Skip to main content

वा रे न्याय !

लेखक माझी दुनिया यांनी बुधवार, 23/12/2009 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
केंद्रिय मंत्री म्हणे वर्षातून ४८ वेळा...आपल्या कितीही नातेवाईकांसकट....विमानाने फुकट प्रवास करू शकतात......म्हणजे माकडाच्या हाती कोलीतंच की ! दुसरी बातमी आता नोकरदारांना मिळणार्‍या सगळ्या भत्त्यांवर कर भरावा लागणार आहे. हा कर पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे १ एप्रिल २००९ पासून लागू होणार असल्याने यंदा चालू वर्षांतच करदात्यांवरील कराचा बोजा वाढणार ! वा रे खासा न्याय ! अर्थमंत्री झोपलात काय ?

प्रकाटाआ म्हणजे काय?

लेखक चिंतातुर जंतू यांनी बुधवार, 23/12/2009 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्यासारख्या नववापरकर्त्याला पडणारा आणखी एक प्रश्नः हे 'प्रकाटाआ' म्हणजे काय? निराकरणाबद्दल अग्रिम धन्यवाद! - चिंतातुर जंतू :S

(आवाहन) अर्थात कसं काय एडीटर बरं हाय का?

लेखक केसुरंगा यांनी बुधवार, 23/12/2009 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या मिपाच्या फडात रंगलेला 'आवाहना'चा कलगीतुरा बघून आपनबी थोडी धुळवड खेळावी म्हनून मग हा तमाशाचा बार ऊडवून द्यावा म्हनतोय! प्रेरना?
काव्यरस

नव्या दशकाचे बडबडगीत.

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 22/12/2009 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
कडाडणार्‍या कडकलक्ष्मीची खमाजातली ख्यालीखुशाली ... गाता गळा गजरी गातो गरीब गावाच्या गजाली घर घर घोरे घाट घन घामेजलेली चकचकीत चमके समचा चांदीचा छननन छमके छंद छुपा छत्रीचा जपतच जातो जीव जुन्या जरीचा झुणझुण झांझर झपताल झंकारी तकक्डान्धा..तत्कारे तबला तिहाई थुई थुई थंडीत थोडासा थरार... दर्या दुंदुभी ...दीनवाणा दमलेला दुकानदार.... धगधगीत धवल धरेला धीर ना धरवला नाकारीत नन्नाचा नखरा.... टकमक टवळी ....टपोरी टोपली..... ठायी ठेगणी ठुशी ठेवली... डमडम डमरु डोकी डावी... ढसा ढसा ढोसूनी....
काव्यरस

प्रेमेय

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 22/12/2009 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
'झिंग' ह्या शब्दाचा अर्थ इंग्रजी आणि मराठीत जवळ जवळ एकच आहे. "काल जास्त लोड होता का"? नेहेमीपेक्षा जरा जास्त. का ग? "लग्न झाल्यापासुन जेवताना पेंगुळलेला मी पहील्यांदा पाहीले तुला मी. आल्यावर आंघोळ पण केली नाहीस" लोकल ला जरा जास्तच गर्दी होती त्यामुळे असेल. "रात्री झोप लागली ना"/ हो. "डोळे अजुनही तांबारलेले दिसताहेत". कालची झोप म्हणजे स्वप्नांची मालिका होती त्यामुळे असेल. स्वप्नात तु आलीस. "अग बाई. काही तरीच हां" खरच सांगतोय "घरातल्या घरात मी स्वप्नात? कुठे बाहेर गावी असलास तर समजु शकते." स्वप्न तर ऐक. "सांग" स्वप्नात तुच होतीस. शाळेच्या युनिफॉर्म मधे. दोन शेपट्या घालुन.

(घाईची वेळ)

लेखक शाहरुख यांनी मंगळवार, 22/12/2009 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
घाईची वेळ होई गुडगुड | जोरदार कळ || बहूतेक मिसळ | कालची || भरली बादली | घातली स्लिपर || उभे लायनीच्या | शेवटाशी || सगळे गप्पांत | रमत गमत || आमचाच प्राण | कंठाशी || घामाघूम झाला | सदरा फार || गाठही गुंतली | लेंग्याची || दहा भाडेकरु | एकची संडास || उद्धारली नाती | मालकाची || अखेरीस आला | आमचा नंबर || लाईनही मागे | वाढलेली || केली लगबग | घुसलो आत|| झाली शांती | आत्म्याची || उद्याही पुन्हा | असेलच घाई || लावेन नंबर | प्रभाती || -कवी शाहरुख मुळ कविता वाचून शांत होतो पण
काव्यरस