अंधार मिठी
रिमझिम पाण्याच्या संगीतासारखं चाललेलं माझं जीवन असं अचानक अंधारानं मिठी मारल्यासारखं का झालयं? काही कळेनास झालयं..!सुखामगं दु:ख अन् दु:खामागं सुख येतं असं म्हणतात पण ह्या सुखदु:खाच्या अष्टौप्रहर खेळात दु:खाचाच खेळ जास्त वेळ चालतोय्..असं किती दिवस चालणार आहे?
का आज माझी सखी मला सोडून जाणार आहे म्हणून मनाची घालमेल चाललीये. खोलवर रुजलेला दु:खाचा काटा आज परत त्याच दुखण्याची अनुभुती देणार आहे असचं वाटतय आज!दुरावा म्हणू की ताटातूट? हव्या असणार्या व्यक्तींशीच का होते ताटातूट...!दरवेळी विधाता का असे धक्के देत राहिलाय मला.
मिसळपाव