Skip to main content

तरीही तिने मुस्कुरावे कशाला ?...

लेखक मयुरेश साने यांनी गुरुवार, 25/11/2010 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
पसारे तुझे आवरावे कशाला ? स्वत:ला असे सावरावे कशाला ? झोकून देतो मझ्यातला मी तुझ्यातच असे सापडावे कशाला ? जरा सांज होता तुझी याद येते पारव्याने असे गीत गावे कशाला ? तुझा स्पर्श व्हावा विसावा सुखाचा तुझ्यातून मी वावरावे कशाला ? तुझ्या आठवांनी बिलगता कुशीला दीपकाने असे मंद व्हावे कशाला ? जरा कान देण्या कळी फूल होते भ्रमर गीत ऐकून बावरावे कशाला ? जीव उरला कुठे ? लावण्याला पणाला तरीही तिने मुस्कुरावे कशाला ? मयुरेश साने..दि..२४-नोव्हेंबर-१०
काव्यरस

आई... मिटलेला श्वास.. १०

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 25/11/2010 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ९ :- http://www.misalpav.com/node/15559 नयनांच्या ओंजळीत ओला सागर गहिरा स्पंदनांच्या ठोक्यावर आसवांच्या अधिर धारा आठवांच्या वाटेवर दु:ख पारावर घट्ट सुनसान विराण शांततेत सुन्न भयरात काळीकुट्ट आशेने नभाकडे पाहता चेहरा दिसतो आई सुर ही येता एकू वारा गातो अंगाई ---- शब्दमेघ
काव्यरस

२६/११ !

लेखक रन्गराव यांनी गुरुवार, 25/11/2010 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या २६/११! सगळी प्रसार माध्यम ह्या काळ्या दिवसाची आठवण न चुकता करून देतात. २६/११ म्हंटलं की मला गुलाल मधील "शहर हमारा सोयो थो" (http://www.youtube.com/watch?v=a4kSGe0wqbI) हे गाणं आठवतं. (का ते तुम्ही गाणं एकलं तर कळेलच). मग डोकं भनभनलंकी लगेच त्यातलच "सरफरोशीकी तमन्ना" एकतो ( स्वत:वर हसण्याची हिंमत असेल तरच लिन्क क्लिक करा http://www.youtube.com/watch?v=qWf1Fe_jPRE ). मग लगेच जैसे थे.

अधुरी प्रेम कहाणी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 25/11/2010 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
अधुरी प्रेम कहाणी का पुन्हा पुन्हा मी शोधते त्या भुत काळातल्या वाटा. का दु:ख्ख करुन घेते. जेंव्हा पायी रुततो काटा बसता अशा कातर वेळी कानी कोण गुणगुणे गाणी? झोंबताना ह्या कोवळ्या तनुस कोण करते भलतीच मागणी? ज्याने ह्रुदयास पीडा दिली तोच कसा ह्रदयी बसला? कोवळ्या मम तनुस छेडुन यौवन कसे जागवून गेला. कसा मी विसरु त्याला तो रोम रोमात भिनला सारखा तो आठवतो का? जो जखमा देवुन गेला तुझी लागलेली हि आस हा भास कि आभास आहे तु आता माझा नाहि हे मज का उमगत नाहि? केंव्हा सरेल ति माझी काळरात्र घनघोर अंधारी? कधि उजाडणार मम जिवनी ति पहाट सोनेरी? काय सांगु काय बोलु मन माझे था~यावर नाहि दाटुन येते निर नयनि लिहित
काव्यरस

कांद्याचे झटपट पराठे

लेखक Pearl यांनी गुरुवार, 25/11/2010 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, तिखट, थोडासा गोडा मसाला, तूप, नेहमीच्या साध्या पोळीसाठी मळलेली कणिक, तांदळाची पिठी, जिरे, तेल क्रुति: प्रथम एका ताटलीमध्ये कांदा, कोथिंबीर आणि जिरे मिक्स करुन घ्यावे. मीठ, तिखट लगेच घालू नये नाहितर पाणी सुटते. आता कणकेच्या दोन लहान लाट्या लाटून २ छोट्या पोळ्या करुन घ्याव्यात. त्यापैकी १ छोटी पोळी घेउन तिच्या एका बाजूला तूप लावून घ्या. मग एका पराठ्याला पुरेल इतके वरील कांद्याचे मिश्रण एका वाटीत/बाउलमधे घेउन त्यात चविपुरते मीठ, तिखट, थोडासा गोडा मसाला घालून हे मिश्रण एकजीव करुन ते तूप लावलेल्या पोळीवर पसरा.

एक (दुर्दैवी) फरक.....................

लेखक गांधीवादी यांनी गुरुवार, 25/11/2010 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
इथे मिपावर नेहमीच महाकाय चीन कसा निर्दयी आहे ह्याच्या चर्चा घडतात. पण हेही वाचा....... दिनांक १५ नोव्हेंबर २०१०, ह्या एकाच दिवशी नियतीने दोन ठिकाणी आपली वक्र नजर टाकली. ठिकाण क्र. एक दिल्ली : नवी दिल्ली - पूर्व दिल्लीत काल इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 66 झाली आहे. शहरातील विविध रुग्णालयांत 130 जखमींवर उपचार करण्यात येत असून, मूळ बातमी ठिकाण क्र.

५. सार्वजनिक सुविधा

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी गुरुवार, 25/11/2010 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडच्या पाणवठ्यावर उडणारा गडबड गोंधळ, आरडा ओरडा, वादावादी आजोळच्या सार्वजनिक नळावर कधी पहायला मिळाली नाही. सकाळी सात वाजता नळ आला (माझ्या दृष्टीने नवा वाक्प्रचार) की चाळीतल्या भांड्यांची धावपळ उडे. परंतु तीही शिस्तीत. खोली क्रमांकानुसार पाणी भरायचं. साधारणतः चार कुटुंबात एक नळ म्हणजे तोटी ठरवून दिलेली. एक नंबरच्या कुटुंबाने चार नंबरच्या नळाकडे जायचं नाही तर चार नंबरवाल्यांनी एक नंबरच्या तोटीखाली भांडं सरकवाचं नाही. असा अलिखित नियम असायचा, पाळलाही जायचा. गावाकडच्या बायकांना गप्पा झोडायला, चारचौघीत भांडणं उकरायला निवांत वेळ असायचा. नळ जाण्याची (आणखी एक वाक्प्रचार) त्यांना चिँता कसली?

सगळे बहाणे माफ आहेत प्रेमात !! [नवीन ]

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 25/11/2010 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
ती दिसली नि तिच्यावर जीव जडला असे होते काहो तुमचे ? [किंवाअसे कधी झाले होते काहो तुमचे ?] तसे माझे तर झाले बाबा! माझा तर चक्क बोल्ड झाला !! काय गमंत असते ह्या प्रेमाची जीव खरेच खुळावला काय आवडले मला तिचे ? डोळे? तिचे बोलणे ? नजरेतील कोवळेपणा ? काय कुणास ठाऊक ? पण माझा तर जीव जडला तिच्या साध्या साध्या संवादातून नि जीव माझा हरवून गेला !!! श्रावणातल्या सकाळी सकाळी ती आली की , किती छान दिसायची अबोली रंगाच्या साडीत ती किती मस्त वाटायची आई तिच्याशी बोलता बोलता माझ्याकडे हलकेच बघायची कुणास ठाऊक ती का अशी बघायची ?? का ती पण कोठल्या स्वप्नात हरवून जायची ? का तिला पण ती आवडायची ? नि मा
काव्यरस

सगळे बहाणे माफ आहेत प्रेमात !!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 25/11/2010 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
व खरेच खुळावला काय आवडले मला तिचे ? डोळे? तिचे बोलणे ? नजरेतील कोवळेपणा ? काय कुणास ठाऊक ? पण माझा तर जीव जडला तिच्या साध्या साध्या संवादातून नि जीव माझा हरवून गेला !!! श्रावणातल्या सकाळी सकाळी ती आली की , किती छान दिसायची अबोली रंगाच्या साडीत ती किती मस्त वाटायची आई तिच्याशी बोलता बोलता माझ्याकडे हलकेच बघायची कुणास ठाऊक ती का अशी बघायची ?? का ती पण कोठल्या स्वप्नात हरवून जायची ? का तिला पण ती आवडायची ? नि माझ्या भावी आयुष्यचे स्वप्न बघायची ?? कुणास ठाऊक ?? तिला सोडायला म्हणून मी थोडसे अंतर जायचो तेह्वा आभाळ किती गच्च वाटायचं निळे निळे एक वेह्लाळ पाखरू कसे छान गिरकी घ्य
काव्यरस

मुगाचे लाडू.

लेखक निवेदिता-ताई यांनी गुरुवार, 25/11/2010 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- एक पाव मुग डाळ, एक पाव गूळ, साजूक तूप एक वाटी. कॄती :- मुगडाळ खमंग भाजून घ्या.