गृहप्रवेश
"पसंत आहे हं आमच्या जयला तुमची लेक" आईंचा फोन आला आणि आमच्या घरचं वातावरण एकदाचं मोकळं झालं. दहा-बारा मुलगे बघितल्यावर आपल्या नकटीला हा जयदीप चित्रे पसंत पडलाय तर आता त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळतोय की नाही या चिंतेत आई बाबा होते.
त्या रात्री काही मला झोप म्हणून लागली नाही. आपलं लग्न होणार आता, म्हणजे नवीन घरात रहायला जायचं, दिवसाचं रूटीन पुर्णपणे बदलणार. आई, बाबा, चिनूला भेटायला परवानग्या काढाव्या लागतील की काय?!... आणि मुख्य म्हणजे हा प्राणी जयदीप.. तसा त्या दिवशी बरा वाटला.. सुलझा हुआ, डिसेंट, लेव्हल हेडेड वगैरे वगैरे, पण खरंच तसा असेल ना??... काय हे, लग्न कंपलसरी का आहे?!...
नंतरच्या बैठका, साखरपुडा, खरेदी, जुन्याच जागा एकमेकांबरोबर नव्याने अनुभवणं यांत तीन महीने कसे गेले कळलंसुद्धा नाही. एकदाचं लग्न झालं आणि चित्र्यांच्या घरात माझा गृहप्रवेश झाला.
स्वागताला दारात माझी नणंद धनू उभी होती. तिला पाहिलं आणि खुप आश्वस्त वाटलं. शांत, स्निग्ध धनश्री. खरेदीच्या वेळी आणि इतर एक दोनदा आम्ही भेटलो होतो तेव्हाच आवडली होती मला... फारसं न बोलणारी, बुजरी, साधी पण व्यवस्थित रहाणारी.. का कोण जाणे थोडीशी विझलेली, धनू. पण मला खरी चिंता वाटत होती शेंडेफळाची... मुक्ता! नावाप्रमाणेच मुक्त, हुशार, अल्लड... आणि मुख्य म्हणजे बंधुराजांबद्दल प्रचंड पझेसिव्ह!.. बापरे, माझ्याबद्दल आकस असणारच हिला!.. नो वंडर टक लावून माझं निरिक्षण चालू असतं ते. या मॅडम मागे होत्याच मी माप ओलांडताना.
हनीमूनचे मोरपंखी दिवस भुर्रकन उडून गेले... परतीच्या प्रवासातच आमचं झकासपैकी भांडण झालं आणि संसाराची मुहूर्तमेढ रोवली गेली! माझं आणि जयदीपचंही नवं रूटीन, नवीन घरचं नवीन वातावरण, नवीन नातेवाईक, नवे शेजारी, सासुबाई आणि त्यांच्या रितीभाती... या सगळ्यांशी जुळवताना मजा येत होती. धनू आणि मुक्ताशी पण बऱ्यापैकी वेव्हलेंथ जुळत होती, अर्थात आम्ही तिघीही नोकरीवाल्या असल्याने एकमेकींपासून सुरक्षित अंतरावर आपापल्या शेड्युल्समध्ये व्यस्त होतो. सगळं छान चाललं होतं..
हे कमी की काय म्हणून आम्ही घरात ’गोड बातमी’ आणली. मुक्ताबाई डॉक्टर असल्याने यु पी टी चा रिझल्ट पाहिल्यावर तिच्या कपाळावरच्या किंचित आठ्यांची माझ्या मनाने नोंद घेतली... हं बाईसाहेबांना जड जात होतं तर दादाच्या प्रेमात नवनवीन वाटेकरी पचवायला! म्हटलं असो, चालायचंच...
आणि पुढच्या बाराच दिवसांनी सकाळी पोटात प्रचंड दुखायला लागलं. नेमकी मी सुट्टी घेतली असल्याने घरी एकटीच होते. ताबडतोब मुक्ताला फोन केला, ती मला घ्यायला धावत पळत आली आणि पंधराव्या मिनीटाला आम्ही नर्सिंग होममध्ये होतो. एव्हाना रक्तस्राव सुरू झाला होता.. डॉक्टरांनी दोन इंजेक्शन्स दिली होती... धीर देणं तर सुरू होतंच, पण तरी काय होतंय हे मी समजून चुकले होते.
मध्ये पंधरा वीस मिनीटं मुक्ता गायब होती.. डॉक्टरांनी मला पडून रहायला सांगितलं होतं... जयदीपला पोचायला अर्धा तास तरी लागणार होता... खूप एकटं, असहाय वाटत होतं मला आणि तेवढ्यात मुक्ता आली... तिचा चेहरा त्या क्षणी इतका पिळवटून निघाला होता वेदनेने.. दु:खाने!! इतक्या दिवसांत कधीही न दिसलेली एक वेगळीच मुक्ता माझ्यासमोर उभी होती. गंभीर, विचारी, तरीही जबरदस्त धक्क्याने ढवळून निघालेली मुक्ता!! म्हणाली, यु पी टी वीक पॉझिटीव्ह दिसली तेव्हाच माझ्या मनात शंका आली होती... हे बोलताना इतका करूण, हरलेला भाव होता तिच्या नजरेत.. कधीही कधीही विसरू शकत नाही मी ती नजर. त्या क्षणी... त्याच क्षणी तिची ओळख पटली मला.. दॅट वॉज द मोमेंट ऑफ कनेक्शन!!
वरवर मजेशीर, लहान असल्याची पुरेपूर वसुली करणाऱ्या, पी जे सांगणाऱ्या, सदैव खिदळणाऱ्या प्रकरणाच्या आत हे रसायन होतं तर! आणि मी मात्र मुर्खासारखी थिल्लर शंका घेण्यात डोकं खपवत होते... नंतर सगळे आले, सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते.
खरं सांगू, या वाईटातून चांगलं हे झालं की मी चित्र्यांच्या घराशी जोडले गेले. धनुचं मूकपणे माझ्या कपाळावर हात फिरवत रहाणं, आईंचं नवस बोलणं.. आणि जयदीपचं अस्वस्थ असणं, विमनस्कपणे पण तरीही "सगळं होईल ग व्यवस्थित" असं सारखं म्हणत रहाणं... जाणवलं, खरंच ही सगळी माणसं किती छान आहेत... किती साधी, किती प्रेमळ आणि टिपीकल आपल्यासारखी आहेत... तरीही कित्ती वेगळी! खूप बरं वाटलं मला. सगळ्या शंका फिटल्या. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून घरी जाताना माझ्याच नकळत माझी नवेपणाची झूल भिरकावून दिली गेली आणि खऱ्या अर्थाने माझ्या घरात माझा गृहप्रवेश झाला.
स्मृती चित्रे
याद्या
6644
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
व्वा
फार
छान
असेच
In reply to छान by रेवती
अफलातून....
प्रकटन
छान....
छान
छान आहे.
साधं सरळ
गृहप्रवेश
धन्यवाद
खूप छान
सुरेख
छान आणि
छान
लेखन आवडले
उत्तम...
आडनाव भगिनी !
अहो चित्रे
In reply to आडनाव भगिनी ! by संदीप चित्रे
अरे व्वा !
In reply to अहो चित्रे by शुचि
मला चिंबोरीचा रस्सा
In reply to अरे व्वा ! by संदीप चित्रे
'जात नाही
In reply to मला चिंबोरीचा रस्सा by शुचि
सुंदर लेख..मनस्वी लिखाण !!
स्मृतीचित्रे ?
साध्या
सहजसुन्दर
सुरेख लिखाण!
... माझ्या
व्वा !
ज्यांना जयदीप चित्र्यांसारखे
In reply to व्वा ! by नंदू
ज्यांना
In reply to ज्यांना जयदीप चित्र्यांसारखे by चतुरंग
सुंदर!!
सुरेख!
तरल अनुभवचित्रण