(दक्षिणेकडची खव्वयेगिरी–२) अप्पम् व व्हेजिटेबल स्ट्यु
दक्षिणेकडची खव्वयेगिरी – १
केरळ ट्रीपवर गेलात तर सकाळी ६-७ च्या सुमारास केरळातल्या कुठल्यातरी स्टेशनात गाडी शिरते आणि प्लॅटफॉर्मवर “अप्पम-मुट्टै ऽऽ” अशा आरोळ्या ऐकू येतात. आपण धडपडून उठतो आणि खिडकीतून हात बाहेर काढून ते पुडकं हातात घेतो.
पुडक्यातले केळीच्या हिरव्यागार पानात गुंडाळलेले वाफाळते जाळीदार अप्पम आणि सोबत खमंग गरमा-गरम मुट्टै हा एक न्याहारीचा स्वर्गीय प्रकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तसंही केरळला “गॉडस् ओन कंट्री” असंच म्हणतात म्हणा ( आता तिकडच्या लोकांना “डेव्हिलस् ओन पिपल” म्हणतात ते जाउद्या ).
मिसळपाव

