उन्हात लखलखणारे झुंबर
मनात वसलेला गुलमोहर
नजर खिळवुनी जिकडेतिकडे
नजरबंदिचा खेळ खेळतो
लाल तांबडे शेले उडवित
हिरव्या छायेतुन सळसळतो
गारुड याचे चराचरावर
कधि पानांच्या पडद्याआडुन
हळूच हसतो लाल तजेला
कधि तेजाचे पलिते घेउन
फुलांनीच हा रसरसलेला
वैशाखाचा घुमवित जागर
घरी, अंगणी, वाटेवरती
कुठे माळरानी एकांती
तप्त उन्हाच्या काहिलीतही
मोहरलेली याची कांती
पायांखाली कुंकुम-केशर
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7020
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा
१२ लाख
जबरदस्त!!!
अहाहा !! फार
तेजाचे पलिते
छान.
वाह!
हेच
In reply to वाह! by ऋषिकेश
वाह ! मस्तच
फार सुंदर कविता
दत्ताभाऊ
In reply to फार सुंदर कविता by दत्ता काळे
गुलमोहर.......
अवर्णनीय !
गुलमोहोरा
छान. मस्तच
सदैव ताजी राहील हि कविता. एकदम सुंदर . . .