पश्चिम महाराष्ट्राचे प्रेमगीत
लेखनविषय:
काव्यरस
उसाच्या कांड्यांनी रट्टे खाताना,
भुईमुगानं हात द्यावा ,
तशी आलीस आयुष्यात तू ,
आंतरपीक होवून .
मोर्चात माझ्या शर्टाला बिल्ला लावताना,
जेव्हा म्हणालीस की
अगदी शेट्टी सायबासारखं बोलता की ओ ,
तेव्हाच ओळखलं मी .
म्हटलं ,
मळ्याला मालकीण गावली .
एकदाची .
पण आता बांधावर उभारून किती दिवस बघायची वाट ?
झुगारून दे ही जुलमाची झोनबंदी ,
माव्या सारखा पसरलाय विरह.
शिवारभर .
तुझ्या ओठातून
पिवू दे मला एन्डोसल्फान ,
तुझ्या श्वासाची भुकटी भुरभूरु दे माझ्या गात्रा गात्रावर
फॉलीडॉल होवून.
होवून जावू दे
उभ्या देहाची
साखर.
वाचने
2199
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
हॅ हॅ हॅ हॅ
एकदम पहिल्या धारेच्या मॉलॅसीस ची आठवण झाली
हॅ हॅ हॅ.. मस्तं कविता..
(उसा-शिवारातला)पेशवे
मस्तच ... एकदम वेगळीच कविता!
जबरा रे ....
असली खणखणीत प्रेमकविता वाचुन मला बाटलीभर रोगार प्यायल्यासारखी नशा झाली बॉ!
मस्त हो. :)
तुझ्या ओठातून पिवू दे मला एन्डोसल्फान ,=)) =)) =)) मायला....ओठातुन एन्डोस्ल्फान???? =)) =)) =))
मस्तच ... एकदम वेगळीच कविता!
जबरा... अजून पिकं येवूंदे
उसाच्या कांड्यांनी रट्टे खाताना,
भुईमुगानं हात द्यावा ,
तशी आलीस आयुष्यात तू ,
आंतरपीक होवून
हे एकदम झकास
होवून जावू दे
उभ्या देहाची
साखर.
-अथांग.
>मस्तच
मात्रा छंद वैगेरे ची आई बहिण केली आहे ...
तरी पण आवडली.
naadala chattya.....
आजुन एक अडगळ स्पेशल....
हॅ हॅ हॅ हॅ एकदम पहिल्या