Skip to main content

प्रतापगडाचा जीर्णोद्धार??

लेखक राघव यांनी सोमवार, 26/04/2010 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=649... हीच ती अचंबित करणारी बातमी. कल्पना खरंच छान आहे, अगदी आपल्या सर्वांच्या मनात असेल अशीच. ही बातमी सत्य असावी अशी आशा करतो. कुणी प्रकाश टाकू शकले यावर तर उत्तमच. राघव

गंधमय अस्तित्त्वाचा शोध.......

लेखक सांजसखी यांनी सोमवार, 26/04/2010 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
होती एक जमीन.... खडकाळ, भेगाळलेली, ओसाड आणि नापीक..... अतिशय निरपेक्ष ..... जणू स्वतःच्या अस्तित्त्वाची जाणीव नसलेली.... काळाच्या ओघात गोठलेल्या भावनांची आणि त्यामुळे या भावनाविश्वाशी दूर दूर जाऊ पहाणारी....... तिच्या मनात एकच सलं होता..... आपण नापीक... निरूपयोगी.... आणि म्हणूनच की काय सारं जगं आपल्याला वाळीत टाकल्यासारखं दुर्लक्ष करतं.... तिला सतत एकच भीती असायची... ती सतत बदलणार्‍या ॠतूंची.... कधी रखरखणार्‍या ऊन्हाची......तर कधी झोंबणार्‍या वार्‍याची .... कधी हुलकावणी देणार्‍या अन न बरसणार्‍या ढगांची...... असचं आयुष्य होतं तिचं .. एकाकी... निरस.. रू़क्ष... पण काळाचा महिमा खरचं अजब असतो....

ज़ुबैल - सौदी अरेबिया.

लेखक बारक्या_पहीलवान यांनी सोमवार, 26/04/2010 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
ज़ुबैल - सौदी अरेबिया. सौदी अरेबिया नाव घेटले तरी वेगळेच विचार मानत येतात! २-३ वर्षे ज़ुबैल वास्तव केलेवर वाटल की मराठी मानुस जॉब साथी ज़ुबैल ला ज़रूर यावे. ज़ुबैल्चे काही फोटो डकवट आहे. खूप काही आहे सौदी बद्डल लिहनेसारखे पन मराठी टाइपिंग जमत नाही.

भ्रष्टाचारमुक्त भारत याची देही याची डोळा पहायला मिळेल का?

लेखक मितभाषी यांनी सोमवार, 26/04/2010 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
हरि ओम मिपाकरांनो, सकाळमधील ही बातमी वाचली आणि डोके गरगरायला लागले. भारतासारख्या गरीब देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार कसा करु शकतात हि लोकं. तसेच येवढा जेसीबीने पैसा ओढण्यासाठी हवे असलेले अनिर्बंध अधिकार एकट्या माणसाला कसे दिले जातात. १८०० कोटींची संपत्ती आणि दिड टन सोन्याचे हे महाशय काय करणार होते. अशा भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा का होत नाही? खरे तर आर्थिक घोटाळे करणार्‍यांना अत्यंत कठोर शिक्षा करावयास हवी, पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.

शिवसेनेचा रक्तदान महायज्ञ...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 26/04/2010 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम, शिवसेनेचा रक्तदान महायज्ञ मुंबैत नुकताच पार पडला. या शिबिरात २५००० हून अधिक बाटल्या रक्त गोळा झाले.. व या घटनेची गिनिज विक्रम पुस्तकात नोंदही घेतली गेली. या चांगल्या, समाजोपोयोगी कार्याकरता शिवसेनेचे मन:पूर्वक अभिनंदन.. आता हे सर्व रक्त अडलेल्या गोरगरीबांना, गरजूंना विनामूल्य तसेच वेळेवर उपयोगी पडेल हेही शिवसेनेने पाहावे तरच हा रक्तदानाचा महायज्ञ सार्थकी लागेल.. सेनेचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा! तात्या.

वेलडन प्राजु!!!!!!

लेखक रानी १३ यांनी सोमवार, 26/04/2010 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
http://72.78.249.124/esakal/20100426/5294049976436762087.htm आधीची बातमी काही अंशी खरी होती.. मात्र त्यात काही चुकीची माहिती दिली गेल्याने, मी या सुधारीत बातमीचा दुवा इथे देत आहे. -(प्राजक्ता)

आरसा तिच्या शयन गृहाचा !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 26/04/2010 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
आरसा तिच्या शयन गृहाचा ! ! ! तुझ्या शयन गृहाच्या आरशाची असूया मला न्याहळत असतो तो जरा जास्तच तुला. तूहि तितकीच निलाजरी. नेत्रपल्लवी होता त्यासवे खुदकन गोड गाली हसते, होता नजरा-नजर माझ्यासंगे मात्र लाज वदनी अन नजर तुझी खाली असते. “ तासनतास काय चालते ग हितगुज तुमचे “ ? आजतागत नाही कळले मला माझ्यापरी सखा प्यारा तुझा अन सख्खा वैरी माझा ! ! ! आसुसलेली नजर त्याची जाण कशी नाही तुला ?

धुम्रपान कसे सोडावे

लेखक अंगद यांनी सोमवार, 26/04/2010 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, मी धुम्रपान करतो. क्रॉनिक कॅटॅगरीत मोडणारा स्मोकर आहे मी. मागच्या काही दिवसात धुम्रपान सोडण्याची इच्छा बळावली आहे. (गरज झाली आहे) मी धुम्रपान खुप कमी करु शकतो, अगदी दिवसाकाठी एक इथपर्यंतही कमी करु शकतो पण पुर्णपणे सोडु शकलेलो नाही. मिपावरच्या गुणीजनांचे मार्गदर्शन, अनुभव यांवर चर्चा अपेक्षित आहे. धन्यवाद.