Skip to main content

आईचा मुलगा हरवला.. (लोकल गोष्टी-५ )

लेखक स्वाती फडणीस यांनी शुक्रवार, 23/07/2010 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
आईचा मुलगा हरवला.. =========================================== ऑर्कुटवरील 'काव्यांजली' या कवितासंबंधित फोरमचा ठाण्यात दुपारी चार वाजता काव्यवाचनाचा कार्यक्रम होता.. नाव चेहरे नसलेले लोक साक्षात एकमेकांसमोर अवतरणार होते.. यातले काही आधीच्या कार्यक्रमांमुळे जमणाऱ्यांच्या माहितीतले.. मी मात्र पहिल्यांदाच जात होते.. किंबहुधा काव्यवाचन ऐकायला आणि करायलाही पहिल्यांदाच जात होते.. त्यातून कार्यक्रम ठाण्याला जिकडे माझे सहसा जाणे होत नाही. त्यामुळे एक वेगळीच अस्वस्थता, हुरहूर कम भीती मनाला घेरून होती. वेळेवर पोहचता यावं म्हणून घरातून मी दीड-पावणेदोन तास आधीच निघाले..

पाध्यांचे मनोगत

लेखक नितिन थत्ते यांनी शुक्रवार, 23/07/2010 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
निवेदनः संपादकांच्या अधिकारांबाबत नाराजी व्यक्त करून वातावरण कलुषित केल्याचे प्रायश्चित्त म्हणून काही दिवस स्वसंयमाची रजा घ्यायचे ठरवले होते. त्यामुळे गढुळलेले वातावरण निवळेल असे वाटले होते. परंतु दुसर्‍या बाजूकडून अपेक्षित असलेला संयम दिसला नाही. आणि मुद्दाम खाजवून काढल्याप्रमाणे धागे -- धागे येत राहिले. (आणि ते उडाले नाहीत). म्हणून प्रायश्चित्त रद्द करून पुनरागमन करीत आहे.
काव्यरस

छोटे छोटे प्रश्न...!

लेखक श्रीराजे यांनी शुक्रवार, 23/07/2010 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
एका वृत्तपत्रातले कात्रण ई-मेल मधुन आले. त्यातील प्रश्न मलापण नेहमी पडतात. उत्तरे मात्र मिळत नाहीत.... खालील काही मजेशीर प्रश्न तुमच्यासाठी: १) मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्रजी पेपरपेक्षा कमी का? - (माझ्या पाहण्यात काही ठीकाणी सारखाच भाव आहे.) २) उडप्याच्या हॉटेलात कांदाभजी का मिळत नाहित? ३) लहान बाळाशी बोलताना मोठी माणसं बोबडं का बोलतात? ४) 'मीचं म्हणून तुमच्याशी संसार केला' असं प्रत्येक बाई आपल्या नवर्‍याला का म्हणते? :?

आभार प्रदर्शन..

लेखक भारतीय यांनी शुक्रवार, 23/07/2010 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
आणि एकदाचे आम्ही येथे दाखल झालो आहोत..!! येथे ज्या दिवशी खाते बनवले, त्याच दिवशी मी जात पडताळणीसाठी सूद्धा अर्ज केला होता.. जातपडताळणी अर्ज केन्व्हाच मिळाला , पण इथले सदस्यनाम काही सक्रीय होत नव्हते..! मी उगीचच सरकारी कर्मचार्यान्ना कामाच्या दीरन्गाईबद्दल दूषण देत असतो.. बरे, ते असो.. इथे प्रवेश दिल्यबद्दल सम्पादक मन्डळीन्चे मनापासून आभार.. आणि खासकरून शिल्पाताइन्चे विशेष आभार.. तुम्ही चान्गले सहकार्य केले येथे येण्यासाठी..

टाईम पास

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 23/07/2010 02:39 या दिवशी प्रकाशित केले.
जॅमर (पूर्वीचा सदैव भरवाडगे (पूर्वीचा जर्क)) चित्र जालावरून साभार

हायब्रिड जमाना

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी गुरुवार, 22/07/2010 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
साऱ्‍या दुनियेचं हायब्रिडिंग झालंय. नवनव्या संकरित बियाण्यांपासून उपजलेली निसत्व पिके खाऊन शरीर पोकळ बनलेय. धान्यांच्या बिजापासून ते स्त्री-पुरुष बिजापर्यँत सर्वच ठिकाणी संकरित जग विस्तारलंय. पूर्वीची माणसं ऐटीत जगायची, हसता हसता गचकायची, कळायचंसुद्धा नाही. आता मरणाचंही हायब्रिडिंग होत असतं! आजकाल सहज, सुखनैव मृत्यु येतच नाही. किमान दोन दिवस तरी कृत्रिम श्वासावर मेलेल्या म्हाताऱ्‍यांना ताटकळत ठेवतात. (पुरेसं बिल वसूल झाले की मगच डेथ डिक्लिअर करतात!) जगणेसुद्धा संकरितच म्हणायचे. कारण गर्भ रहावा म्हणून गोळ्या, तो टिकावा म्हणून इंजेक्शने, सुखरूप प्रसूतिसाठी अनेक उपचार सुरू असतात.

कोकणवाटांचा पाऊस-थरार

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 22/07/2010 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
"ए भाऊ, अरे किती गुटखा खाशील! चांगला नाही बरं तब्येतीला. तू ऐक माझं.. सोडून दे असली वाईट सवय! अरे, तरुण वय आहे तुमचं, ह्या वयात कशी रे अशी व्यसनं करता पोरं तुम्ही! ते काही नाही, तू आजपासून गुटखा कमी करायचास.... " आमच्या अंदाजे वय वर्षे पासष्टच्या प्राध्यापिकाबाई आमच्या कोकणप्रवासासाठी भाड्याने घेतलेल्या ट्रॅक्सच्या चालकाला खडसावत होत्या. त्यांचेही बरोबर होते म्हणा! जेमतेम तेवीस-चोवीस वय असेल त्याचं... आणि दर अर्ध्या तासाला एक गुटख्याची पुडी त्याच्या तोंडात रिकामी होत होती. पुढे प्रवासात त्याची इतर माहितीही समजली. बालाजी त्याचं नाव. शिक्षण दहावीपर्यंत असावं.

देवा एक माझे | पुरवावे कोड |

लेखक सागरलहरी यांनी गुरुवार, 22/07/2010 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
देवा एक माझे | पुरवावे कोड | तुझे माझे आड | नको काही || नको कर्म कांड | नको ब्रह्म माया | येर झार वाया | संसाराची || नको बडिवार | सोवळे ओवळे | तेणे ना आकळे | सत्य तत्त्व || देवा ऐसे द्यावे | मज वरदान | नामानुसंधान | राहो सदा || तुझी श्याम मूर्ती | सदा राहो चित्ती | आणि सर्व वृत्ती | तुझे पाशी || सदाचा सन्नीध | माझ्या देव आहे | प्रेमे मज पाहे | ऐसे व्हावे || अलोट ते सुख | तुज मी स्मरावे | अंतरी राखावे | समचरण || प्रेम सागराचा | पूर तुझे दारी | सर्वत्र श्री-हरी | बाकी काय || -- सागर लहरी २२.७.२०१०