कवितेचा मार ! ! !
कवितेचा मार ! ! !
जेष्ठ कवींचे संमेलन,
भरले श्रोत्यांनी प्रांगण.
कवींना चढे अगणित स्फुरण,
श्रोत्यांची स्थिती दारूण.
झडती कवितेच्या अगणित फैरी,
ए के – 47 च्या माऱ्या परी.
श्रोते जाहले सैरावैरा,
धडकी भरे त्यांच्या उरी.
आधीच समस्त श्रोते वेठीला,
त्यात एक कवी अवतरला.
छेडीला भीमपलास कवितेचा,
उतावीळ श्रोते भैरवीला.
.
जाहले तास दोन तास,
तरीही ना सरे त्याचा अट्टाहास.
वदे एक श्रोता शेजारी स्त्रीस
“ काही उपाय सुचवा हो “ !
वदली ती गौरांगना सत्वर,
“ तुम्हीच काही सुचवा गुरुवर,
सहते वीस वर्षे हा कवितेचा मार
उपाय परी ना गवसला आजवर.
काव्यरस
मिसळपाव
मराठी साहित्यसंपदा ही तशी प्राचीन. इतिहासकारांच्या मते मराठीचा वापर असणारे शिलालेख इ.स.च्या १०व्या आणि ११व्या शतकातले आहेत तर मराठीतली पहिली ग्रंथरचना १३व्या शतकातली आहे असेही म्हणतात.
गेली वर्षानुवर्षे मराठीतील बहुरंगी साहित्य कथा, कादंबरी ,कविता, संतवाणी वगैरे अनेक प्रकारातून आपल्यासमोर येत आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, रणजित देसाई, शिवाजी सावंत, गो.नी. दांडेकर, तसेच न. चिं. केळकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि वा. म.