साहित्य-- एक किलो तांदूळ, अर्धा किलो चना डाळ, पाव किलो उडीद डाळ, वाटीभर पोहे, एक डाव धने, एक डाव जिरे.
कॄती----- तांदूळ व चना डाळ धुवून पसरुन ठेवावी, जरा वाळत आली की भाजायला घ्यावी,
मुठ शेकी ( म्हणजे भाजणी खमंग न भाजता त्यातून चांगल्या गरम वाफ़ा येउ लागल्या की भाजणे बंद करावे.) ,
भाजणी नेहमी मंद आचेवर भाजावी,उडीद डाळ धुवु नये, तशीच भाजावी,
धने - जिरे भाजावेत.पोहे भाजावेत. गार झाल्यावर बारीक दळून आणावी.