कलि...
एकदाचे विशेष कोर्टाने निकाल दिला…!
अॅड. उज्वल निकमांच्या कारकिर्दीत अजुन एक मानाचा तुरा खोवला गेला.
कृरकर्मा अजमल ‘कसाब’ ला फ़ाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. एकुण चार गुन्ह्यांसाठी मरेपर्यंत फाशी आणि पाच गुन्ह्यांसाठी जन्मठेप.
फाशी : १६६ निरपराधांची हत्या व हत्येचा कट, हत्येसाठी मदत करणे, भारताविरुद्ध युद्ध पुकारणे, दहशतवादी कृत्य इ. गुन्ह्यांसाठी फ़ाशी.
जन्मठेप : हत्येचा प्रयत्न, कटकारस्थान व स्फोटकेविषयक कायदा याच्याशी संबंधीत पाच गुन्ह्यांसाठी जन्मठेप.
शिक्षा ऐकली आणि त्या तीन दिवसात मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवणार्या पत्थरदील कसाबचा घसाच कोरडा पडला. सुनावणीच्या दरम्यान खाली मान घालून बसलेला ‘कसाब’ शिक्षेची कल्पना आल्यावर चक्क रडायला लागला. शिक्षा सुनावण्यात आल्यावर त्याने पाणी मागितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यायमुर्तींनी कंदाहार प्रकरणाची पुनरावृत्ती होवू नये म्हणुन लवकरात लवकर कसाबला फाशी देण्याची शिफारसही केली….!
आता येणारे काही आठवडे पुढच्या प्रक्रिया चालू राहतील. विशेष कोर्टाच्या या निर्णयावर हायकोर्टाचे शिक्का मोर्तब होणे अत्यावश्यक आहे. कसाबने अपील केले नाही तरी त्याच्याविरुद्धचे पुरावे तपासून फाशीच्या योग्यायोग्यतेची तपासणी हायकोर्टाला करावी लागेल. त्याच्याही नंतर कसाबला सुप्रीम कोर्ट आणि शेवटी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज असे पर्याय असतीलच. तेव्हा प्रत्यक्ष शिक्षेच्या अंमलबजावणीला अजुन किती वाट पाहावी लागेल? फाशीची शिक्षा प्रत्यक्षात येइल का? असे अनेक प्रश्न सद्ध्यातरी अनुत्तरीतच राहणार आहेत.
पण या सर्व घडामोडीत एक विचार मनात आल्यावाचून राहवत नाही…
गंमत वाटली, शेकडो लोकांना हसत हसत मृत्युमुखी धाडणारा, सहजपणे लहान मुले, वृद्ध, स्त्री, पुरुष कसलाही विचार न करता सरसकट सगळ्यांवर निर्विकारपणे गोळीबार करणारा कसाब, केसची सुनावणी चालु असताना निर्लज्जपणे हसणारा कसाब… स्वतःचा मृत्यु समोर दिसायला लागल्यावर मात्र चक्क रडला. मग नक्की कुठला कसाब खरा? निर्विकारपणे शेकडो निरपराधांची हत्या करणार क्रुर ‘कसाब’ किं स्वतःचा मृत्यु समोर दिसल्यावर रडणारा, मृत्युला भिणारा एक भित्रा माणूस (?)
कुठलीही व्यक्ती इतक्या थराला कशी काय जावू शकते? ‘कसाब’ किंवा कुणीही अतिरेकी इतक्या कृरपणे आपल्याच सारख्या इतर मानवांची हत्या कशी काय करू शकतात? प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या आईच्या पोटातून जन्म घेतलेला असतो. प्रत्येकामध्ये कुठेतरी मानवी अंश असतोच असतो. पण मग ही माणसे आपले माणुसपण का विसरतात?
“नैनं छिंदंती शस्त्राणी……..” हे कितीही मान्य केलं तरी त्या आत्म्याला जोपर्यंत कुडीची साथ असते तोपर्यंत त्याला काहीतरी अस्तित्व असतं. ओळख असते. ती ओळख, ते अस्तित्व मिटवण्याचा अधिकार माणसाला कोण देतं? आपल्याच सारख्या माणसांवर शस्त्र उगारताना, त्याचं रक्त सांडताना काहीच भावना निर्माण होत नाहीत का मनात? देवाची, गेलाबाजार पोलीसांची भीती एकवेळ नाही वाटत असे म्हणता येइल्…पण तुमची सद सद विवेक बुद्धी ? तिचे काय? काल ऑफीसमध्ये रागाच्या भरात एका सहकार्याला “तु गप बे भें….!” म्हणून शिवी दिली. तर काल रात्री बराच वेळ झोप नाही आली मला. आम्हा दोघांच्या भांडणात त्याच्या किंवा कुणाच्याच बहिणीला आणण्याचा काय नैतिक अधिकार होता मला? मला खरेच झोप आली नाही. कितीतरी वेळ या अंगावरचे त्या अंगावर होत राहीलो. शेवटी त्या सहकार्याला रात्री २.३० वाजता “सॉरी यार!” म्हणून समस केला. त्यानंतर कुठे डोळा लागला.
मग माझ्याच सारखा एक माणूस इतक्या निर्विकारपणे शेकडो जणांच्या हत्या कशा काय करू शकतो? बरं.. या हत्या करताना त्याच्या चेहर्यावर कुठलीही अपराधीपणाची भावना नसते. अनेक कारणे असु शकतात याची, धर्मांधता, एखादा पुर्वग्रह, दुराग्रह, ब्रेन वॉशिंग मला त्याच्या मुळाशी जायचे नाहीय. माझा प्रश्न असाय की मुळात परमेश्वर अशी शक्यताच कशी निर्माण करू शकतो? (जर तो असेल तर.) त्यानेच निर्माण केलेले एक अस्तित्व दुसर्या अस्तित्वाच्या मुळावर उठलेय की कल्पना त्याला सहनच कशी होते? (अर्थात परमेशराने सृष्टीच्या बाबतीत निर्माण केलेले जिवन चक्र हा वेगळा विषय आहे.) क्षणात माणसाचा राक्षस का होतो?
कलि .. कलि म्हणतात तो हाच का?
विशाल कुलकर्णी
वाचन
2239
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
कलि बद्दल नीट माहिती घ्या.
In reply to कलि बद्दल नीट माहिती घ्या. by वेताळ
कल्की हा
उगाच
माझे दोन
भाऊ..फार विचार
फारच गहन ,
शिक्षेची
किती मोठी रांग...