Skip to main content

आण्णा पळसुल्यासोबत पैज हारलो.. :)

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 26/04/2010 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
ललित मोदीं आणि मंडळींचा वादाच्या भोवर्‍यात असलेला आयपीएल सामना अखेर संपला एकदाचा.. आजच्या शेवटच्या सामन्यावर करोडोंचा सट्टा लागला होता म्हणे.. मी मात्र मधल्यामध्ये फुक्कटचा २५ रुपये हारलो.. (आपली ऐपत तितकीच! आधीच साला आपला धंदा डाऊन आहे!) "तात्या, उगाच काय 'सचिन!', 'सचिन!' म्हणून नाचतोस? संघाला जेव्हा खरोखरंच गरज असते तेव्हा सचिन कधीही काही करिश्मा करत नाही.. आज देखील तस्संच होईल बघ! मुंबै इंडियन्सवाले हारतील आज.. लावतोस २५ रुपयांची पैज?" माझा मित्र आण्णा पळसुले. मग मीदेखील सचिनच्या भरवश्यावर आण्णा पळसुल्यासोबत तावातावाने २५ रुपयांची पैज लावली.

आई

लेखक बरखा यांनी रविवार, 25/04/2010 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
आई ============ अ॑कुरले बीज माझे मम आईच्या पोटी नऊ महिने वाढविले तिने मज आपुल्य गर्भासी नवे जीवन दिले तिने मजला मरण यातना स्वता: सोसुनी तान्हुल्याचे मग लाड किती करती जपती तळ हतावरील फोडा परी तिच्या पदराची पडता छाया डोक्यावरी आभाळही ठे॑गणे होई तिच्या मायेपुढती आईचे हे रुण फेडाया कितीक जन्म अपुरे पडती पण कधीही ती माऊली त्याचे व्याज न मागती. पल्लवी

काल्पनिक सत्यकथा: "बाबाजार!!"

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 25/04/2010 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार संध्याकाळ. कामावरुन घरी परत येत होतो. बसमध्ये भयंकर गर्दी. मला सुरुवातीपासून बसायला जागा मिळाली नव्हती. थोडा प्रवास झाल्यानंतर बसमध्ये एके ठीकाणी बसायला जागा मिळाली. सकाळी विकत घेतलेले वर्तमानपत्र तसेच घडी केलेले बॅगमध्ये होते. सकाळी उभ्या उभ्या प्रवास केल्याने ते वाचायला मिळालेच नव्हते. बसल्यावर वाचायला घेतले. पण गर्दीमुळे नीट वाचता येईना. फक्त मुखपृष्ठावरच्या बातम्यांचे मथळे वाचून झाले आणि पेपर तसाच ठेवून दिला.

'जांगडगुत्ता'च्या निमित्ताने..

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 25/04/2010 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
'जांगडगुत्ता' हा शब्द मी लिहिला आणि बहुतेकांना त्याविषयी जिज्ञासा निर्माण झाली. हास्यसम्राट१ मध्ये मिर्झा बेग हे सदगृहस्थ स्पर्धक म्हणून होते, ते त्यांच्या विनोद सादरीकरणात जांगडगुत्ता शब्द आवर्जून वापरीत. तेव्हा त्यातून व्यक्त होणारा अर्थ- मोठा गोंधळ, गडबड, गहजब असा असे. 'तुमचा काहीतरी जांगडगुत्ता चाललेला दिसतो' अशा वाक्यातून गौडबंगाल, भानगड, कटकारस्थान असाही अर्थ ध्वनित होई. फार फार तर जांगड म्हणजे भलामोठा, भयंकर, जबरदस्त आणि गुत्ता म्हणजे गुंता, गोंधळ अशी या शब्दाची फोड करता येईल. काही शब्द मोठे मजेशीर असतात. कोठेतरी,काहीतरी वाचतांना आपणाला अचानक भेटतात, अचंबित करतात,मिश्किलपणे हसवतात.

xxवी झाली तेंव्हा

लेखक सन्जोप राव यांनी रविवार, 25/04/2010 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
तात्विक युद्धांचा इतिहास कितीही रंजक असला तरी शेवटी शरीरधर्म कुणाला चुकला आहे?
काव्यरस

यादवी किंवा (ती झाली तेव्हा...)

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 25/04/2010 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
मनुष्याचा इतिहास यादवी-युद्धांनी भरलेला आहे. जे मुद्दे तडजोडीने, सहमतीने, गुण्यागोविंदाने सुटू शकतात अशाविषयी हट्टाग्रही भूमिका घेऊन शस्त्रं उपसायची परंपरा आहे. यात भावाविरुद्ध भाऊ उभा राहातो, मित्राविरुद्ध मित्र पवित्रा घेतो आणि प्रेम विसरून एकमेकांचा गळा घोटायला ते तयार होतात. कित्येक राज्यं, देश अशा आंतर्गत बंडाळ्यांमुळे कमकुवत होऊन परकीय आक्रमणांना बळी पडलेली आहेत. मिपावर मी बऱ्याच लोकांपेक्षा खूप कमी वेळ वावरलो आहे. कोणाला अजून भेटलेलोही नाही. असं असतानाही माझे मिपाशी, तिथल्या लोकांशी ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत. मिपाने मला खूप काही दिलेलं आहे.
काव्यरस

सुमन कल्याणपुर - एक दिव्य स्वर!

लेखक योगेश२४ यांनी शनिवार, 24/04/2010 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
सुमन कल्याणपुर नुसते नाव जरी उच्चारले तरी निर्मळ शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज आठवतो. त्यांची गाणी जितकी प्रसिद्ध झाली तितक्याच त्या प्रसिद्धिपासुन अलिप्त राहिल्या. अनेक वर्षे अज्ञातवासात असलेल्या सुमनताई "झी गौरव्"च्या जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्ताने समोर आल्या. सध्या बांग्लादेशात असलेल्या ढाका येथे २८ जानेवारी १९३८ साली सुमन हेमाडी यांचा जन्म झाला. १९४३ साली त्यांनी मुंबईत येऊन संगीताचे रितसर प्रशिक्षण घेतले. रामानंद कल्याणपुर यांच्याशी लग्न होऊन त्या सुमन कल्याणपुर या नावाने सर्व परिचित झाल्या.

आरसा अथ ते इथी

लेखक झुम्बर यांनी शनिवार, 24/04/2010 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी खूप मजा यायची त्याच्या मध्ये डोकावताना मीच स्वताचे पाहुनी बोळके हसायची रडता रडता मग मी थोडी झाले मोठी आरसा परी तोच होता गणवेशातले रूप वाढते तोही अलगद निरखत होता मग मी चढले शिडी नाजुकशी तारुण्याच्या उंबरठ्यावरी आणि सर्वांगावर माझ्या शृंगाराची फिरली नक्षी आरसा..... मग माझा सखाच झाला संवाद तासन तास झडू लागला नित्य नवा साज बहराचा अंगांगी माझ्या उमलू लागला मग ती मोहक वेळ आली आयुष्याच्या वळणावरती साद कुणी ती घालून हळवी मोहविले मज मनी मानसी आरसा .... नित्य सख्या स्तव सजता सजता आरसा कानी सांगतसे आज चढव हा साज नवा तोच सख्या मोहवितसे चालुनी मग ती सप्तपदी झाले सात जन
काव्यरस