Skip to main content

चोरटा मुरारी - गौळण

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 09/12/2010 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
चोरटा मुरारी - गौळण शिंके हा तोडी, माठ हा फ़ोडी सांगा याला कोणी कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥धृ०॥ शेला पागोटा काठी हातात अवचित येवुनिया घुसतो घरात खिडकी हा तोडी, काचा हा फ़ोडी बांधा याला कोणी कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥१॥ यमुनेचा चोरटा, मथुरा मुरारी पकडाया जाता, होतो फ़रारी चव हा चाखी, ओठ हा माखी टांगा याला कोणी कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥२॥ व्दारकेचा व्दाड, ऐकेना कुणाशी अरविंद मागे लोणी, हरी चरणाशी कमरेशी बांधा, पायाशी टांगा कोंडा याला कोणी कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी...

अमेरीकी उन्मत्तपणा

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 09/12/2010 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय महीला राजदूत मीरा शंकर याना जॅकसन विमानतळावर http://www.rediff.com/news/report/indian-envoy-meera-shankar-patted-dow… ही अशी वागणूक देण्यात आली. गोर्‍या लोकांना भारतीय लोकांबद्दल हा असा आकस का असतो? त्यातून राजदूतसुद्धा सुटत नाहीत. त्या ऑफिसरने जणू साडी नेसलेली महिला कधी पाहिलीच नव्हती का? मात्र अमेरीकन अधिकारी हा मस्तवालपणा अरबांसोबत दाखवत नाहीत.

पुन्हा एकदा काश्मिर खोरे...

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 08/12/2010 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
काश्मिर हा मुद्दा असा आहे की कोणी कितीही वेळा चर्चा करोत मात्र दरवेळी नव्याने चर्चा कराविशी वाटते. सध्या कारण आहे ते म्हणजे "इंडीया आफ्टर गांधी" हे पुस्तक. यातील "A Valley Bloody and Beautiful' हे प्रकरण नुकतेच वाचले. काश्मिर बद्दल अनेक नव्या गोष्टी कळल्या. त्यातील काहि रोचक तुकड्यांचा स्वैर अनुवाद इथे देतो आहे. --------- राजा हरीसिंग सप्टेंबर १९२५ पासून काश्मिरचा महाराजा होता. त्याचा बराचसा वेळ "मुंबई रेसकोर्स" आणि शिकारीस जात असे. त्याच्या चौथ्या बायकोची तर तक्रार होती की तो 'कधीही लोकांच्या संकटाच्यावेळी त्यांच्यासोबत नसतो - त्यांना भेटत नाही.

[जोगवा] : एक वास्तवदर्शन

लेखक पारा यांनी बुधवार, 08/12/2010 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
जोगवाकाही चित्रपट आनंदासाठी, विरंगुळ्यासाठी नसतातच. तुम्हाला ज्ञात-अज्ञात वास्तवाचा प्रत्यय आणून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. समाजात आपल्या आजू बाजूला घडणाऱ्या अनेक घटनांनी, अस्वस्थ करणाऱ्या वास्तवांनी मनात जे प्रश्न निर्माण होतात त्यांची उत्तरं शोधणं जरी एका व्यक्तीला शक्य नसलं तरी अशी व्यक्ती मग चार चौघांत आपलं मत मांडते, शक्य असेल तर मग जोगवा सारखी एखादी कलाकृती निर्माण होते.

यांच्यावर अब्रूनुकसानीचा खटला का करत नाहीत ?

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 08/12/2010 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. स्वामी हे एवढे शिकलेले सवरलेले आहेत तरीही आमच्या एका सगळ्यात ताकद्वान अशा राष्ट्रीय नेत्याची बदनामी करत हिंडत आहेत. यांना नेहरू गांधी ( महात्मा नव्हे) या घराण्यांची बदनामी करताना लाज कशी वाटत नाही ? आणि काँग्रेसचे लोक काय करत आहेत ? ते झोपा काढत आहेत की काय. का हे सर्व खोटे आहे ? आपले मत जरूर नोंदवावे. मला तर यात स्वामींचा काहीतरी कावा दिसतोय. ! आपल्याला हे खरं वाटते का ? मला तर हे सगळे बनावट आहे असे वाटते.

पुतिन बर्‍याचदा मुद्द्याचे बोलतात, आजही बोलले!

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 08/12/2010 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज रशियाचे पंतप्रधान (आणि खरेखुरे "बिग बॉस") असलेल्या पुतिनसाहेबांनी एक उत्तुंग षट्कार मारलेला आहे. वाचा इथे http://m.timesofindia.com/PDATOI/articleshow/7065924.cms (पुतिन यांचे 'दस नंबरी' निवेदन वाचून/ऐकून चिनी नेत्यांनीसुद्धा टाळ्या वाजविल्या असतील.) पुतिन यांनी या आधीही यू-ट्यूबद्वारा असाच २०-२० छाप षट्कार मारला होता. तो दुवा सापडल्यास (नंतर) पाठवून देईन.

मोरपिसे....

लेखक भानस यांनी बुधवार, 08/12/2010 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
सुवासिक फुलांच वेड अगदी लहानपणापासूनच असलं तरीही मी फारच क्वचित कधी गजरा माळला असेल. कधीमधी सोनचाफा किंवा सोनटक्का मात्र घालतसे. बहुतांशी सगळीच सुवासिक फुले पांढर्‍या रंगाशी जवळीक साधून अन स्पर्शातील किंचितश्या तापानेही कोमेजायला लागतील अशीच. ती त्यांच्या आईच्या अंगाखांद्यावरच सुंदर दिसतात. देवाला वाहण्यासाठीही ती मला तोडवत नसत. मायदेशात त्यातूनही मुंबईत या सगळ्या सुवासांना सदैव बहरायला मिळेल असेच तापमान असल्याने माझ्या घराच्या छोट्याश्या बाल्कनीत ही सगळी आनंदाने नांदत, बहरत, सुवास उधळत होती. इथे यायला निघालो तेव्हां माझा सगळा जीव या झाडांमध्ये अडकलेला.

इतिहास

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 08/12/2010 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मिटल्या डोळ्यातली स्वप्न भोळी भाबडी, अगदी साधी. तुझ्या न माझ्या साथीची आयुष्याच्या वाटचालीची.
तु उघड्या डोळ्यांनी साकारतोयस, शिल्पकारान कष्टान लेणी कोरावीत तशी. मी अन तु , अगदी भिन्न माणस. मी अधिर , आवेगी, तु शांत , संयमी. मी स्वप्नाळु, कल्पनेत रमणारी. तु वास्तवाच्या खडकाचा जाणकारी. अन तरीही मला जपतोयस, वास्तवाच्या दाहक उन्हात , सावली होतोयस. एव्हढ्या वेगवान जगात घटकाभर थांबुन मला डोळे मिटुन स्वप्न बघायला संधी द्यायची धडपड करतोस . आयुष्याच्या वाटचालीत खुप खुप पुढ गेल्यावर कधी तरी आपण माग वळु, सगळी वाटचाल डोळे भरुन निरखु, त
काव्यरस

नरकयात्रा

लेखक गणेशा यांनी बुधवार, 08/12/2010 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
सरणावर माझ्या नको ते लोक रडूनी गेले ओले लाकुड त्यामुळेच का पेटूनी गेले जीवंतपणी पाहीलेले स्वार्थी परके आप्तगण मी गेल्यावर माझ्याशी ते नाते सांगूनी गेले आयुष्यभर सिताफ़ीने ज्यांनी पै पै माझी लुटलेली सरणावर ही माझ्या ते अश्रू गहान ठेवूनी गेले जगताना एकटाच लढलो मी स्वता:शी ज्यांनी मारले तेच आज मज खांदा देवूनी गेले चंद्रासही माझ्या कधी ना डाग होता काही नजरेच्या निखार्‍यांनी आगीस ते भडकवूनी गेले संसाराच्या झोळीत होता स्वाभिमान जपलेला कोरड्या आसवांची आज ते भीक घालूनी गेले मिळेल त्या गोष्टीत कायम स्वर्गसुख घेत गेलो स्मशानात आज ते नरकयात्रा दाखवूनी गेले श्वासांसही न दिली अंतरे कधी जीवनात मी हुं