Skip to main content

सोंगट्या, कवड्या, गंजिफा आणि सारीपाट

लेखक अभिरत भिरभि-या यांनी गुरुवार, 17/09/2009 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
म्हैसूरजवळच्या एका संग्रहालयातील ही छायाचित्रे. माझ्या मित्राकडे सापडली. मी यातील अनेक गोष्टी प्रथमच बघितल्या होत्या. कदाचित तुमची ही पहिलीच वेळ असेल म्हणून शेअर करतोय :) मोबाईल कॅमेर्‍याने काढल्यामुळे दर्जा मर्यादित आहे. सांभाळून घ्या.

माणिक प्रभू

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 17/09/2009 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच हे गाणे ऐकायला मिळाले. http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/1425.htm श्रीनिवास खळे सोडल्यास ह्या गाण्याचे गीतकार, गायक मला माहित नव्हते. ह्याचे गीतलेखक माणिक प्रभू म्हणजे उत्तर कर्नाटकात बीदर येथे १९ व्या शतकात एक माणिक प्रभू नामक संत होऊन गेले तेच का? ते मराठी भाषिक होते का? रतिलाल भावसारांविषयी कुणाला काही माहित आहे का? त्यांची अन्य कुठली गाणी प्रसिद्ध आहेत का?

पुन्हा केव्हातरी

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 16/09/2009 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
संवाद काही राहिले, साधू पुन्हा केव्हातरी काही तराणेही नवे, छेडू पुन्हा केव्हातरी! "सांगू पुन्हा केव्हातरी" नादात मागे राहिल्या, सांगायच्या गोष्टी अशा, सांगू पुन्हा केव्हातरी झाले कधी हाराकिरीचे वाद; केली भांडणे, तेव्हा असे का वागलो, बोलू पुन्हा केव्हातरी दोघांसही काहीतरी होते जरी मागायचे, आली कधी ना वेळ ती, मागू पुन्हा केव्हातरी! सांगून नाही भेटलो तेव्हा; कधी भेटूनही हे एवढेसे बोललो, "भेटू पुन्हा केव्हातरी" आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे, काही नवे आकारले, पाहू पुन्हा केव्हातरी!

हे असे का?

लेखक अमृतांजन यांनी बुधवार, 16/09/2009 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपुर्वी एका रेडीओ स्टेशनवर एक नाटीका चालू होती ती ऐकत होतो. सर्व पात्रे स्त्रीया होत्या व मुख्य पात्राला (समाज सेविकेच्या भूमिकेत) एक अनाथ बालिका तिच्या पालकांनी त्यागलेली सापडते. ती त्या खेड्यातल्या स्त्रीयांशी बोलत असते. मुख्य पात्र: (अशा आशयाचे विधान होते)- "मला एक अनाथ बालिका तिच्या पालकांनी त्यागलेल्या अवस्थेत सापडली आहे. पहा किती गोरी-गोरीपान, रुपाने सुंदर अशी आहे, तिला पदरात घ्यायला आहे का तुमच्यापैकी तयार?" त्यातील "किती गोरी-गोरीपान, रुपाने सुंदर अशी आहे" ह्या संदर्भाने मी संतापलो.

वस्तरा टी

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 16/09/2009 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबा, नविन गाडी आली आहे बाजारात. लय भारी आहे. घेउ का" नउ महिने झाले आधीचा रणगाडा घेउन. आता परत. " ती छोटु ला देउ. आमचे अंडरस्टँडींग आहे. मी वापरायची नंतर त्याला द्यायची" काय सांगतोस? तो पण तुझ्या लायनीला आला का? हे केंव्हापासुन? "तुम्ही 'शोषीत महिला उद्धार 'संघाचे अध्यक्ष झालात तेंव्हापासुन" अरे पण आता वस्तरा टी मोहीम सुरु आहे ना? " अहो बाबा, वस्तरा टी नाही ऑस्टॅरीटी मोहीम. तुमची सदावर्ते बाईंची शिकवणी फुकटच गेली. इंग्लिश चे वांदे तसेच आहेत". हो रे बाबा. काल मिटींग मधे साहेब इंग्लिश मधेच बोलला. त्यामुळे सगळे डोक्यावरुन गेले.

कालची खादाडी सुरळीच्या वड्या (उर्फ खांडवी)

लेखक गणपा यांनी बुधवार, 16/09/2009 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, काल सक्काळी सक्काळी मिपा उघडल नी समोर सुरळीच्या वड्या पाहुन चचलो.(हा तात्यापण रोज लोकांना चचवण्याचे नवनवीन उपाय शोधत असतो. विमा एजंट आहे की काय कोण जाणे.) (अजुन दिसतेयती बेटी पहील्या पानवर पण हॅ..हॅ..हॅ..हॅ.. आज मेरेपास भी वडी है.) तर सांगतो काय की ही सुरळीची वडी माझी अतिप्रिय. तात्याच्याच शब्दात सांगायच तर या वडी वर आमचा लै जीव. काय कराव सुचेना, इकडे मोजुन २-३ भारतीय हाटेलं आहेत. तिथ काही हे असले नेमके मला आवडणारे पदार्थ मिळत नाहीत. बर स्वतः कराव तर, हा प्रयोग मी मागे १० वर्षांपुर्वी अतीसुक्ष्मलहरीभट्टीत केलाहोता. सुदैवाने तेव्हा घरात कुणी नव्हत.

उत्तम मिसळ मिळणारी ६० ठिकाणे

लेखक नंदू यांनी बुधवार, 16/09/2009 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर हा विषय अतिशय घिसपिटा असू शकतो याची पुर्ण कल्पना आहे तरिही FYI. उत्तम मिसळ मिळणारी ६० ठिकाणे १ ) अण्णा बेडेकर , पुणे २ ) मनशक्ती के॑द्र , लोणावळा ३ ) मामलेदार , ठाणे ४ ) मूनमून मिसळ , डो॑बिवली ५ ) संजिवनी - माडिवालेकॉलनी , टिळक रोड ६ ) रामनाथ - साहित्य परिषदे जवळ , टिळक रोड ७ ) श्री - शनिपारा जवळ ८ ) नेवाळे - चिंचवड ९ ) ज?श्री - बजाज ऑटो समोर अकुर्डी . १० ) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा . ११ ) कुंजविहारी , ठाणे स्टेशन १२ ) जुन्नर बस स्थानक . १३ ) फडतरे , कलानगरी .

ज्येष्ठ हार्मोनिअम वादक अप्पा जळगावकर यांचे निधन

लेखक खडूस यांनी बुधवार, 16/09/2009 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ हार्मोनिअम वादक अप्पा जळगावकर यांचे आज सकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने निधन झाल्याची बातमी आत्ताच वाचली. या थोर कलाकारास आमची विनम्र श्रध्दांजली .