Skip to main content

वंचना

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 28/11/2010 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
उलुशा वरणभातात सिंधुताईंनी रात्रीचं जेवण आटोपलं, भांडी विसळली, सकाळी भिजवून ठेवलेली मटकी उपसून पंचात बांधून ठेवली आणि चिमूटभर बडीशेप खाऊन त्या पुढच्या खोलीत आल्या. नेहमीच्या सवयीने टीव्ही लावून त्या कोचावर बसून थोड्याशा सैलावल्या. आपले थकलेले पाय ताणून आणि भेगाळलेल्या टाचा एकमेकींवर टाकून चाळशीच्या वरच्या काचेतून टीव्हीकडे निर्विकार चेहर्‍याने त्या पाहू लागल्या. क्षण दोन क्षणांतच त्याचं मन अलगद टीव्हीच्या पडद्यावरून उडालं आणि पुन्हा रवीचा विचार करू लागलं. हा हा म्हणता महिना सरला सुद्धा येतोय असा फोन येऊन. उद्या तो येणार.

सोलेमस्कोगेन (नॉर्वे)

लेखक स्वानंद मारुलकर यांनी रविवार, 28/11/2010 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
ऑस्लोच्या उत्तरेला कोठलीशी एक टेकडी आहे असे माहीत होते. मागे अक्षय तिकडे जायचे म्हणून बसने आणि पायी बराच फिरला होता. पण खराब हवामानामुळे त्याला मधूनच मागे फिरायला लागले होते. एकदा तिकडे जाऊनच येऊ या असे म्हणत आम्ही 'सोलेमस्कोगेन'ला जाणरी ५६ नंबरची बस पकडली. या मार्गावरचा सोलेमस्कोगेन हा सगळ्यात शेवटचा थांबा आहे. इथून बस मागे वळते आणि परत ऑस्लोला जाते. जाताना तुरळक घरे दिसतात. रस्ताही थोडा वळणावळणाचा. सोलेमस्कोगेनला आम्ही बसमधून उतरलो आणि सगळीकडे पसरलेले, कापसासारखे पिंजून ठेवलेले हिम दिसू लागले.

का शब्द मी निघालो खोडून वाचलेला?....

लेखक मयुरेश साने यांनी रविवार, 28/11/2010 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
वाहून काल गेला राहून साचलेला का शब्द मी निघालो खोडून वाचलेला? वारुळ हे जगाचे - नाते जपा विषारी का डंख हा मिळाला आतून डाचलेला काळोख ही विजेचा अंगार होत आहे अंधार ही विजांनी पोळून टाकलेला सारे तुला दिले मी माझी न राहिली तू तो चोरटा निघाला माझाच वाटलेला गाणे कसे म्हणू ती आता कुठे दिसेना प्रत्येक हुन्दक्याला हा कंठ दाटलेला यात्रेत त्या फुलांच्या "गंधाळल्या" दिशा का ? कोमेजल्या फुलाने संदेश धाडलेला मी हासतो सुखाने दुःखात नांदतो मी तो चेहरा सुखाचा मी रोज फाडलेला मयुरेश साने ....दि ०९ ओक्ट-10

अंदमानमधुन सावरकरांचे नाव काढले...

लेखक अवलिया यांनी रविवार, 28/11/2010 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
खरोखर जी गोष्ट स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्या करायला हवी होती ती निदान ६० वर्षांनी का होईना केली आहे. अंदमानमधील माहिती पुस्तकातुन विनायक दामोदर सावरकर हे नाव काढुन टाकले आहे. http://www.esakal.com/esakal/20101126/5636616269938258697.htm ह्याबद्दल आम्ही मायबाप सरकारचे अभिनंदन करतो. यानिमित्ताने आमच्या काही मागण्या आहेत १) याच धर्तीवर अंदमानातील जिथे जिथे सावरकर वगैरे नाव असेल ते काढुन टाकावे २) काही बिनडोक लोक अंदमानला जावुन सावरकर होते त्या खोलीत जावुन उगाच डोळ्यात पाणी वगैरे आणुन देशप्रेमाच्या गुळण्या टाकतात.

भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ही यादी दिली असती तर?

लेखक Bhushan11 यांनी रविवार, 28/11/2010 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ही यादी दिली असती तर? ================================== केतन आणि विनीत शेजारी शेजारी राहत होते. दोघेही लहान असल्यापासून एकत्रच वाढले. दोघेही एकत्रच अभ्यास करायचे, खेळायचे. त्यांच्या आयाही एकमेकांच्या मैत्रिणी होत्या. त्यामुळे त्या दोघीही एकमेकींकडे वरचे वर जायच्या. केतन आणि विनीत हळूहळू मोठे व्हायला लागले. अभ्यासात केतन जात्त्याच हुशार होता. पण हे विनीतच्या आईस कळलं तरी मनाला पटत नव्हतं. दहावीच्या परीक्षेच्या वेळी केतन जरा आजारी पडला. विनीतची आई केतनच्या आईकडे जावून सहानुभूती दाखवायची. विचारपूस करायची. पण घरी आल्यावर का कुणास ठावूक तिला किंचित बर वाटायचं.

अनस्टॉपेबल - नक्की बघा!

लेखक समीरसूर यांनी रविवार, 28/11/2010 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
'ब्रेक के बाद' ची ब्याद संपल्यावर आम्ही तडक अलकाला साडेनऊचा 'अनस्टॉपेबल'चा शो बघायला गेलो. साडेसहाचा 'ब्रेक के बाद' साधारण सव्वानऊपर्यंत संपून पंधरा मिनिटात अलकाला पोहोचून 'अनस्टॉपेबल' कसा गाठणार या विवंचनेत आम्ही 'ब्रेक के बाद' बघण्याआधी होतो; पण 'ब्रेक के बाद' चा जीव फारच छोटा निघाला. आठ वाजून वीस मिनिटांनी 'ब्रेक के बाद' सुदैवाने गतप्राण झाला आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. जेमतेम शंभर मिनिटांच्या 'ब्रेक के बाद'ने आमचा अक्षरशः अंत पाहिला होता. एका छोट्या डासाने मलेरिया गिफ्ट करावा तसा 'ब्रेक के बाद' आम्हाला कंटाळेरिया देऊन गेला होता. बराच वेळ हातात होता.

आरसा :- मिपाच्या प्रगतीचा

लेखक रन्गराव यांनी शनिवार, 27/11/2010 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.alexa.com हे web-stats संपादित करणारे एक अग्रणी संकेतस्थळं आहे. मिपा बद्दल ह्या संकेतस्थळाचं म्हणनं पुढील प्रमाणे आहे. "There are 178,791 sites with a better three-month global Alexa traffic rank than Misalpav.com. Its visitors view an average of 5.2 unique pages per day. The site's content places it in the “समाज” category. This site has a relatively good traffic rank in the cities of Pune (#1,613) and Toronto (#7,189). Visitors to Misalpav.com spend roughly eight minutes per visit to the site and 60 seconds per pageview.

ब्रेक के बाद - एक डोके उठवणारी ब्याद

लेखक समीरसूर यांनी शनिवार, 27/11/2010 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
काल मोठ्या उत्साहाने 'ब्रेक के बाद' हा अत्युच्च दर्जाचा सिनेमा बघण्याचा योग जुळून आला. संध्याकाळी साडेसहाचा 'लक्ष्मीनारायण'चा खेळ होता. दिवसभर थकवा आल्याने थोडा हलका-फुलका चित्रपट बघावा म्हणून आम्ही (म्हणजे मी आणि माझ्या बायकोने) 'ब्रेक के बाद' या सिनेमाची निवड केली. चित्रपटाविषयी काहीच माहिती नसल्याने मल्टीप्लेक्सनामक नोटा खाणार्‍या राक्षसाकडे न जाता आम्ही लक्ष्मीनारायणच्या मॅजेस्टी वर्गाचे तिकीट काढून सिनेमा सुरु होण्याची वाट बघत बसलो. कमी गर्दी, पार्किंगचे पाच रुपये, आणि मॅजेस्टीचे ऐंशी रुपयांचे तिकीट असे खर्चाचे योग्य माप निवडल्यामुळे मी खुशीत होतो.

संगीत नाटक - ०१ - कट्यार का़ळजांत घुसली

लेखक ५० फक्त यांनी शनिवार, 27/11/2010 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
किंचित मंद उजेड, दोन बॆठका, एक तसबिर,मागच्या कोनाड्यात मुरलीधराची मुर्ती आणि कुणाची तरी कुठेतरी जायची तयारी चालु आहे. अरे हि तर उमा, घर सोडायची तयारी करते आहे. हो पण तिच्यावर हे घर सोडायची वेळ का यावी? जाउन विचारावं का? नको ही मोठ्या घरची माणसं आपण आपलं थोडं हातभर अंतर राखुनच रहावं. हे काय दिवाणजी पण आले, म्हणजे नक्की काहीतरी झालंय त्याशिवाय अशा मोठया हुद्द्यावरची माणसं सहजासहजी दिसत नाहीत होत हो. थांबा थोडं इथंच आणि पाहु काय आहे प्रकार तो. काय ! छे छे हे कसं होईल, अशक्य असं कसं झालं.

मन पखरु

लेखक अनिल आपटे यांनी शनिवार, 27/11/2010 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
मी तिला पाहिलं तिने मला पाहिलं दोघांनी एकमेकांना स्मितहास्य दिलं कळलं नाही केव्हा एकमेकात गुंतत गेलो जणू फुलावर फुलपाखरू बसलं आणि पाकळी होऊन गेलं
काव्यरस