Skip to main content

गझल तिहाई - सस्नेह आमंत्रण

लेखक अजय जोशी यांनी बुधवार, 16/12/2009 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
गझल संग्रहांचे प्रकाशन आणि गझल मुशायरा दिनांक २० डिसेंबर २००९, रविवार रोजी सायंकाळी ५ ते ८ यावेळात सह्याद्री सदन, हॉटेल विश्वची गल्ली, टिळक रोडजवळ, सदाशिव पेठ, पुणे ३० येथे हा कार्यक्रम होणार आहे. अध्यक्ष : डॉ. राम पंडीत, प्रमुख पाहुणे : डॉ.

कसाब आणि दयेचा अर्ज...

लेखक प्रशान्त पुरकर यांनी बुधवार, 16/12/2009 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरानो... आजच्या मटा मध्ये खालिल बातमी वाचलि... http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5341505.cms शन्का फक्त येवढिच कि कसाब (पाक नागरिक ) पण अफझल गुरु सरखा दयेचा अर्ज करु शकतो का...(त्याल म्रुत्युदन्ड होनार हे मी ग्रुहित धरले आहे)... तसे असल्यास त्याचे पण लाड पुरवावे लागतील पुढे...माझ्या घामाच्या पैशातुन ~X(

('वाढ'दिवस)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 16/12/2009 02:56 या दिवशी प्रकाशित केले.
हा वाढदिवस वाचून आम्हाला आमचा प्रत्येक 'वाढदिवस' आठवला! :D हे रोजचेच फुगणे, बघण्यात वेळ गेला गजरास भर पहाटे कळण्यात वेळ गेला पळलो किती किती मी, वळलो किती किती मी ढळल्या न वळकट्या ह्या जपण्यात वेळ गेला अवळून जाड पट्टा प्यांटीस बांधताना सुटत्या मुजोर दोंदा धरण्यात वेळ गेला अजमावुनी बळाला वजनास उचलताना घटलो असा किती मी? कळण्यात वेळ गेला "रंग्यास" वाढदिवशी ये भान वाढल्याचे पोटामुळेच काटा दिसण्यात वेळ गेला!! चतुरंग
काव्यरस

खरी कमाई....

लेखक भानस यांनी बुधवार, 16/12/2009 02:42 या दिवशी प्रकाशित केले.
अतिशय साध्या साध्या गोष्टी किती सुख देऊन जातात. अनेकदा त्या करणाऱ्याला त्याचा गंधही नसतो. तो आपला नेहमीच्या रहाटगाडग्यात अगदी नकळत ते करून जात असतो. पण ते दुसरे मन मात्र हा चांगुलपणा टिपत असते. आणि कुठेतरी त्या मनातही या अनपेक्षित मदतीच्या ओघाचा जन्म होतो. त्यातल्या निखळ सुखाची त्याला एकदा का गोडी कळली की आपसूक तोही त्या साखळीचा हिस्सा होऊन जातो. मी याबाबतीत खूपच भाग्यवान. अनेक मित्र-मैत्रिणी, ओळखीचे, अनोळखीही माझ्या जीवनात अनेकप्रकारे बंध निर्माण करून गेलेत. ही ’ खरी कमाई ’. सहजी केलेली निरपेक्ष गुंतवणूक.

भिगवणचे परदेशी पाहुणे

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी मंगळवार, 15/12/2009 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
मागल्या आठवड्यात खबर लागली की पुण्यापासून १०० किलोमीटरवर असणाऱ्या भिगवणला नवीन पाहुणे आलेत: रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो ऊर्फ अग्निपंख. मग काय केले दोन लोक तयार आणि गेलो डायरेक्ट तिकडे. पण काही कारण नसताना ट्राफिक जाम लागले पुणे-सोलापूर रोडवर आणि १०० किमी अंतर कापायला चार तास लागले. पहाटे पाच वाजता निघालो होतो, पण साडेनऊला पोचलो तिथे. काही बरे फोटो मिळाले. त्यातलेच दोन मिपासाठी.
सर्व हक्क सुरक्षित.

जे जाणवतं ते नेहमीच सत्य नसतं........

लेखक भानस यांनी मंगळवार, 15/12/2009 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
गेला महिनाभर नीलिमा हळूहळू परंतु पद्धतशीर चाललेला प्रयत्न पाहत होती. पहिले काही दिवस तिला काहीतरी वेगळे आहे असे जाणवले असले तरी, छे! उगाच शंका घेते आहेस. असे स्वतःलाच ती सांगत होती. कालच्या घटनेने तर स्पष्ट दिसलेच. तातडीने यावर बोलायला हवेय हे कळतही होते पण कसे हे समजत नव्हते. नेहाशी आज मनमोकळे बोलून पाहावे, कदाचित ती मार्ग सुचवील म्हणून ती तिच्याकडे निघाली होती. " अग, किती उशीर? मला वाटले आता येतच नाहीस. " नेहाने नेहमीप्रमाणे गोंधळ सुरू केला. " काय बाईसाहेब, फारच गंभीर दिसता आहात. कोणी प्रपोज केलेय का? घरी सगळे ठीक आहे ना? तू आजारी तर दिसत नाहीस. चेहरा का कोमेजला आहे?

घ्या..... केळी..........

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 15/12/2009 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषेत बरेचदा शब्दार्थामुळे काय च्या काय अनर्थ होतात. पण केवळ एखादा शब्दार्थ संप मोडून काढू शकतो हा अनुभव मात्र न भूतो भविष्यति. सामान्यतः एखाद्याला नारळ देणे या वाक्प्रचाराचा अर्थ निरोप देणे काढून टाकणे असा होतो. हात हलवत जाणे म्हणजे रिकाम्या हाताने परत येणे/पाठवणे असा होतो. वाटाण्याच्या अक्षता कोणी पाहिल्यात कोण जाणे पण मराठी भाषेत त्या बरेच महत्वाचे स्थान मिळवुन आहेत. नारळ ,वाटाणे, चणे ,अक्षता, हळद फुटाणे वगैरे कठीण पदार्थ सुद्धा वाक्प्रचारात आले की अनर्थ घडवतात. मिरच्या या वाक्प्रचारातही तिखटपणा सोडत नाहीत. फक्त त्या तोंडाऐवजी नाकाला झोंबतात.

क्रिकेट आणि बिझनेस - हर्षा भोगले

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 15/12/2009 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
हर्षा भोगले हे आपल्याला सर्वांनाच एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक म्हणून माहिती आहेतच. आपल्याला हे देखील माहिती आहे की ते IIM Ahmedabad चे माजी विद्यार्थी. तेव्हा क्रिकेट इतकाच व्यवस्थापन क्षेत्र हा त्यांचा अधिकाराचा विषय. आपल्या सुदैवानी त्यांनी ह्या दोन्ही गोष्टींमधल्या साधर्म्यावर लिहायचं ठरवलं आहे ! http://www.ceolessonsfromcricket.com/index.asp ह्यावर ह्यापुढे आपल्या क्रिकेट आणि व्यवस्थापन, नेतृत्त्व, संघबांधणी इत्यादींबद्दल बरेच वाचायला मिळेल !

तुझ्या विना ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 15/12/2009 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
क्षण एक हा जरासे आज हसून घेईन म्हणतो हसता हसता नकळत थोडे, रडून घेईन म्हणतो...! सुख-दु:खाच्या फूटपट्टीचे निकष लावुनी आयुष्या सरणावर जाण्यापूर्वी, थोडे जगून घेईन म्हणतो...! आयुष्याच्या या रंगपटावर खोटे खोटे जगताना फसवुनी सत्यास, स्वप्नात रंगून घेईन म्हणतो...! गेले ते दिन गेले सये तव सहवासाचे सोनसळी साजिरे तव सहवासाचे, क्षण गुंफून घेईन म्हणतो...! हा प्रवास युगा युगांचा तुजवीण नको नकोसा तव आठवणींना सार्‍या, संगे बांधून घेईन म्हणतो...! विशाल.