Skip to main content

झाले गेले विसरुनी जाऊन

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 01/06/2009 या दिवशी प्रकाशित केले.
झाले गेले विसरुनी जाऊन झाले गेले विसरुनी जाऊन, सांग तू माफ करशील का? करशील का? || ध्रु || न जुळू शकल्या आपूल्या तारा न फुलू शकला मनमोर पिसारा माणूस म्हणूनी ओळखशील का? सांग तू माफ करशील का? करशील का? || १ || उलटे सुलटे पडले फासे दान दैवाचे हातात न गवसे रिते हात पकडशील का? सांग तू माफ करशील का? करशील का? || २ || न लागली मेंदी हाती न लागले कुंकू माथी अखेरचे तू बघशील का? सांग तू माफ करशील का? करशील का? || ३ || - पाषाणभेद
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2031
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

न लागली मेंदी हाती न लागले कुंकू माथी अखेरचे तू बघशील का? "शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात"आठवले! क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा

मस्तच की

न लागली मेंदी हाती न लागले कुंकू माथी अखेरचे तू बघशील का? अखेरचे येती माझ्या हेच शब्द ओठी.. लाख चुका असतील केल्या.. केली पण प्रिती..! या गाण्याची आठवण झाली. कविता छान आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/