लहानपणच्या आठवणी
"बेट्या, आता तू मोठा झालास. आता वेगळ्या ताटात जेवत जा." मी लहानपणी तिसरीत जाईतो बाबांच्या ताटात जेवायचे. यामुळे त्यांच्या तिखट खाण्याच्या प्रमाणाला आळा बसायचा त्यामुळे ते करवादायचे पण लहान लेकराला काय म्हणा म्हणून असा क्षीण प्रयत्न करायचे.
"पुढच्या वर्षीपासून जेवत जाईन वेगळ्या ताटात. अजून मी छोटीच आहे." बागेत जाऊया, सर्कस बघायचीये, नवे बूट घ्यायचे वगैरे म्हटले की बाबांचे "पुढच्या वर्षी" हे उत्तर इतके ठरलेले असायचे की तेच उत्तर माझ्या तोंडून बाहेर पडल्यास नवल ते कसले?
~~~
बाबांच्या हापिसात बसून त्यांच्या कामात त्यांना मदत करण्याची मला कायम हौस.
मिसळपाव
खेकडा असा धरावा :).....
या संस्थळावर पूर्वी काही कर्तबगार स्त्रियांची चरित्रे वाचली होती. नुकत्याच मरण पावलेल्या लुई़ज बूर्ज्वाची कहाणी त्या माळेत शोभावीशी आहे. शास्त्रज्ञांचे जग जसे पुरुषप्रधान आहे, तसेच दृश्यकला क्षेत्रही विसाव्या शतकाआधी स्त्रियांना फारशी भीक घालीत नव्हते. त्यात ती स्त्री बंडखोर असेल, तर तिला अधिकच त्रास होत असे. आजही भारतीयांना पाश्चिमात्य स्त्री कलाकार फारच क्वचित परिचयाचे असतात.