येतो अशी श्रद्धा आहे. त्या ठिकाणी अंनिसने काही चळवळ केल्याचे ऐकले होते. काही संदर्भ मिळाले तर कळवेन.
बाकी या जुन्याच आरोपाचे सयुक्तिक उत्तर छोटा डॉन यांच्या एका धाग्यावर दिल्याचे स्मरते.
नितिन थत्ते
||| >>अनिस वाले फक्त हिंदूंच्याच मागे लागतात
ही पन एक अंधश्रद्धाच आहे.
............. ही अंधश्रद्धा नाही, तर तशी खात्रीच आहे.
||| >>माझ्या माहितीप्रमाणे कोठल्यातरी दर्ग्यापाशी एक दगड आहे आणि तो हलवता येत नाही. पण त्या दर्ग्यातल्या पीराचे (?) नाव घेतले की तो सहज हलवता येतो अशी श्रद्धा आहे. त्या ठिकाणी अंनिसने काही चळवळ केल्याचे ऐकले होते. काही संदर्भ मिळाले तर कळवेन.
............ ऐकीव माहिती काहीही कामाची नाय ब्वा... संदर्भ दिले असते तर अधिक बरे झाले असते......
|||>>बाकी या जुन्याच आरोपाचे सयुक्तिक उत्तर छोटा डॉन यांच्या एका धाग्यावर दिल्याचे स्मरते.
.............. त्या धाग्याची कडी (लिंक) दिली असती तर बरे झाले असते.....
.............. त्या धाग्याची कडी (लिंक) दिली असती तर बरे झाले असते.....
हे आणि याच्या आसपासचे प्रतिसाद वाचावे. किंबहुना पूर्ण धागाच वाचनीय.
नितिन थत्ते
>>>माझ्या मते टोमॅटो नासणे अंधश्रद्धा या सदरात मोडत नाहीं तर ते एक 'अमीरी' (किंवा माज) चे लक्षण वाटते ("टोमॅटो भरपूर आहेत व आम्ही ते नासणार" हा खाक्या दिसतो.)
हे मान्य
>>सगळे अनिस वाले फक्त हिंदूंच्याच मागे लागतात ही वस्तुस्थिती म्हणजे कोंबडे झाकले तरी ते आरवायचे राहत नाही
हे देखील खरे
आपल्या देवाला कोंबडे कापले तर ती अंधश्रद्धा व कुर्बानी म्हणून बकरे कापले तर श्रद्धा (कारण येथे अंधश्रद्धा म्हणले तर जीव जाईल ना)
मदर तेरेसाला ( या व्याक्तिच्या कार्याबाबत शंका नाही) संतपदा साठी चमत्कार केले आहेत असे म्हणले तर ती अंधश्रद्धा नसते, या चमत्कारावर कधी अनिस नाही आक्षेप घेत
http://en.wikipedia.org/wiki/Mother_Teresa
बाकी चमत्कार, कोंबडे कापणे या गोष्टी हिंदूच्याच असतिल तर अंधश्रद्धा इतरांच्या असतील तर श्रद्धा
आपल्या देवाला कोंबडे कापले तर ती अंधश्रद्धा व ईदला कापले तर श्रद्धा
(कारण येथे अंधश्रद्धा म्हणले तर जीव जाईल ना)
- अंनिस वाल्यांनी अनेकदा जीव धोक्यात घालून चांगलं कार्य केलं आहे, अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ते कार्य खरं तर 'हिंदू जनजागृति समिती', सनातन संस्था वाल्यांनी केलं पाहिजे. कारण तेच नेहमी हिंदु राष्ट्राच्या गर्जना करत असतात. त्यांना खरोखरच हिंदु राष्ट्र हवं असेल तर त्यांनी हिंदु समाज आधुनिक केला पाहिजे, एकजीव केला पाहिजे, जात्-पात विरहित केला पाहिजे. पण उलटपक्षी ते रूढींचा पुरस्कार करत असतात. पिंडदान करणे कसे योग्य ते पाजळत बसतात. चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करत असतात आणि समाज सनातनी बनवू पाहतात. ( ज्यांना पुरावा हवा असेल त्यांनी डोंबिवली (पूर्व) येथील स्मशानात जाऊन त्यांनी लिहिलेल्या पाट्या वाचाव्यात. असला भिकार प्रचार त्यांनी आणखीन किती ठिकाणी केला आहे कुणास ठाऊक. ) दिप्या लगे रहो. आपल्यातला हा वाद कधीच संपणार नाही.
अंनिसने स्वताला हिंदू अंनिस म्हणवावे मगच फक्त आणी फक्त हिंदू अंधश्रद्धा नष्ट करव्यात त्याना माझा तरी पाठींबा (सहभाग नव्हे :) ) उगाच सर्वधर्मातील अंधश्रद्धाना विरोध करतो असे म्हणू नये
अंनिसने स्वताला हिंदू अंनिस म्हणवावे मगच फक्त आणी फक्त हिंदू अंधश्रद्धा नष्ट करव्यात त्याना माझा तरी पाठींबा (सहभाग नव्हे ) उगाच सर्वधर्मातील अंधश्रद्धाना विरोध करतो असे म्हणू नये
निदान हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धा तरी ते दूर करतात हे मान्य केलंस हे खूप झालं. कोण स्वतःला काय म्हणतं यापेक्षा कोण कसं वागतं याकडे लक्ष द्यावं.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील अंतर अतिशय पुसट आहे......
जोपर्यंत कोण्त्याही व्यक्तिची श्रद्धा अन्य कोण्त्याही व्यक्तिला कोणत्याही स्वरुपाची इजा पोहोचवत नाही, तो पर्यंत त्याला अंधश्रद्धा म्हणून हिणवण्याचे अथवा त्याविरुद्ध उगाच हाकाटी करण्याचे काही कारण नाही. पण असे घडते व म्हणूनच वाद निर्माण होतात म्हणण्यापेक्षा निर्माण केले जातात. व्यक्तिगत फायद्यासाठी........
माझ्या टिप्पणीवरील "अंनिस फक्त हिंदूंमधील अंधश्रद्धा काढण्याचा प्रयत्न करते" या अर्थाच्या टिप्पण्या मान्य...पण इतर धर्मातल्या अंधश्रद्धा काढण्यासाठी त्या-त्या धर्मातल्या लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत असेही वाटते.
सुधीर काळे, या आठवड्यात तलाहासी, फ्लॉरीडा येथे बहिणीकडे!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9
पुण्य्याशेजारी एक प्रसिध्द गाव आहे.शनीशिंगणापूर.
लोकांची अशी (अंध) श्रद्धा की त्या गावात चोरी होत नाही आणि त्यामुळे तिथे
कोणत्याहि जागी कुलुप लावले जात नाही
अंनिस च्या लोकानी तिथे एक प्रयोग करून पहायचा होता. चोरी चा.
आता बोला.
अंध (अ) श्रद्धा पण नसावा.
शनी शिंगणापुरात चोर्या होत नाहीत हे तितकेसे खरे नाही. पण गावाचे अर्थकारण त्या देवाच्या "पॉवर" वर अवलंबून आहे. त्यामुळे चोरी झाली तरी बोभाटा न करण्याकडे कल असतो असेही ऐकले होते.
नितिन थत्ते
पेठकर काकांनी त्यांचा अनुभव लिहीला होता (लिंक बरीच शोधावी लागेल); चोरी झाल्यावर गावातल्या दुकानदारांनी नुकसान भरपाई दिली होती, चोरीचा गवगवा होऊन 'धंदा' बसू नये म्हणून!
अंनिसवाले इतर धर्मातल्या अंधश्रद्धा दूर का करत नाहीत, तर जे काम करत आहेत त्यासाठीतरी पुरेसं बळ (पैसे, कार्यकर्ते) त्यांच्याकडे आहे का? त्यांना जे चुकीचं दिसतं त्यातला काही भाग हटवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. "शेजार्याचं घरही झुरळांनी भरलं आहे, मलाच का अस्वच्छ म्हणता?" असा काहीसा विचार अजिबात पटला नाही.
आपण काय ते स्वतःबद्दल बोलावं; मी स्वतः देव मानत नाही, धर्म म्हणजे काय मला कळत नाही, पण कागदावर मी हिंदू आहे. अर्थातच मला जी काय माहिती आहे ती ख्रिश्चॅनिटी, इस्लामबद्दल नसून हिंदू धर्माबद्दलच आहे. मी त्याबद्दलच बोलू शकते. अंनिसमधे जन्माने हिंदू असणारे लोकच जास्त, बहुसंख्य असतील तर ते हिंदू धर्माबद्दलच बोलू शकतील.
अदिती
||>>>अंनिसमधे जन्माने हिंदू असणारे लोकच जास्त, बहुसंख्य असतील तर ते हिंदू धर्माबद्दलच बोलू शकतील.
........... मग करा ना नामबदल...... केवळ हिंदू अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून................... मग स्वतःला निधर्मी कसे म्हणवून घेणार ???? चालायचेच......
कोळसा कितीही उगाळला तरी काळाच राहणार त्याचा रंग थोडाच बदलणार आहे ???
...... मग करा ना नामबदल...... केवळ हिंदू अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून................... मग स्वतःला निधर्मी कसे म्हणवून घेणार ???? चालायचेच......
श्रद्धा-अंधश्रद्धेला धर्म नसतो. हिंदु श्रद्धा हा शब्द सोयी साठि आहे. तुम्ही जरी स्वतःला निधर्मी समजत असला तरी दाभोलकर हे हिंदुच आहेत असे मानणारे लोकच आहेत ना असंख्य.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
अंनिसवाले इतर धर्मातल्या अंधश्रद्धा दूर का करत नाहीत, तर जे काम करत आहेत त्यासाठीतरी पुरेसं बळ (पैसे, कार्यकर्ते) त्यांच्याकडे आहे का? त्यांना जे चुकीचं दिसतं त्यातला काही भाग हटवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. "शेजार्याचं घरही झुरळांनी भरलं आहे, मलाच का अस्वच्छ म्हणता?" असा काहीसा विचार अजिबात पटला नाही.
सहीच. शंभर टक्के सहमत.
काय वैताग आहे.
नाव बदल करायला सांगणारे तुम्ही कोण? सहारा सारखे तुम्ही पैसे मोजलेत का तुम्हाला पाहिजे ते नाव ठेवायला. का प्रायोजक आहात अंनिस चे ? आपण स्वतः तर काही करायचे नाही. आणि नावे ठेवत बसायचे. तुम्हाला स्पेन मध्ये, मुसलमानांमध्ये, ख्रिच्शन धर्मात अंधश्रद्धा आहेत असे वाटते ना? मग जा ना तुम्ही आणि करा निर्मुलन. नुसते कळफलक का बडवताय?
- ओंकार.
एवढे चिडताय कशाला ओंकार राव ???
नाही आम्ही पैसे मोजले त्यासाठी म्हणून बिघडले कुठे ???..... ;)
तुमच्या बाकीच्या प्रतिसादाबद्दल काहीही लिहिण्याची गरज नाही, कारण उत्तर पुढील प्रतिसादात आलेले आहे
रेल्वे बंद आहेत, वेळ घालवायला कळफलक बडवण्यापेक्षा अधिक चांगला पर्याय मिळाला नाही................... ;) 8}
प्रतिक्रिया
आवाक्याबा
पार्श्वभा
धाग्यात
In reply to पार्श्वभा by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
ईतर काही
टोमॅटो
टोमॅटो
In reply to टोमॅटो by प्रकाश घाटपांडे
दोन पर्याय हवेत!
- ह्यात हिंदूंचा पुढाकार नव्हता, सबब निदर्शने करण्यात त्यांना काही स्वारस्य नव्हते
- तिथे निदर्शने करणे स्वतःच्या जीवितास धोकादायक ठरू शकले असते
हे माझं मत!माझे मत
हॅहॅह
In reply to माझे मत by विकास
अंनिस
अहो
In reply to अंनिस by नितिन थत्ते
विषय गंभीर
२
नक्की कोणती अंधश्रद्धा ?
अंनिसच्या
अंनिस ने
त्याला
In reply to अंनिस ने by प्रकाश घाटपांडे
हॅहॅहॅ
In reply to त्याला by विकास
हॅहॅहॅ
In reply to हॅहॅहॅ by प्रकाश घाटपांडे
हॅहॅहॅ
In reply to हॅहॅहॅ by प्रकाश घाटपांडे
अंनिसची सौदी अरेबिया ब्रँच
In reply to अंनिस ने by प्रकाश घाटपांडे
२६ ऑगस्ट?
तुमचा मुद्दा किती लोकांच्या काळजाला भिडला कुणास ठाऊक!
|| पण मी
In reply to तुमचा मुद्दा किती लोकांच्या काळजाला भिडला कुणास ठाऊक! by सुधीर काळे
अंनिस आणि इतर धर्म
In reply to || पण मी by सुधीर१३७
||| >>अनिस
In reply to अंनिस आणि इतर धर्म by नितिन थत्ते
लिंक
In reply to ||| >>अनिस by सुधीर१३७
>>>माझ्या
आपल्या
अंनिसने
In reply to आपल्या by अप्पा जोगळेकर
अंनिसने
श्रद्धा
In reply to अंनिसने by अप्पा जोगळेकर
इतर धर्मातल्या अंधश्रद्धा काढण्यासाठी त्या धर्मातल्यांनी झटावे!
अहो मग
In reply to इतर धर्मातल्या अंधश्रद्धा काढण्यासाठी त्या धर्मातल्यांनी झटावे! by सुधीर काळे
>>कोण कसं
अंनिस च्या विचाराची झेप पहा
अर्थकारण
In reply to अंनिस च्या विचाराची झेप पहा by भय्या
पेठकर
In reply to अर्थकारण by नितिन थत्ते
||>>>अंनिसमधे
In reply to पेठकर by ३_१४ विक्षिप्त अदिती
लॉजिक
In reply to ||>>>अंनिसमधे by सुधीर१३७
निधर्मी
In reply to लॉजिक by प्रकाश घाटपांडे
अंनिसवाले
In reply to पेठकर by ३_१४ विक्षिप्त अदिती
झुरळे
In reply to अंनिसवाले by अप्पा जोगळेकर
शस्त्रक्रिया
In reply to झुरळे by Dipankar
च्यायला
) ) एवढ्यात
In reply to च्यायला by मी_ओंकार
एवढे
In reply to च्यायला by मी_ओंकार