Skip to main content

चीझ स्कुअर्स

लेखक fulpakharu यांनी शुक्रवार, 18/12/2009 05:03 या दिवशी प्रकाशित केले.
From Untitled Album" alt="" />साहित्य बेसिल १ जुडी (१५ - २० मध्यम आकाराची पाने) पुदिना १/२ जुडी (१५/२० पाने) कोथिंबीर १ जुडी २ टेबल स्पून ऑलिव ऑइल पेपर जॅक चीझ १ बार ४/५ हिरव्या मिरच्या

होतं असं कधी कधी...

लेखक अनामिक यांनी शुक्रवार, 18/12/2009 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
मी अगदी लहान होतो तेव्हा बाबांबरोबर घडलेली गोष्टं (मी ऐकलेली). माझ्या दादाचं शाळेत नाव घालायचं होतं म्हणून बाबा गावातल्याच शाळेत गेले. तिथले कर्मचारी, शिक्षक तसे ओळखीचेच होते, त्यामुळे आधी गप्पा झाल्या आणि नंतर दादाच्या नाव नोंदणीचा फॉर्म भरायला घेतला. त्यात मुलांचं नाव काय असं विचारलं आणि बाबा गोंधळात पडले... घरी दादाला 'दादा'च म्हणत होते सगळे आणि त्यामुळे बाबा त्याचं नावंच विसरले होते... झाली का पंचाईत! सगळे कर्मचारी हसायला लागले.... नाव काही केल्या आठवेना... तेव्हा लोकांसमोर हशा तर झालाच, पण घरी नाव विचारायला आल्यावर काय झालं ते विचारू नका.

हार्दिक निमंत्रण !

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 17/12/2009 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपा परिवार , नमस्कार ! वाचकहो , मिपावर वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या माझ्या कवितांना आपण यथोचित प्रतिसाद दिलात. याच कवितांचा काव्यसंग्रह "साधा माणूस" या नावानं वंदना प्रकाशनाच्यावतिने प्रकाशित होत आहे. हा प्रकाशनसोहळा कोकण मराठी साहित्य परिषद , गिरगाव शाखेच्या विद्यमाने गुरूवार दि.७ जानेवारी २०१०रोजी सायं. ६ वाजता मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ. पुरंदरे सभागृह, गिरगाव येथे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक याच्याशुभहस्ते , पं यशवंत देव आणि ज्योतिर्भास्कर जयंत सळगावकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. .

रिती पोकळी

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 17/12/2009 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
रिती पोकळी तशी दशा या आयुष्याची उद्या वेगळी पुन्हा दिशा या आयुष्याची इथे संपली पहाट, तेथे दुपार झाली कुठे सांज अन कुठे निशा या आयुष्याची? जरा लाभले म्हणे म्हणेतो दुरावलेही, हमी द्यायची कुणी अशा या आयुष्याची? प्रवाहातल्या दिव्यासारखे वहात जाते, हवा नेतसे तशी दिशा या आयुष्याची कुठे कालच्या उन्मादाचा कैफ उडाला? कशी आज ना चढे नशा या आयुष्याची?

लोह्गडचा ट्रेक .

लेखक मॅन्ड्रेक यांनी गुरुवार, 17/12/2009 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार राजमाची येथील यशस्वी ट्रेक नंतर प्रोत्साहित होऊन आमचा - (team elegance) पुढचा ट्रेक लोहगड येथे निश्चित झाला शनिवारी ठरल्याप्रमाणे दुपारी १ वाजता ७ जण जमले. अनपेक्षितपणे आयत्यावेळि १ वीर यायला तयार झाले ( डॉ आनंद नातू)अखेर स्कोर्पिओ मध्ये सामानसुमान कोंबून दाटीवाटीने - ८ जणांची टीम ३ वाजता लोणावळ्याकडे निघाली . मळवली येथे १ फक्कडसा चहा पिऊन आम्ही लोहगडाकडे कूच केले.(वेळ सायंकाळचे ५) खडकाळ रस्ता , वेडीवाकडी वळणे, उंचसखल टेकड्या पार करत आम्ही पुढे जात असतानाच एका वळणावर नान्दिबैलानी हल्ला बोल केले सर्वात पुढे असलेला वीर - नावात अजिंक्य असले तरीही - हरला .

(पुरावा)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 17/12/2009 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
जयवीताईंची सुंदर कविता दुरावा हीच आमच्या पुराव्यामागील प्रेरणा! ;) "देतोस ना उजाळा त्या कुंद कापडांना? होतोस काय अडवा ओढून चादरींना?" अवरुन घे दुपारी तो ढीग ताटल्यांचा ती खूपशी तपेली, किटली न कपबशांचा "फक्कड चहासवे दे सांजा करून भरभर!" उच्चारवात होती मज सूचना निरंतर "देईन 'चंद्र अर्धा' लग्नात जोडलेला त्या गोधडीत अजूनी तू मुक्त सांडलेला?" "आहे तसा शहाणा!" अर्धांग बोलले? वा! संपूर्ण काम झाले "रंग्यास" रे पुरावा!! चतुरंग
काव्यरस

लुटा मौज कराड - बौध्दकालीन लेण्यांच्या सफरीची ...

लेखक दशानन यांनी गुरुवार, 17/12/2009 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापुरहून पुण्यासाठी निघालो होतो सकाळ सकाळी. कुठेतरी चहा घ्यावा म्हणून बाईक जरा हळूच चालवत होतो तोच डाव्याहाताला एक बोर्ड दिसला छोटासाच. बौध्दकालीन लेणी व मार्गदर्शन बाण. थोडासा विचार केला व बघू म्हणून गाडी आत वळवली. काही मिटर आत गेल्यावर रस्ता संपला. आता काहीच कळेना मार्गदर्शक बोर्ड तर इकडेच रस्ता दाखवत होता मग रस्ता गेला कुठे, एक दोन जणांना विचारले तर त्यांनी एक कच्चा रस्ता दाखवला, तो रस्ता आहे हेच मला पटत नव्हते हा विषय वेगळा. पण काही किलोमीटर आत गेल्यावर एक नितांत सुंदर अशी जागा दिसते एक पाण्याचे तळे, तळ्याच्या बाजूला एक शेडवजा बांधकाम असलेले आश्रम.

बुधवारची कविता: (वाढदिवस - ३)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 17/12/2009 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
काही कामात व्यग्र असल्याने बरेच दिवसानी मिपावर आलो आणि हे सुचले. आमची प्रेरणा ओळखलीच असेल. ही बुधवारी सदरे, पाडण्यात वेळ गेला बाटली ठरे कपाटी, गिळण्यात वेळ गेला उडले कुठे कुणीसे, खपले आणी कितीसे परतता मिपावर, गणतीत वेळ गेला लावून ठोकशाही अवांतर चेपताना पडली कधीन रोशनी अंधारात तोल गेला का बुधवारी न येते मज भान चढल्याचे नशा उतरली परंतु गुरवारी वेळ गेला सरसावूनी लेखणी कविता विडंबताना पेशवाच राहीलो अन् गव्हर्नर कोणी झाला
काव्यरस

तुमच्या गावाचे नाव काय?

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/12/2009 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही खेडेगावात राहत असाल, शहरी असाल. तुम्ही राहता त्या गावाचे नाव घ्या, किंवा तुम्हाला माहित असलेल्या कोणत्याही गावाचे (किंवा गावांची नावे) नाव घ्या. त्या गावांची नावे कशी पडली असतील असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय? तुम्ही त्यावर विचार करून ते नाव का ठेवलेय असा कधी विचार केलाय? नक्कीच केला असणार. मी तर बुवा गावाचे नाव कसे पडले असेल त्याचा विचार करतो. उदाहरणच द्यायचे झाले तर: पिंपळगाव. गावात (पुर्वी) पिंपळाची झाडे जास्त. वडगाव : गावात (पुर्वी) वडाची झाडे जास्त होती. (आता कसली झाडे जास्त?) हे झाले आपले सरळसोट नावे असलेली गावे. पण काही गावांची नावे इरसाल असतात.

फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी गुरुवार, 17/12/2009 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात राहण्याचा अजून एक फायदा म्हणजे मुळशी धरण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. कितीही वेळा या परिसरात फिरलो असलो तरी प्रत्येक वेळी गेल्यावर काही तरी नवीन गवसल्याचा आनंद मिळाला आहे. म्हणूनच कुठेच ट्रेकचा प्लॅन नसतो तेव्हा मी वीकेंडला मुळशीमध्ये सापडतो. मुळशीमध्येच ताम्हिणी घाटाच्या आधी (प्लस व्हॅलीच्या आधी) एक सुंदर, अनटच्ड तलाव आहे, जो बऱ्याच तथाकथित भटक्यांना माहीत नाही. तो तलाव, दरी, असंख्य पक्षी, डोंगर, लहानसे खेडेगाव, शाळेत जाणारी मुले, बकऱ्या-गुरे चारणारे लोक असे काही भन्नाट फोटो मिळतात की विचारूच नका. या संधीसाठी मी गेल्या १५ दिवसांत तीन वेळा गेलो आहे.