...
...
सावली देणारे पण ...
माझ्या शेजारच्या आंगणातलं गुलमोहोराचं झाड चांगली सावली देत होतं. पण त्याची मुळं वर जमिनीतून पसरून ८/१० फुटांवरील इमारतीलाच धोका ठरू लागली. म्हणून शेवटी शेजार्याने ते पाडून टाकलं.
आता दिवसभर दोघांच्याही अंगणात कडक ऊन लागते. म्हणून मी अश्या झाडांच्या शोधात आहे, जे वरती छान सावली देईल पण त्याची मुळं जमिनीत खोलवर जातील, जेणेकरून माझ्या किंवा आजूबाजूच्या कुठल्याच इमारतीला त्या झाडामुळे धोका संभवणार नाही.
अशी कोणती झाडं सहज उपलब्ध होत असल्यास तज्ञांनी ह्याच धाग्यावर कळवावे ही नम्र विनंति.
...
..
भाषिक संपत्ती
भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले.
सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे.
असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार.
कित्ती कित्ती छान!
परवाचाच अनुभव आहे. म्हणावे तर साधासाच. पण खूप काही शिकवून जाणारा. असे अनुभवच आपले जीवन खुलवत असतात, फुलवत असतात. आयुष्याचे निराळेच पैलू अवचित आपल्या समोर आणून आपले भावविश्व कुठेतरी समृद्ध करत असतात.
झालं असं की मी बस मधून एके ठिकाणी निघालो होतो. आत गेल्यावर बसायला जागा मिळाल्याने स्वारी थोडी खुष होती. एक दोन स्टॉप गेल्यावर अचानक एक मध्यम वयीन काकू आल्या आणि ओरडूनच म्हणाल्या की मला बसू द्या..स्त्रीयांचा काही मान ठेवत नाहीत.. नियम पाळत नाहीत वगैरे वगैरे.. मी खरेतर स्त्रीयांसाठी राखीव जागेवर बसलो नव्हतो. माझा चेहरा एकदम गोरामोरा झाला.
पुणेरी आजोळ- ई-पुस्तक प्रकशित..
पुण्यासारखं आजोळ लाभणं म्हणजे कोणतंतरी पुण्यकर्मच म्हणायचं. पुण्याशी नातं जोडायला अनेकजण उत्सुक असतात. मग ते राजकीय असो वा सामाजिक अथवा वैयक्तिक. तिचं माहेर पुणं आहे याचा आमच्या आईला पराकोटीचा अभिमान होता. पुण्याशी नाळ जोडलेली होती ती अशी. मराठी वाचक असो वा लेखक पुण्याची हौस अन् आस सर्वांनाच. बहुतेक मराठी 'नेट'कर हे पुणेकरच आहेत. पुणे जिल्ह्याच्या हद्दी नजिक असले तरी नेटीव्ह प्लेस म्हणून पुण्याचा उल्लेख करायला कचरत नाहीत. इतका पुण्याचा सर्वांना लळा लागलेला असतांना आम्ही तर ते आजोळच्या नात्यानं पाहिलं, अनुभवलं.
आई..मिटलेला श्वास - ३
आई..मिटलेला श्वास - २ ... http://www.misalpav.com/node/15014
पार्श्वभुमी: मळकट पायवाट .. गावाला दूर गेल्यावर ही तेथील प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्या आई बद्दलच्या दाटुन आलेल्या भावनांच्या या पारंब्या
ते वडाचे झाड वाळके
दोरा बोहताली करकच्च
स्वप्नझुल्यांच्या पारंब्या ओस
भावना दाटलेल्या भरगच्च
आकाशात किंचाळते वीज
सुनसान मी भयभीत
स्मरणात तुझीया संपते
खोल हुंदक्यांची रात
रस्त्यात उभे वारुळ
मनाचे उडलेले डाग
स्वप्नपारंब्या खाली
निजते माझे विचारगाव
----- शब्दमेघ
काव्यरस
बाबा झाल्यावर....
आताशा माझे पिल्लू ३ वर्षे १० महिन्यांचे आहे, कधी अड़ते कधी पड़ते. कधी त्याला समजावतो कधी रागावतो.
हे त्याच्या वागन्या पेक्षा माझ्या मूड वर जास्त अवलंबून असते. नंतर उगाच विचार करतो बाबा पण असेच काही करायचे ना.
लहानपणी मी एकदा घरात काहीतरी माझ्या मनासारखे झाले नाही म्हणून चिडून बसलो होतो आणि मग घर सोडायला निघालो होतो, फकत बाबांची वाट पाहत होतो. अशासाठी की बाबा येउन माझा प्रश्न सोडवू शकतील अशी आशा होती. बाबा आले शालेतुन आणि घराबाहेर पाय-यावर बसून माझ्या बरोबर बोलत होते १० च मिनिटे.
मिसळपाव