माननीय मिपाकरहो,
या पूर्वी मी काही जणांवर बिनकामी धागे काढले म्हणून टीका केली त्यांची जाहीर माफी मागून मी हा धागा काढत आहे. काय करणार माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता! मिपाकर नक्की मदतीला धावून येतील अशी आशा मला आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी भारतात येणार आहे आणि मला माझ्या गर्लफ्रेन्डला एक सरप्राईजिंग, रोमँटिक डेटवर घेऊन जायचं आहे. नेहमी पेक्षा थोडंसं वेगळं असं काही झालं तर हा दिवस आमच्या दोघांच्याही लक्षात कायम राहील. मला तिला जाम खूष करायचं आहे. :X
इतर गोष्टींची थोडी फार माहिती सांगितली म्हणजे पर्याय सुचवायला मदत होईल असे वाटते.