Skip to main content

पुरावा मिळाल्याशिवाय नाडी ग्रंथांवर माझा विश्वास बसणार नाही.

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 17/03/2010 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैवाने तुमची नाडीवर जितकी ठाम श्रद्धा आहे तितकाच माझा अविश्वास अवैज्ञानिक सत्यावर आहे. तेव्हा तुम्ही कितीही जेरीला आणलंत तरी मला पुरावा मिळाल्याशिवाय माझा विश्वास बसणार नाही.
राजेश घासकडवी जी आता कसे बोललात... मग आपले व माझे पटेल... जर सत्यनिष्ठेने पुरावा मिळवाल तर मग बदलाल की नाही का तरी ही नाहीच... मी पुराव्यानेच नाडी ग्रंथांना अवैज्ञानिक, थोतांड, खोटे ठरवायचा चंग बांधून गेलो... पुराव्यासाठी जंग जंग पछाडून तमिळींना हाताशी धरून, इंडॉलॉजीच्या ताडपत्रांच्या तज्ञांनी पारखून जे ठरवले, समजले.

गाथा इराणी

लेखक अभिज्ञ यांनी बुधवार, 17/03/2010 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, परवाच पुण्यातून -पक्षी क्रॉसवर्ड मधून पुस्तक खरेदी झाली. त्यात मीना प्रभु यांचे "गाथा इराणी " हे पुस्तक देखील खरेदी केले. मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक(कंटेंट) अतिशय देखणे झाले आहे. नेहमीप्रमाणे मीना प्रभुंची लेखणी सुंदरच बरसलि आहेच. परंतु वाचता वाचता असे लक्षात आले कि पुस्तकातील मधली बरीचशी पाने गायब आहेत. काहि पानांचा क्रम वाट्टेल तसा आहे. कशाचा कशालाहि काही ताळमेळ नाही. पुस्तकाची किंमत ३०० रुपये असल्याने चिडचिड झाली. क्रॉसवर्डवाल्याला फोन केला तर त्याने चक्क कानावर हात ठेवले. एकदा विकलेले पुस्तक आम्ही बदलून देत नाहि.

भरलेले पडवळ

लेखक दिपाली पाटिल यांनी बुधवार, 17/03/2010 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेखन संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे. -शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक. तसं पाहता पडवळाला नाकं मुरडणारेच जास्त दिसतील पण ही खास माझ्या सासूबाईंची भरलेल्या पडवळाची पाककृती...एकदा तरी करून पाहाच ... आवडणार नाही अस्सं होणारच नाही...

चित्रपटांची व सिरियल्सची गमतीदार शिर्षके!!!

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 17/03/2010 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
(यात कुणालाही, कशालाही दुखावण्याचा हेतू नाही. फक्त मनोरंजन आणि विनोदनिर्मितीसाठी मी हे लिहिले आहे.) आपल्या मराठी चित्रपटांचे पूर्वी सासू-सून-नणंद-भावजय-कुंकू याप्रकारचेच कथानक असायचे. नावेही तशीच असायची. मला तशी काही नावे सुचत आहेत. आणि जर हिंदी चित्रपटांप्रमाणे काही नावांच्या पुढे अर्थदर्शक शब्द किंवा वाक्य टाकले तर कशी गंमत येईल ते मी खाली देत आहे.

मराठी ५० वर्षांनंतर कशी असेल?

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 17/03/2010 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रसंगः आमच्या कंपनीच्या बसमध्ये एका बाकावर दोन मुली आणि एक मुलगा असे तीन मराठी वीर बसले होते. मी स्थानापन्न होत असतांना ऐकलेला संवाद असा: एक मुलगी: अगं ते खलबत्त्यात कुटून घ्यायचं. दुसरी: खलबत्ता म्हणजे? पहिली: तुला खलबत्ता माहित नाही? तुला माहिती आहे का रे? शुंभः (नंदीबैलासारखी मान हलवत) नाही. पहिली: अगं खलबत्ता म्हणजे कुटण्यासाठी एक लोखंडाचं भांडं असतं आणि एक जाड वजनदार असा लोखंडी रॉड असतो. त्याला बत्ता म्हणतात आणि ज्या भांड्यात कुटतात त्याला खल म्हणतात. मिक्सर वापरात येण्याआधी कुटण्यासाठी खलबत्ता वापरत असत. अजूनही खेड्यांमध्ये वापरतात.

समर्थ

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 17/03/2010 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
संहिता जुनी नवीन अर्थ मागते अन्यथा विसर्जनास गर्त मागते आज कोणत्या अटीत गुंतणार मी? (भेट नेहमीच ती सशर्त मागते!) कल्पनेस तेज, ओज, चेतना हवी, ले़खणी सशक्त शब्द, अर्थ मागते तोच घेउनी फिरे रिता कमंडलू, काय त्या दयाघनास व्यर्थ मागते? स्वत्व जागवील, राष्ट्र उद्धरील जो, भूमि ही असा नवा समर्थ मागते