Skip to main content

मायावतींचा असाही दलित उध्‍दार

लेखक मड्डम यांनी मंगळवार, 29/09/2009 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
दलितांच्‍या नेत्या असल्‍याचा आणि त्यांच्‍या उत्‍थानासाठी झटण्‍याचा दावा करणा-या बसपा सुप्रिमो मायावती सत्तेत आल्‍या. आणि अनेकांना आता सोन्‍याचे दिस येतील असे वाटले. मात्र झाले वेगळेच सत्तेवर आल्‍या-आल्‍या यापूर्वी त्रासदायक ठरलेल्‍या अधिका-यांच्‍या बदल्‍या, चौकशा आणि निलंबने यातच सुरूवातीची वर्षे घालविल्‍यानंतर आता बहन मायावतींनी पार्क उभारणीचे (स्‍वतःचे पुतळे उभारण्‍याचे) महत्‍कार्य हाती घेतले आहे. ते बरेच वादग्रस्‍तही ठरले. अनेक राजकीय पक्षांचा विरोध आणि न्‍यायालयाचा आदेश डावलून ते अजुनही सुरूच आहे. उत्तर प्रदेशचे राजकारण असूयेच्‍या पायावर उभे आहे. ही गोष्‍ट तर सर्वमान्‍यच आहे.

हास आयुष्या

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 29/09/2009 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
सुरांनी मांडली दारी तुझ्या आरास आयुष्या अरे, आता तरी सोडून चिंता हास आयुष्या ! कधी काट्यापरी सलणे, कधी गंधाळणे, फुलणे दिले तू वेदनेला चांदण्यांचे श्वास आयुष्या ! तुला माझी, मला त्याची सदा हुलकावणी चाले, जिवाचा खेळखंडोबा पुन्हा केलास आयुष्या जिथे होते तुझे घरटे, अता ती मोडली फांदी तसे माझे तरी उरले कितीसे श्वास आयुष्या ? कधी जन्मांतरीचे आपले नाते खरे होते ? कधी होतास तू माझ्याचसाठी ख़ास आयुष्या ? दिवे मंदावता येशील माझ्या सोबतीसाठी मला तू एवढा देशील का विश्वास आयुष्या ?

न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार

लेखक अगोचर यांनी मंगळवार, 29/09/2009 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
"न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार" हे योगेश्वर कृष्णाचे वाक्य लहानपणापासुन ऐकतो आहे. मिपावरील रसिकांना त्याची अजुन जास्त ओळख आहे का ? ते कोणाच्या कुठल्या रचनेमधे आले आहे ? आंतरजालावरही ते शोधण्याचा प्रयत्न केला. पण सगळीकडे त्याचा सर्वश्रुत वचनासारखाच उपयोग केला आहे. पुलंनी ते अभ्यासक्रमात असण्याचा उल्लेख केला आहे ("करी शस्त्र न धरी चार युक्तीच्या गोष्टी सांगेन" अश्या अन्वयासकट). त्यामुळे कदाचित मागच्या पिढीतील लोकांना कदाचित जास्ती माहिती असेल.

अंगुठे

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 29/09/2009 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
अंगुठे आज या "मिसळपावा"वर "मिसळभोक्ते" किती येती | व्रते "एकलव्या"ची जरी घेती, बाण ते स्वैर सोडिती || बरे जरी आजचे द्रोणही, मुळी "अंगठा" न मागती | मात्र हे "मिभो" सर्वत्र, काय "अंगठा"च दाविती || अरे थांबा, नका दावू, "अंगुठे" तुम्ही सर्वत्र | न ते "स्वाक्षरी" बघती, "अंगुठे" काय पाहतील? ||

३३ कोटी

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 29/09/2009 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच बोलताना कोणीतरी म्हणाले की ३३ कोटी देव आहेत. सहज विचार केला तर ज्या वेळेस देव ही संकल्पना आस्तित्वात आली तेंव्हा ज्ञात जगाची लोकसंख्या सुद्धा ३३ कोटी नसेल. मग हे ३३ कोटी देव आले कोठून? जिथे १०० कौरवांची नावेच कोणाच्या लक्षात नाहीत तिथे ३३ कोटी कसे लक्षात रहाणार. गणपतिची फ्यामिली ( वडील शंकर ,आईपार्वती , भाऊ कार्तिकेय , पत्न्या रिद्धी आणि सिद्धी ) विष्णूची फ्यामिली ( पत्नी लक्ष्मी आणि दशावतारातील इतर पत्न्या) ब्रह्मदेवाची फ्यामिली. विरोबा वेतोबा भैरोबा म्हसोबा म्हाळसाई सटवाई हे स्थानीक उपदेव असे ज्ञात सगळे मिळूनसुद्धा ३३ कोटी होत नाहीत.

कथा दोन साधुंची

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 29/09/2009 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
हैयो हैयैयो यांनी न्यायशास्त्रातील एका कोड्यावर नुकतीच एक उद्बोधक आणि रंजक चर्चा घडवून आणली. त्यातून एक मूलभूत प्रश्न निर्माण झाला. तो असा की सामाजिक अन्यायाची सुरुवात नेमकी कुठुन होते? मी पूर्वी लिहिलेल्या या कथेत या प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला आहे. - युयुत्सु राजा विक्रमादित्याने आपला हट्ट काही सोडला नाही. त्याने झाडावरचे प्रेत आपल्या खांद्यावर ऒढून घेतले आणि तो स्मशानाचा रस्ता चालू लागला. राजाच्या चिकाटीने प्रभावित होऊन प्रेतामधला वेताळ मानवी वाणीने बोलू लागला आणि म्हणाला, "राजा तुझ्या जिद्दीचे मला खूप कौतुक वाटतॆ.

मुजरा

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 29/09/2009 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
स्वयंभु मी, मुजरा घालत कुणाच्या सदरेत नाही वगळले मलाच, नाव माझे कुठल्याच बखरेत नाही हरहुन्नरी मी, बिलंदर होउन जगलो पण खासा कुणाच्या भरलो नजरेत नाही सगळे दिवस काळ्या आमावस्याच माझा चंद्र अजुन माझ्या नजरेत नाही सगळ्या वरवरच्या मलमपट्या अंतरीच्या तारा छेडणारी नशा मदिरेत नाही सजावट एकमेकांना भुलवण्यासाठीच गणेशास बांधेल ती भक्ती कुठल्याच मखरेत नाही

माहित नाही

लेखक मिसळभोक्ता यांनी मंगळवार, 29/09/2009 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा: समझनेवाले, समझ गये है, ना समझे वो अनाडी है) माहीती नाही, कोण ते लोक, ज्यांच्या प्रेमाला प्रेम मिळाले.... आम्ही तर फक्त, कळ्या मागितल्या, पण मिळाले, काट्यांचेच हार निघून गेला.... निघून गेला..... निघून गेला, प्रत्येक मित्र देऊन, दोन क्षणांची साथ वेळ कुणाला, इथे जो देतो, वेड्यांचीही साथ मला तर माझी छायाही नेहमीच मिळाली बेजार आम्ही तर फक्त, कळ्या मागितल्या, पण मिळाले, काट्यांचेच हार ह्यालाच जीवन म्हणतात तर असेच जगुन घेऊ तक्रार नाही करणार ओठ शिवून घेणार अश्रू पिऊन घेऊ दु:खाला नाही घाबरणार कारण शंभरदा ते मिळणार आम्ही तर फक्त, कळ्या मागितल्या, पण मिळाले, काट्यांचेच हार हाय काय
काव्यरस

माझा प्रियतम

लेखक मिसळभोक्ता यांनी मंगळवार, 29/09/2009 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा: ओळखा पाहू ?) माझा प्रियतम गेला रंगून आणि दूरध्वनी केला तिथून तुझी आठवण मला येते हृदयात आग माझ्या लावते मी सोडुन हिंदुस्तान खूप पस्तावलो, खूप पस्तावलो.. झाली चूकच माजी, तुला घेऊन नाही आलो घेउन नाही आलो... मी म्यान्मार्च्या गल्लीत आणि तू आहे डेराडुनात, तूझी आठवण गं येते.. तूझी आठवण गं येते.. जबरा, हाय का नाई ? हरलात ?? हरलात ???? कळवा.. खरडवहीतून उत्तर कळवण्यात येईल...
काव्यरस