Skip to main content

व्यवसायभिमुख शिक्षण

लेखक सुवर्णमयी यांनी बुधवार, 31/03/2010 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
व्यवसायाभिमुख शि़क्षण चित्रातला गुलाबाचा बुके पाहून त्याला आठवले तिच्या डाव्या वक्षावरचे गोंदण.. ते राहिलेच काल.. तो स्वतःशी पुटपुटला प्रदर्शनात तिला मात्र आवडले होते हत्ती घोडे आणि मांजर घरी आल्यावर ती कामवाल्या बाईला सांगत होती तिला आवडत ते त्याला कस पटत नाही.. "नवरा हाय म्हणून हाय सगळी कटकट असला तरी कटकट आनि नसला तरी बी.." फरशी पुसत बाईने उत्तर दिले. शाळेत सहाव्या सातव्या वर्गातली मुले सचित्र शिकत होती नर मादी आणि प्रजनन व्यवसायाभिमूख शि़क्षणाचे अवलंबन केल्याबद्दल शिक्षणमंत्री टाळ्या घेत होते -सोनाली जोशी

(बस्स नकोस आता...)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 31/03/2010 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
हा दिसला मुक्त हाफव्हॉली आणि लगेच मला "साहित्य सेवा" करण्याचा उमाळा आला. तुझ्यामागे धावणं पुरे आजपासून कारण तू येत नाही समोरासमोर मुळी यदाकदाचित धर्मकर्मसंयोगाने आलास तरी माझी गरज नाही तुला मग माझी धावपळ कशासाठी? मला इतकं पळवून, डिवचून दमवून, दमवून मिळालास तर कसा मिळालास? किती आणि कसं सांगू कालपर्यंत हवा होतास जितका नकोस आता बस्स!!! झुरळामागे धावणं थांबलं आजपासून (बेगॉन वापरा, झुरळं मारा)

भारतीयांची पोरे हुषार !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 31/03/2010 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
काल म.टा एक लेख आला वाचून खरच आनंद वाटला मिपा च्या सन्माननीय सदस्यांसाठी मुद्दाम येथे देत आहे निरंजन वाहलेकर भारतीयांची पोरे हुषार ! ग्लंडमधल्या 'डेली मेल' या अग्रगण्य वृत्तपत्रातली एक बातमी भारतीयांचा सुप्त अहंकार सुखावणारी आहे बातमीत ब्रिटिश सरकारने बालक, विद्यालये आणि कुटुंबविभागाकरवी केलेल्या पाहणी अहवालाचा हवाला देत, इंग्लंडमध्ये शिकणारे भारतीय आणि चिनी विद्याथीर् हे ब्रिटिश विद्यार्थ्यांपेक्षा अभ्यासात हुशार आहेत, असे म्हटले आहे.

पाउस २- शिघ्र

लेखक नाद्खुळा यांनी बुधवार, 31/03/2010 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
पाउस एक चिंब अंगण पाउस म्हणजे भिजलेलं मन पावसा संगे बेभान वारा पाउस म्हणजे श्रावण धारा पाउस म्हणजे काळे ढग पावसात हरवलेल धुक्याचं जग पावसातली एक गोड मिठी पाउस म्हणजे भजी ओठी पाउस म्हणजे गोड आठवण पाउस म्हणजे मैत्रीची साठवण पावसात द्यावी भेट सप्रेम अहो पाउस ,तुमचा -आमचा अगदी सेम टू सेम --के गा

स्लो ओव्हर रेट?

लेखक नील_गंधार यांनी बुधवार, 31/03/2010 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5746052.cms ह्या बातमीनुसार सचिनला ४०००० अमेरिकन डॉलर्स इतका दंड ठोठावण्यात आला आहे.तर त्याच्या इतर सहका-यांना प्रत्येकी १०००० अमेरिकन डॉलर्स इतका दंड बसलाय. जवळपास ६० एक लाखाचा दंड बसावा असे काय गंभीर घडलेय? स्लो ओव्हर रेट नक्की कशाकरीता अमलात आणतात? समजा सामन्याची वेळ जर वाढली तर जाहीरातींचे उत्पन्न देखील वाढतेच की. त्यातुन मिळणा-या उत्पन्नाचे काय? अन ज्या खेळाडुंच्या जोरावर हा खेळाचा बाजार चालु आहे त्यांनाच लुबाडणे कितपत योग्य आहे?

अविनाश धर्र्माधिकारी

लेखक राजे साहेब यांनी बुधवार, 31/03/2010 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
मला अविनाश धर्माधिकारी सर यांचे एम्पी3 लेकचर हवे आहेत ते तुम्ही उप्लब्ध करु शकाल का मिसल पाव वर किवा मला लिंक पाठवा की जेथून मी डाउनलोड करू शकेल my email is manjoshi2003@yahoo.com

दै. सामना चे नाव कान्तिपूर झाले?

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 31/03/2010 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
दै. सामना चे नाव कान्तिपूर झाले? आजचा दै. सामना ची ऑनलाईन आवृत्ती बघीतली असता खालील प्रमाणे दिसली. saamana ya kaantipur? सामना या कान्तिपूर?? (वरील फोटोत कोणत्याही इमेज प्रोसेसींग सॉफ्टवेअरची मदत घेतलेली नाही. तुम्ही दै. सामनाच्या ई ईडिशनवर बघू शकतात.) वेळ सकाळची ९:०० वाजता. कान्तिपूर हे नेपाळ मधले वृत्तपत्र आहे. हे सामनाचे असे दिसणे म्हणजे दै.

दरवळ!...

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 31/03/2010 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
कॉम्प्युटरमधला `ई-मेल'चा `इनबॉक्स' भरून वाहू लागला, की, नको असलेले काही ई-मेल `डिलीट' करून टाकावे लागतात. मग ते पुरते पुसले जातात. पुन्हा उघडू म्हटलं, तरी सापडत नाहीत. कालांतराने, मेलबॉक्स पुन्हा वाहू लागतो, आणि पुन्हा तेच करावं लागतं... नको असलेले मेल पुसून टाकणं ! जेव्हढं हवं, तेव्हढंच मेमरीमध्ये `सेव्ह' करून ठेवायची सोय कॉम्प्युटरमध्ये करताना, माणसाचा मेंदूच विज्ञानाच्या डोळ्यासमोर असावा... पण मेंदूची बातच अलग असते... तिथल्या `आठवणींच्या कप्प्या'तली, कुठलीच गोष्ट `डिलीट' होत नाही, आणि पुसलीही जात नाही...