वर्षाव
लेखनप्रकार
कणेकरांचं 'मेतकूट' आणि 'आंबटचिंबट' वाचल्यानंतर या माणसाला लागलेली मृत्यूची चाहूल डोळ्यासमोर दिसते. आता त्यांना दिलीपकुमारचे चित्रपटही पहावेसे वाटत नाहीत, म्हणजे त्यांच्यासारख्या अट्टल युसुफचाहत्याचा हा जिवंतपणी झालेला मृत्यूच. असे दिवसेंदिवस शुष्क होत टप्प्याटप्प्याने मरण्यापेक्षा रसरशीतपणे एकदाच मेलेले काय वाईट?
-----------------------------------------------------------------------------
'मी लहानपणी दूध पीत असे' या वाक्यात 'मी' च्या जागी 'तू' हा कर्ता केला तर हे वाक्य कसे होईल असा प्रश्न आम्ही लहानपणी ज्यालात्याला विचारत असू. 'तू लहानपणी दूध पीत होतास' असे उत्तर आले की खदाखदा हसत एकमेकांना टाळ्या देत असू. तर मग 'मी लहानपणी दूध पीत होतो' चे रुपांतर काय असा दुसरा प्रश्न असे. 'तू लहानपणी दूध पीत असस' हे बरोबर उत्तर कुणालाच देता आले नव्हते.
-----------------------------------------------------------------------------
मीना प्रभूंची पुस्तके म्हणजे एक अजब कंटाळा आहे. 'नवर्याच्या पैशाने' वगैरे संदर्भ सोडून द्या. पण या बाईला एक जबरदस्त 'अॅटिट्यूड' आहे. एरवी इजिप्तमध्ये जाऊन तिथल्या लोकांना मुस्लिम धर्म किती मागासलेला, बुरसटलेला आहे यावर व्याख्याने देणे म्हणजे कमाल आहे. आणि माहिती वगैरे म्हणाल तर आजकाल काय विकिपिडिया वाचून कुणीही लिहू शकतो. प्रवासवर्णन आणि एखाद्या ठिकाणाबद्दलच टूरिस्ट गाईड यात काही फरक असावा की नाही?
-----------------------------------------------------------------------------
बालूशाही बर्याच लोकांना आवडत नाही, कारण चांगली बालूशाही फार कमी ठिकाणी करतात. तुपकट पिठाळ गठ्ठा म्हणजे बालूशाही नव्हे. खरी बालूशाही तुपाचा स्वाद असलेली, पण खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी असते. आधी असली फर्मास बालूशाही, मग ताजी तळलेली खमंग पापडी, तिच्याबरोबर तळलेल्या आणि मिठात घोळलेल्या हिरव्या मिरच्या आणि मग अर्धा कप दाट चहा असे करुन एक सिगरेट ओढली की मी मरायला मोकळा झालो.
-----------------------------------------------------------------------------
'नटरंग' फालतू आहे. अतुल कुलकर्णीच्या वाढवलेल्या आणि उतरवलेल्या वजनाचेच इतके कौतुक असेल तर अदनान सामीही थोर आहे. नाच्याच्या भूमिकेत गणपत पाटलांनी जे बेंचमार्किंग केले आहे, त्याच्या जवळपास जाणेही कुणाला जमलेले नाही. अतुल कुलकर्णीला तर नाहीच नाही.
----------------------------------------------------------------------------
खालच्या दामले काकूंचं वय आता पंच्याहत्तर तरी असेल. त्यांच्या त्या किरट्या आवाजात त्या त्यांच्या कुठल्या तरी ऑस्ट्रेलियातल्या भाचीचं पाईल्सचं ऑपरेशन किंवा त्यांच्या इंदूरच्या पुतण्याची पीएचडी यावर कुणालाही जिन्यात गाठून तासनतास पिळत असतात. त्यांची मान भरतनाट्यम केल्यासारखी नाचत असते आणि त्यांच्या ब्लाऊझमधून मागच्या बाजूने ब्रेसियरची पट्टी बाहेर आलेली असते.
-----------------------------------------------------------------------------
मेसमधलं जेवण अगदी भिकार असे. पण रात्री उशीर झाला की स्वामी सकाळचं उरलेलं उप्पीट, शिरा असलं काहीतरी आणून जेवत असलेल्या लोकांना वाढत असे. ते आंबलेलं, तेलकट उप्पीटच त्यातल्या त्यात बरं लागे. मी आणि शिर्के म्हणून मुद्दाम उशीरा जेवायला जात असू.
-----------------------------------------------------------------------------
अलाहाबाद संगमावर ते किळसवाणं पाणी बघून मला अजिबात अंघोळ करावीशी वाटली नाही. 'बाबूजी, यहां तो सौ जन्मोंके पाप धुल जाते है' असं म्हणणार्या नाविकाला मी 'क्या मै आपको इतना पापी लगता हूं?' असं फटकारलं होतं.
-----------------------------------------------------------------------------
आता नेमाडे बास. कोसला, जरीला, हूल, झूल. फिनीतो. हिंदूबिंदू बकवास. धाडकन पाण्यात मुटका मारायचा आणि पाणी उडवून मजा बघायची या ट्रिक्सना आम्ही फसणार नाही. नेमाडे, यू आर हिस्टरी.
-----------------------------------------------------------------------------
मदनमोहनला गाणी रेकॉर्ड करण्यासाठी स्टुडिओही मिळू नये म्हणून महिनोनमहिने काम नसताना स्टुडिओ आणि वादक बुक करुन ठेवणार्यांमध्ये शंकर जयकिशनही होते म्हणे. रईस खान यांच्याबरोबर मतभेद झाल्यानंतर मदनमोहन यांनी त्यांच्या कुठल्याच गाण्यात सतार वापरली नाही म्हणे. आपल्या फिटनेसबद्दल जागरुक असणार्या मदनमोहनला काही महिन्यांत मरण्यासाठी किती दारु प्यावी लागली असेल? आणि इतकी दारु पिण्यासाठी त्याच्या जिवाला केवढ्या कळा लागल्या असतील?
-----------------------------------------------------------------------------
इंग्रजी ही काही आपली भाषा नाही. दहातले किमान सहा स्वतःची ओळख करुन देताना 'मायसेल्फ अमुकतमुक' असं म्हणतात. ('चष्मे बद्दूर' मधला रवी वासवानीही असेच म्हणतो. याला म्हणायचं ऑब्झर्वेशन. सई परांजपे, तुस्सी ग्रेट हो.) आता या वाक्यात क्रियापद कुठे आहे? इंग्रजी ही काही आपली भाषा नाही.
----------------------------------------------------------------------------
'मजरुह लिख रहे है वो अहले वफा का नाम, हम भी खडे हुवे है गुनहगार की तरह' या एकाच गाण्यात मजरुह यांनी आपलं नाव गुंफलं आहे. हे गाणं आणि 'रहते थे कभी जिनके दिल में' हे गाणं यात माझा नेहमी गोंधळ होतो.
----------------------------------------------------------------------------
गणेशोत्सवातच्या मिरवणुकीत सगळ्यात बीभत्स डान्स करणारं मंडळ कुठलं यांची एक स्पर्धा ठेवली पाहिजे. अलकाच्या चौकात आपल्या चड्डीचं इलॅस्टिक पुढे ताणून धरुन त्यातून मोदक काढून वाटल्यासारखी अॅक्शन करत नाचणारा एक तरुण काही वर्षांपूर्वी मी पाहिला होता. असले 'आऊट ऑफ दी बॉक्स' विचार करणारेच समाजाला पुढे नेत असतात . या तरुणांना पुढे योग्य दिशा मिळत असेल की नाही कुणास ठाऊक!
-----------------------------------------------------------------------------
लाह्याच्या पिठाचा लाडू खाऊन कित्येक वर्षं झाली. गूळ घातलेल्या दुधात लाह्याचं पीठ भिजवलं की झाला लाडू. लाह्यांची भाजलेली चव फार मस्त लागते.
----------------------------------------------------------------------------
स्त्रीपुरुषांचे अनैतिक संबंध ही काही अचानक फोफावलेली चळवळ नाही. साठीच्या दशकात एका हिंदी चित्रपटाचं शूटिंग सुरु असताना नायकाच्या आईचं काम करणार्या नटीला नायकाचं काम करणार्या नटाकडून दिवस गेले होते म्हणे. 'जिस देश में गंगा बहती है' च्या शूटिंगदरम्यान पद्मिनीबरोबर मजा करायला मिळावी म्हणून तिच्यावर पाळत ठेवणार्या तिच्या आईला देण्यात येणार्या दुधात राज कपूर झोपेचं औषध टाकत असे म्हणे. 'होटों पे सच्चाई रहती है, जहां दिल में सफाई रहती है' चं चित्रीकरण करताना त्याला या अनुभवाचा उपयोग झाला असेल काय?
वाचने
19903
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
ट्विटर..?
आयला...
In reply to आयला... by धमाल मुलगा
अजिबात
In reply to अजिबात by श्रावण मोडक
हां, मग ठीक आहे. एकुणच मजकुर
In reply to हां, मग ठीक आहे. एकुणच मजकुर by धमाल मुलगा
बोलला रे बोलला..
In reply to बोलला रे बोलला.. by चिगो
खी खी खी!
प्रकाटाआ
रावसाहेब,
मेणचट आहे! लगेच टंकून मोकळे
In reply to मेणचट आहे! लगेच टंकून मोकळे by मनिष
_/\_
मी पण...
झ - का - स!
In reply to झ - का - स! by स्मृती
असेच म्हणतो
म्हणुन मी मागेच सुचवलं होतं कि..
In reply to म्हणुन मी मागेच सुचवलं होतं कि.. by जाई अस्सल कोल्हापुरी
+१ हे वाचून जाई तैंच्या वमन
In reply to म्हणुन मी मागेच सुचवलं होतं कि.. by जाई अस्सल कोल्हापुरी
सहमत आहे. सामुहीक पान
लेखाचं शीर्षक
मला आवडलेलं आहे. नक्कीच. आणि
आवडला
वर्षाव आवडला. पण याला ट्विट
ट्विटस् आवडले
थेंब
वर्षाव
"अवांतर" प्रतिसाद
सारवासारव कशासाठी...............
आंय???
आवडला
In reply to आवडला by राजेश घासकडवी
+१
छान.....
जबराट
वा!
मीना प्रभू, नेमाडे, कणेकर या
वर्षाव नक्कीच आवडला
नन्नाचा पाढा
व्वा....
In reply to व्वा.... by मन१
सहमत.. पण 'तो' कॉपीराइट चा
अतुल कुलकर्णीच्या वाढवलेल्या
राव साहेब
In reply to राव साहेब by रामदास
बिझी बी
In reply to राव साहेब by रामदास
१+
'मी लहानपणी दूध पीत असे' या
वर्षाव आवडला. तरीपण रावसाहेब,