Skip to main content

जय जवान जय किसान !

जय जवान जय किसान !

Published on 26/11/2009 - 13:27 प्रकाशित मुखपृष्ठ
२६/११ च्या निमित्ताने.... !!जय जवान जय किसान!!
चला , २६/११ ला एक वर्ष झालं नको त्या आठवणी म्हटलं तरी , जरा रक्त ओघळ्लं हुतात्म्यांच बलिदान अगदीच फुकट नाही गेलं वर्षभरात तसं काहीच नाही घडलं देशात कुठे कुठे थोडफार झालं पण आमच्या बापाच , त्यात काय गेलं...? (बडे बडे शहरोंमे ऐसे छोटे छोटे हादसे होतेही है ! ) तशी आम्हाला सुरक्षेची आजिबात चिंता नाही आमच्या देशात हुत्तात्म्यांची अगदीच काही कमी नाही आहो सैनिकांच हेच तर काम असतं लढता लढला देशासाठी कधीतरी मरायचं असतं आपलाशेतकरी बघा , फुकटचा मरत असतो इतके बॉम्बस्फोट होतात , आत्महत्या कशाला करतो...? मरायच तर लेका , बोम्बस्फोटात मरावं आपल्या कुटुंबाचं येड्या, भलंतरी करावं अरे शास्त्रीजींच्या मन्त्राने भरून घे कान उगीच का म्हणतात ...? जय जवान जय किसान
लेखनविषय:

याद्या 2031
प्रतिक्रिया 5

सुरेख पण म्हणवत नाही जय जवान जय किसान चेतन

!!जय जवान जय किसान!! ही घोषणा अजुन आहे ??? मला वाटले हिंदूस्थानी लोकांना या घोषणेचा कायमचा विसर पडला आहे !!! आपलाशेतकरी बघा , फुकटचा मरत असतो इतके बॉम्बस्फोट होतात , आत्महत्या कशाला करतो...? हा प्रश्न आपल्या राजकारण्यांना कधीच पडणार नाही याची १००% खात्री बाळगा. (जवान आणि किसान यांचा ॠणी ) मदनबाण..... "Life is the flower for which love is the honey." Victor Hugo

तशी आम्हाला सुरक्षेची आजिबात चिंता नाही आमच्या देशात हुत्तात्म्यांची अगदीच काही कमी नाही अगदी खरंय! क्रान्ति अग्निसखा