लोणावळा ते पुणे
व्हिस्टा डोमच्या ‘दख्खनच्या राणी’तून लोणावळ्यापर्यंत प्रवास केल्यावर आता वेळ होती, परतीला ‘01007 दख्खन विशेष एक्सप्रेस’मधून पुण्याला परतण्याची. त्यासाठी मी लोणावळ्याच्या फलाट एकवर येऊन बसलो होतो. लोणावळ्यात हलका पाऊस सुरू होताच, शिवाय स्थानकातून आजूबाजूला दिसणारे हिरवेगार डोंगर ढगांमध्ये अर्धे लपलेले दिसत होते.
सध्या आरक्षणाशिवाय कोणालाही रेल्वे प्रवासाची परवानगी नसल्यामुळे लोणावळ्याच्या तीनही फलाटांवर थोडीशीच वर्दळ दिसत होती. एरवी ’15 ऑगस्ट’ म्हटल्यावर या फलाटांवर किती गर्दी दिसली असती. वर्दळ नसल्यामुळे स्थानकावरचे स्टॉलही साडेआठ वाजताही बंदच होते.
मिसळपाव