लेखकनानबायांनी शुक्रवार, 25/09/2009 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
आईचा गोंधळ घालते आईचा जोगवा मागते हे उषाताईंचे विस्णुदासांचे गाणे ताबड्तोब/ लौकर हवे आहे. कुणाकडे mp3 असल्यास माझ्या आईच्या इ मेल आयडी s.phadnis217@gmail.com वर पाठवाल का???
लेखकदिपाली पाटिलयांनी शुक्रवार, 25/09/2009 03:33 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्यः
४ कप मैदा (मैदा+गव्हाचे पीठ किंवा गव्हाचे पीठ, मी गव्हाचे पीठ घेतलेय...)
२ टीस्पून यीस्ट
१/२ कप + २ टेस्पून साखर
१.५ कप कोमट दुध
१ टेस्पून मीठ
१/४ कप बटर किंवा तुप (याचं प्रमाण जेव्हढं जास्त तेव्हढा खुसखुशीतपणा वाढेल...)
कुटलेली दालचीनी, जायफळ
आले बारिक तुकडे करुन
कृती:
१) एका वाडग्यात २ टेस्पून साखर + २ टीस्पून यीस्ट मिसळुन घ्यावे.
२) साखर्+यीस्ट मध्ये १/२ कप कोमट दुध घालाव
लेखकटारझनयांनी शुक्रवार, 25/09/2009 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स ,
ढिष्क्लेमर्स :
१. वांङमय लिहीण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे .. :) लहान तोंडी लै मोठा घास घेतोय संभाळून घ्या ;)
टारझन ही माझी अफ्रिकन इमेज .. माझी रियल इमेज आणि व्हर्चुअल इमेज ह्या मधे जी काही कष्मिषकिष्मिश का काय रे .. चाललं होतं त्याच्या परिणाम म्हणजे हे वांङमय ! सगळे हलकेच घ्यायचे आहे बरं !
२. कमजोर हृदयाच्या लोकांना लेख अतिशय हिण& हिणकस वाटण्याची शक्यता आहे , त्यांनी इथेच थांबलेलं बरं ! पुन्हा "मिपावर हे काय येतंय ?
लेखकदेवदत्तयांनी शुक्रवार, 25/09/2009 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष २००८. पुण्यात एअरटेलचे प्रिपेड कार्ड घेउन बहिणीला मुंबईत दिले होते. पण काही कारणाने त्यावरून काही संपर्क करीता येत नव्हता. कार्डमध्ये बाकी असलेले पैसे ही पाहता येत नव्हते. कसातरी ग्राहक सेवेचा क्रमांक शोधून काढला. पण कार्ड पुण्याचे, मी ठाणे/मुंबईत. ह्या वरून त्यांनी मला भरपूर फोनाफोनी करावयास लावली. त्यातच एकाने मला ९८२००९८२०० हा नंबर दिला म्हणाला "ह्या क्रमांकावर एअरटेलला संपर्क करा." मला खात्री होती की तो क्रमांक हच/वोडाफोनचा आहे. पण त्यास माहीत नव्हते बहुधा.
लेखकप्रदीपयांनी गुरुवार, 24/09/2009 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
ही गाणी 'काळी' आहेत, कारण त्यांना दु:खाची तीव्र झालर आहे. नैराश्याची, वैफल्याची गडद छटा ह्या गाण्यांवर आहे. ही तिन्ही गाणी चित्रगुप्त ह्या थोड्या दुर्लक्षिलेल्या पण अत्यंत गुणी संगीतकारांकडे रफीसाहेबांनी अप्रतिम गायिलेली आहेत. दु:खाच्या चढत्या श्रेणीने (माझ्या मते, अर्थात) मी ती येथे देतो. पहिली दोन गाणी राजेंद्रकृष्ण ह्यांची आहेत. तिसरे साहिरचे.
गाण्यात शब्द सर्वात महत्वाचे, त्यानंतर संगीत, गायन इ. सर्व. तेव्हा ह्या गाण्यांचे शब्द देत आहे, त्या नादात अपरिहार्यपणे लेख मोठा झाला आहे.
पहिले गीत आहे 'मेरा क़सूर क्या है?
लेखकसुनिल पाटकरयांनी गुरुवार, 24/09/2009 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या परिचयातील एका बाईला मी सहज विचारलं. तुमचा मुलगा सध्या काय करतो त्यावर त्या म्हणाल्या एका कंपनीत टेंपरवारी (टेंपररी) लागलाय.गाडी चालवणारे अनेक बहाद्दर गाडीचा वेग कमी झाला कि मोसम( मोशन) तुटला असं म्हणतात ,मराठी प्रमाणे इंग्रजीचा विपर्यास्त करणारे महाभागही कमी नाहीत, मुलांना सायकल शिकवतांना पायंडल मार असं म्हणणारेही खूप आहेत.राँकेल भरण्यासठी पुनेल(फनेल) आण अशी घरातील जुनी माणस अजुनही म्हणतात.वाँशरला वायसर..इंजेक्शनला... इंजिक्शन .इन्सपेक्टरला....इनिसपेक्टर म्हणणारे आणि. कंडक्टरला.. कंडाँक्टर असं खूप जण म्हणतात..
आपल्या भोवतीही अशा गंमती होत असतीलच.
लेखकयोगी९००यांनी गुरुवार, 24/09/2009 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर सदा सरवरणकरांना काँग्रेसने आपल्याकडे खेचलेच...
यावेळी सत्ता मिळण्याची संधी असताना उद्धव ठाकरे यांनी आदेश बांदेकरसारख्या काल परवा सेनेत आलेल्या माणसाला माहिमचे तिकीट देऊन काय साधले? मिळणारी एक जागा आपणहून काँग्रेसला ( किंवा मनसेला) दिल्यासारखे आहे.
या निम्मित्ताने एक गोष्ट विचारावी वाटते. काहीही राजकीय अनुभव नसलेल्या कलाकारांची लोकप्रियता कॅश करण्यासाठी बरेचसे पक्ष ( प्रामुख्याने भाजपा) त्यांना उमेदवारी देते. या कलाकारांचा राजकीय performance (मराठी प्रतिशब्द..?) काय असतो ?
लेखकप्रभोयांनी गुरुवार, 24/09/2009 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या काही चारोळ्या मी तिच्यासाठी लिहिल्या होत्या...पण तिला सांगण्याची वेळच आली नाही .....
जाउद्या मंडळी..ते पुन्हा कधीतरी...
१. पारिजातक
सकाळ सकाळ अंगणात
पडतो पारिजातकाचा सडा जसा|
रांगोळी काढताना तुला पाहिलं
जीव झाला माझा वेडा तसा ||
२. तिळ
तू जवळ असलीस
की पडतं चंद्राचं चांदणं |
चंद्राचा डागच मला जास्त आवडतो
म्हणून तर तुझ्या गालावरच्या तिळाला न्याहाळणं ||
३. असणे-नसणे
तू समोर असतेस
तेंव्हा बोलू देत नाहीस |
तू समोर नसतेस
तेंव्हा झोपू देत नाहीस ||
४.वाट
वाट बघत माझी
होतीस उभी तू स्टॉपवर |
मुद्दामच उशीर केला
जीव जडलाय तुझ्या लटक्या रागावर ||
५.
लेखकफ्रॅक्चर बंड्यायांनी गुरुवार, 24/09/2009 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
कवितांचा एक कारखाना चालवतो मी
एकाच साच्यातल्या कविता छापतो मी
आठवणींचा बाजार , प्रेमाचा आजार
वेड्यागत असच काहीतरी , बरळतो मी
गावरान गोडवा न ठाउक मला
उगाच शब्दांचे काना मात्रा, चुकवतो मी
हवे ते, जेंव्हा नाही गवसत
मारुन मुटकुन शब्दांना, घुसडवतो मी
विषयाची गरज, प्रसंगाची मागणी अशा-
गोंडस नावाखाली शिवराळ शब्द, पेरतो मी
टिकाकारांना त्यांच्याच भाषेत प्रत्युतर
कुठल्याही व्यासपिठावर, भुंकतो मी