आणि बांध फुटला
ज्या घरात पालक आणि मुले ह्यांच्यात अभ्यासावरुन भांडणे असतात त्यांना मी एक प्रश्न न चुकता विचारतो.
" काहो, मुलाला जवळ बसवुन पाठीवरुन किंवा डोक्यावरुन हात फिरवल्याला किती दिवस झाले"?
बहुतेकांच्या चेहेर्यावर 'कुठल्या येड्चापाच्या नादाला लागलो 'असे भाव असतात.
___________________________________________________________
चिरंजीव माझी कुठलीही मदत न घेता आपणच मिळवलेल्या नोकरीवर जाण्याचा पहीला दिवस. बुट घातले आणि दरवाजा उघडणार इतक्यात मी त्याला हाक मारली, "बेबी"( मला मुलगी नाही, आणि आहे ती खुप लांब असते). तो वळला, आणि माझ्या ओठाचा चंबू बघुन परत फिरला. हसत हसत गालाचा एक छान पापा दिला. इतक्यात बायकोने दरवाजा उघडला होता. आणि ते दृश्य समोरच्या घरातील नवविवाहीतेने बघितले.
संध्याकाळी बायकोने तीने उधळलेली मुक्ताफळे अयकवली. आता दरवाजा उघडा होता हा एक निव्वळ अपघात होता. आणि उघडा आहे माहीत असते तरी माझ्यात काही ही फरक पडला असता. माझे घर , माझा मुलगा कुणाला भोचकपणा करायची काय गरज?
तीने बायकोची शिकवणी घेतली होती.
आता मुलगा मोठा झाला.
अशाने मुले पंगु होतात.
कायम आधार लागतो. वगैरे वगैरे.
ती काय म्हणते त्याकडे लक्ष देउ नकोस असे बोलुन मी विषय बंद केला.( मनातल्या मनात एक सणसणीत शिवी दिली- जातेस कुठे, येत्या सहा महिन्यात " काकु, जरा काकांना ह्यांच्याशी बोलायला सांगा हे नक्की)
हासनची मेहुणी आली आहे. हीला मुलबाळ नाही. त्यामुळे चिरंजीवांची चैन आहे सध्या. माय पण आणि मावशी पण. दिवसाला तासभर वय वर्ष २
------------------------------------------------------------------------------------------------------
काही दिवसापुर्वी माझ्या एक विद्यार्थ्याचा फोन आला. चिरंजीव लंडनला सॉफ्टवेअर इंजिनयर आहेत. ४ वर्षांनी भारतात आला होता.
एक संध्याकाळ माझ्यासाठी खास राखुन ठेवली होती. व्हिस्की बरोबर खुप गप्पा झाल्या. तिथली परिस्थीती कळली. ह्याच्या कडे 'स्किल लेवल'
उच्च पातळीची असल्याने फरक पडला नव्हता. उलट प्रगतीच झाली होती.
काय , रे घरीच राहतो आहेस ना? का हॉटेलात? - मी
"नाही सर, बाबांनी घर छान रेनोवेट केलय, कमोड पण बसवलाय. त्यामुळे घरीच."
( एके काळी चिरंजीव घरातुन दिगंबर अवस्थेत कॉमन टॉयलेट्ला धावुन जायचे)
"आई काय म्हणते आहे"- मी
"खुष आहे, स्टे वाढवायला सांगते आहे"
"मग राहा की" मी
" बायकोला ताजमहाल दाखवायचा आहे"
" ताजमहाल कुठे पळुन जातोय, पुढच्या वेळेला बघ. म्हातारी आसुसलेली आहे, तुझ्या सहवासाकरता, जा कुशीत तीच्या. तुझ्या मुलाला पण जाउ दे"
"छे, हो सर, मला तसे वाटत नाही. मी तर फक्त कडक रुप बघीतले आहे तीचे."
" अरे, ती गोष्ट त्या वेळची गरज होती" मी
"बायको समोर अवघड वाटेल"
"तुझी बायको काय थेम्स नदीच्या काठी जन्माला आली काय?, तिथे वाढलेली असली तरी मुळ भारतीयच आहे ना? आणि इंग्रज मंडळी आपल्या म्हातार्याना काय प्रेम देत नाहीत" - मी
"सगळ्यासमोर कसे जमणार, सर"
" अरे ***** मी काय तुला प्रेस कॉन्फरन्स भरवायला सांगतो आहे का?, आणि एवढा अवघडत असशील तर दे बायकोला शॉपिंगला पाठवुन. म्हातारी मला गावदेवी बाजारात भेटली होती. तसे थेट काही म्हणाली नाही. पण तीने काहीही न म्हणता तीला काय म्हणायचे आहे ते मला समजायची अक्कल देवाने दीली आहे." मी
हो, सर.
________________________________________________________________काल आठ वाजता परत फोन आला. ताजमहाल भेट रद्द झाली होती. लेक जवळ आल्यावर म्हातारीच्या डोळ्यातला ओघ एक तास थांबला नाही.
आणि बांध फुटलेला होता.
___________________________________________________________खरेच का आई जन्मदात्या आई वडीलांचे प्रेम घ्यायला आणि द्यायला वय आड येते? १९ वर्षी आपल्या आईला गमवुन बसलेल्या कर्म दरिद्र्याला ही मानसिकता नाही समजत बॉ. आजही कुणाचीही लाज न बाळगता तीच्या कुशीत शिरुन लहान होण्यास आवडले असते.
वाचने
4463
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
:)
In reply to :) by अवलिया
आणि हो,
In reply to आणि हो, by अवलिया
आणि बांध फुटला पार्ट २
In reply to आणि बांध फुटला पार्ट २ by सहज
मनापासुन
(विषय नेहमीचाच दिलेला आहे)
+ सहमत
" आणि बोळा
आवडला...
In reply to आवडला... by बिपिन कार्यकर्ते
मि
In reply to आवडला... by बिपिन कार्यकर्ते
बरेच असतात
- एवढ्याशा घरात खूप गर्दी होते (घे की मग मोठे घर, आता छापतोयस ना इतके $$$)
- सारखे लोक येतात भेटायला, मग स्वतःसाठी वेळच नाही मिळत आणि घरच्यांना पण किती त्रास (च्यायला मग आलास कशाला इथे, तिथे होता ना हवा तेवढा वेळ)
- मुंबईजवळ असले की 'travelling' ला 'easy' पडते ना, केवढी ती गर्दी. भितीच वाटते. (हो बरे आहे तुझ्यासारखी लोके बाहेर जातायत, तेवढाच हातभार गर्दी कमी करण्याला)
सध्या तरी इतकीच आठवतायत. पण मला तरी कळत नाही की लहानपणापासून इतकी वर्षे तिथे त्याच वातावरणात राहताना न झालेला त्रास बाहेर गेल्यापासून २-४ वर्षातच अचानक कसा होऊ लागतो. आणि आई बाबांबरोबर राहताना थोडा सो कॉल्ड त्रास सहन केला तर कुठे बिघडले?Bacteria
ह्म्म...
आवडले.
आज भर
काय लिहिलयत सर !
In reply to काय लिहिलयत सर ! by संदीप चित्रे
हेच
छान
प्रेम
कसला गोड लेख लिहिलाय प्रभू सर..
जे बोलता
In reply to जे बोलता by पक्या
सहमत!
मस्तच :)