Skip to main content

सौंदर्याचा `अर्थ'

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 06/12/2010 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
"छ्या! यंदाच्या "मिस अर्थ'मध्ये काहीच अर्थ नाही! कुठल्याही ब्यूटी कॉंटेस्टमध्ये पहिल्या आलेल्या मुली कशा एसटीत बसून पोटात ढवळल्यावर उलटी दाबल्यासारखे हात तोंडावर ठेवतात....तसे हिनं का नाही ठेवले?'' चि. कुरकुरे सक्काळी सक्काळी टीव्ही बघताना चेष्टेच्या मूडमध्ये होता. ""ईईईई...काय काहितरी घाणेरडं बोलतोस रे?'' कु. किरकिरेनं त्याच्या डोक्‍यात एक टप्पल मारली. ""घाणेरडं काय? दर वेळी तसेच नाही का फोटो येत? पण ही निकोल का कोण, तिनं चक्क संपूर्ण चेहरा दाखवणारे फोटो दिलेत, म्हणून जरा शंका आली, एवढंच!'' ""बरं. कळली हा तुमची अक्कल! आता गप्प बसा.'' कु.

महाराष्ट्र दर्शन - भाग ५/ "अजिंठा"

लेखक स्पा यांनी सोमवार, 06/12/2010 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - http://www.misalpav.com/node/15474 भाग २ - http://www.misalpav.com/node/15500 भाग ३ - http://www.misalpav.com/node/15529 भाग ४ - http://www.misalpav.com/node/15586 आज औरंगाबाद मधला शेवटचा दिवस , सुट्टीचे ४,५ दिवस कसे गेले समजलेच नाही..... भरभरून पाहून घेतलं, महाराष्ट्रात इतकं सौंदर्य असताना लोक लाखो रुपये खर्च करून परदेशात कशाला झंक मारायला जातात देव जाणे, आधी आपलं राज्य बघा , देश बघा, आणि नं

एक प्रश्न

लेखक शिल्पा ब यांनी सोमवार, 06/12/2010 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
बाबासाहेबांच्या धाग्यावरून एक आठवले अन प्रश्न पडला... असे म्हणतात कि आंबेडकरांनी फक्त दहा वर्ष आरक्षण सांगितले होते पण नंतरच्या नेत्यांनी मत मिळवण्याच्या आशेने आत्तापर्यंत तेच चालू ठेवले आहे. आरक्षण म्हणजे आपल्यात काही कमी असेल तर मुख्य प्रवाहामध्ये कमी त्रास व्हावा म्हणून मागितले जाते ते अशी माझी समजूत...उदा. अपंगासाठी वेगळी पार्किंग वगैरे. मग आरक्षणाच्या ऐवजी दलित समान संधीच का मागत नाहीत?

श्रीखंडाचा फन्ना

लेखक हुप्प्या यांनी सोमवार, 06/12/2010 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली मला मूळचे फारसी आणि आता मराठीत रुळलेले शब्द शोधायचा छंद लगला आहे. काही शब्द अगदी बेमालूमपणे (बेमालूम शब्दाप्रमाणेच) मराठी भाषेत सामील (हाही तसाच) झाले आहेत. दोन शब्दांविषयी शंका आहे. श्रीखंड हे अगदी संस्कृतजन्य वाटणारे नाव आहे. पण फारशीत कंद म्हणजे साखर. जसे गुलकंद, कलाकंद वगैरे. आणि शीर म्हणजे दूध (जसे शीरपेडा, शीरकुर्मा). तर श्रीखंड हा शब्द हा शीर+ कंद चा अपभ्रंश आणि मुळात फारसी आहे का? संस्कृतमधे (माझ्या मर्यादित ज्ञानानुसार) श्रीखंडचा तसा काही अर्थ लागत नाही. दुसरा शब्द फन्ना. उदा. फराळाचा फन्ना उडवला/केला. काही वर्षापूर्वी आमिरखानचा फना हा सिनेमा आला होता.

पायर्‍यांची विहीर

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 06/12/2010 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
विहीरीला पायर्‍या असतात. मी लहानपणी पाहिलेली विहीर म्हणजे काळ्यारामाच्या देवळातली. तीला पायर्‍या होत्या .त्याना पायर्‍या का म्हनायचे हा प्रश्नच होता. भिन्तीतून पुढे आलेल्या दगडाच्या टोकाला पायरी म्हणायचे. त्यातून तोल साम्भाळत आम्ही विहीरीत पडलेला चेंडु घ्यायला जायचो. आणि बहुतेक वेळेस ट्रस्टीकाकांच्या शिव्या खायचो. काल इथे अहमदाबादपासून पासून १८ किमी वर असलेल्या अडालज गावात असलेली हीपायर्‍यांची विहीर बघायला गेलो.

डबल क्रंच खर्डी खाखरा..!!

लेखक गवि यांनी सोमवार, 06/12/2010 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता आणि लसूण ..लसूण इथे जरी गड्डाभर दाखवली असली तरी इतकी जास्त नको, नाहीतर झोंबरा व्ह्यायचा पदार्थ. मिरच्यांची संख्या दुस-या दिवशी सुट्टी आहे की हापिसला जायचे आहे त्यावर आणि आपापल्या भौगोलिक पार्श्वभूमीनुसार ठरवून घ्यावी. (सांगली, कोल्हापूर, कोकण, मुंबई, अमेरिका वगैरे लक्षात घेऊन..) शिवाय आपण विकत घेतलेला मिरचीचा प्रकार कोणता (ब्याडगी, लवंगी, भूत झोलकीया..!!) यावरही ही संख्या अवलंबून ठेवावी. "कॉनसीक्वेन्शियल" ड्यामेजेसना प्रस्तुत लेखक जबाबदार नाही.

कोकनातलो जोक ..... ;)

लेखक पियुशा यांनी सोमवार, 06/12/2010 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणात पावसाळा सुरु झाला की शौचास जाण्याचा खुप प्रोब्लेम होतो (खाली चिखल वरुण पाउस ) म्हणून कोकनाताले लोक नारळाच्या झापा पासून एक तात्पुरते शौचालय बनवितात त्यास कुढ्ल म्हणतात. तात्या : मला सांगा बालानु आपला कुढ्ल नदित कुणी ढकलला ? मुले : शपथ तात्या माहित न्हाई हो कुणी ढकलला ? तात्या :- अस्सा ,खरेच बोलता काय ? मुले : खरेच बोल्ताव आम्ही.......... बरे बरे.......

खरंच stupid विचार करते का मी?

लेखक गुंडोपंत यांनी सोमवार, 06/12/2010 06:55 या दिवशी प्रकाशित केले.
ही नैराश्यावर मात करण्याची लढाई कधी संपत नाही. नैराश्याचा विषाणू निरनिराळ्या प्रकारे वेष बदलून हल्ले करत राहतो. त्यासाठी निरनिराळे डावपेच लढवत रहावे लागतात. नैराश्य हा सर्वांनाच ग्रासणारा विषय आहे. पण तरुण वयात हा विषय आलेला दिसला की... माझी एक शेंडेफळ भाची आहे. बी एस सी बायो-टेक्नॉलॉजी करून आता एम सी ए करते आहे. ही मुलगी ठरवले की करणारी आहे, असे मी पाहतो आहे. पण कधी कधी तिला निराश वाटते. नुकत्याच एका परीक्षेनंतर तिने असे विचार प्रकट केले. त्यावर मी तिला उत्तर लिहिले. हे उत्तर लिहिल्यावर मला वाटले की कदाचित यातले काही भाग सगळ्यांनाच उपयोगी पडतील म्हणून ते येथे देतो आहे.