कोसळोनी यावे .. आभाळ आज वाटे
ओसंडोनी जावे अन् .. जळं साचलेले |
गुंफलेली माला जणू .. व्हावे त्या सरींनी
ओघळलेले मोती व्हावे .. थेंब पावसाचे |
चमचमत्या किरणां सवे .. इंद्रधनू रेखावे
शीळ घुमावी वार्याची .. हिरव्या, ओल्या बना मधे |
सळसळत्या पानांतूनी .. संगीत नवे जन्मावे
रंग रंगी, सुरेल कंठी .. खगांनी मग ते गावे |
रंगीत-गंधीत धात्रीने .. साज सुखाचे ल्यावे
मेघश्याम आभाळ तीला .. क्षितीजावर भेटावे |
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2978
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम!! र
मस्त..
वा! मस्त !!
वा! साधी,
सुरेख कविता
सुंदर कविता!
सळसळत्या
धन्यवाद !
सुरेल रचना !
केवल अप्रतिम..