चला! एकदाची त्या युद्धखोर कसबला फाशीची शिक्षा सुनावली गेली. भारतीय संघराज्यविरूद्ध त्याने पुकारलेल्या युद्धाबद्दल भारतीय कायद्याप्रमाणे कोर्टाने ही शिक्षा ठोठावली. कसबला फाशी व्हायला हवीच होती असे मलाही वाटते. मात्र मला असे वाटण्याचे कारण माझ्या अतिरेक्यांविरूद्धच्या तीव्र भावना आहेत.
हा भावनावेग बाजूला ठेवला व राष्ट्रप्रेमापलिकडे थोडं डोकं शांत ठेऊन बघितलं तर डोक्यात अनेक प्रश्न उभे रहातात. त्यावरच मला लोकांची मते जाणून घ्यायची आहेत.
१. कसबला फाशी झाली. कमीत कमी ९ भारतीयांचा थेट व शेकड्यांचा साथीदारासह खून करणार्या व्यक्तीला आपण मृत्यूदंड ठोठवला आहे. ह्या कसबला फाशी देऊन गेलेल्यांचा जीव परत येणार नाहि पण इतरांना जरब बसेल असा युक्तीवाद केला जातो. पण अशी फाशी देऊन आपण कसबला, इतर अतिरेक्यांच्या दृष्टीने, "शहीद" करत आहोत का?
२. जर शहीद करत असलो, तर त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन अधिक हल्ले होण्याची शक्यता नाही का? पाकीस्तानी अतिरेक्यांचे जे ब्रेन वॉशिंग होते त्यापुढे या निकालाने काहि तरी फरक पडेल असे वाटते का?
३. माझ्यामते कसबला फाशी देणं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं मात्र त्यामुळे दहशतवाद कमी होण्यास, त्याला आळा बसण्यास किंवा जरब बसण्यास काहि हातभार लागेल असं वाटतं का?
४. कसबला फाशी ठोठाऊन ती प्रत्यक्षात येण्यासाठी आता कित्येक वर्षे लागतील. तेव्हा या निमित्ताने आपण भारतातील न्यायप्रक्रीयेचे हसे करून घेत आहोत का?
५. कसबला मदत करणार्या इतर भारतीयांचाच छडा न लाऊ शकल्याने पोलिस व गृहखात्यावर नामुष्की ओढवली आहे असे तुम्ही मानता की यामागे कोणी भारतीय असूच शकत नाहि असे तुम्हाला वाटते?
६. एक हायपोथेटीकल प्रश्नः फाशीऐवजी दुसरी कोणती शिक्षा तुम्ही सुचवाल?
वाचने
4460
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
फाशीच
"Justice delayed is justice denied"
In reply to फाशीच by नितिन थत्ते
काऴकोठडी
उत्तरे
अशी फाशी
प्र का टा आ
In reply to अशी फाशी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद
In reply to प्र का टा आ by अरुंधती
फाशी
एक छोटी सुधारणा...
In reply to फाशी by विकास
माझी उत्तरे
१,२,३,५,६ - ठाऊक नाही; ४ - नाही
१. ... इतर
अशी फाशी
१.पण अशी
...
कसबला फाशी
हा हा.. फायदे पाकिस्तानचे & तोटे भारतीय नागरीकांचेच!!
अवाजवी महत्त्व
"Finis"
कसाब
. एक
सगळ्यांचं
फायदा-तोटा
In reply to सगळ्यांचं by ऋषिकेश