Skip to main content

वर्णन (तमाशातले सवाल जबाब): पुन्हा लेखन

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 01/06/2009 या दिवशी प्रकाशित केले.
वर्णन (पुन्हा लेखन) (जुने वर्णन येथे आहे) (चालः तमाशातले सवाल जबाब) (सवाल जबाबात प्रत्येक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करतो. प्रस्तुत सवाल जबाबात तो आणि ती एकमेकांची स्तुती करतात.) तो: अटकर बांधा गोरा गोरा खांदा ss पदर उडतोय वार्‍यावर चवळीची तू शेंग शेलाटी लवलव लवलव करती गss ग ग ग गss कोरस: आली नटून थटून ही बया, हो पाव्हन, लावती लळा तुम्हा पुन्हा पुन्हा घेवुन जा घरला एकदाची, नायतर ज्वानी जायची वाया... (माझ्या रामा तू रं ss) ती: अक्क्डबाज मिशी तुझी रं डोईचा शेमला उडतोय वार्‍यावरss मनामधला मर्द पाहण्या नजर माझी वळते रss रssरsरsर कोरस: आली नटून थटून ही बया, हो पाव्हन, लावती लळा तुम्हा पुन्हा पुन्हा घेवुन जा घरला एकदाची, नायतर ज्वानी जायची वाया... (माझ्या रामा तू रं ss) तो: गोरा रंग तुझा दुधेरी ss केस काळे मखमाली हासणं तूझं मंजूळ मोठं जणू गुलाब फुलले गाली ग ग ग गss कोरस: आली नटून थटून ही बया, हो पाव्हन, लावती लळा तुम्हा पुन्हा पुन्हा घेवुन जा घरला एकदाची, नायतर ज्वानी जायची वाया... (माझ्या रामा तू रं ss) ती: पहीलवानाची छाती तुझी रं न कधी पाहिली अशी भरदार नजर न लागो तिला माझी कोन दुसरा टिकल तिच्या म्होरं ? ss रssरsरsर कोरस: आली नटून थटून ही बया, हो पाव्हन, लावती लळा तुम्हा पुन्हा पुन्हा घेवुन जा घरला एकदाची, नायतर ज्वानी जायची वाया... (माझ्या रामा तू रं ss) तो: दात तुझे मोती असती ss नाक असे अणुकूचीदार भुवयी ठळक तिरकामठी नजरेचे मारती शर ग ग ग गss कोरस: आली नटून थटून ही बया, हो पाव्हन, लावती लळा तुम्हा पुन्हा पुन्हा घेवुन जा घरला एकदाची, नायतर ज्वानी जायची वाया... (माझ्या रामा तू रं ss) ती: पायतान आस तुझं कोलापुरी वाजतय लयीत करकर खरा मावळा शोभे तु तर पाहिजे हाती फक्त तलवार ss रssरsरsर कोरस: आली नटून थटून ही बया, हो पाव्हन, लावती लळा तुम्हा पुन्हा पुन्हा घेवुन जा घरला एकदाची, नायतर ज्वानी जायची वाया... (माझ्या रामा तू रं ss) तो: पाहणं तुझ चोरून चोरून ss राग तुझा लटका ग लाजलीस हे सांगाया फुका मारसी मुरका ग ग ग गss कोरस: आली नटून थटून ही बया, हो पाव्हन, लावती लळा तुम्हा पुन्हा पुन्हा घेवुन जा घरला एकदाची, नायतर ज्वानी जायची वाया... (माझ्या रामा तू रं ss) ती: वागनं तुझं आहे मल्मली रुबाब तुझा मोठा रं मन मारत झुरते कधीची जवळ ये धावत लवकर ss रssरsरsर कोरस: आली नटून थटून ही बया, हो पाव्हन, लावती लळा तुम्हा पुन्हा पुन्हा घेवुन जा घरला एकदाची, नायतर ज्वानी जायची वाया... (माझ्या रामा तू रं ss) तो: लगबग लगबग तुझं चालणं ss काम करतीया घाईत जिंकुन घेई मनास माझ्या होशी गळ्यातली ताईत ग ग ग गss कोरस: आली नटून थटून ही बया, हो पाव्हन, लावती लळा तुम्हा पुन्हा पुन्हा घेवुन जा घरला एकदाची, नायतर ज्वानी जायची वाया... (माझ्या रामा तू रं ss) - पाषाणभेद ०१/०६/२००९
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1234
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया