तुझ्यामध्येच रमले होते..
तुझ्या मूळेच फुलले होते...
उमलले तुझ्यामुळे
गंधले तुझ्यामुळे...
कोवळ्या अन मुग्ध या
रेशीम स्पर्शी पाकळ्या
खुलल्या तुझ्यात अन्
उमलल्या तुझ्यामुळे..
गंध भरल्या पाकळ्यांची
ही नजाकत मखमली
टवटवी अन् हा तजेला..
लाभला तुझ्यामुळे ..
बहर सरला... गंध विरला....
झाले मुक्त फुलुनी
उतरली धुंदी नजाकत
वेळ झाली मिटायची
परत बंद....परत मुग्ध....
मिटेन मी तुझ्यामध्ये
गंधमुग्ध, स्पर्शमुक्त
मिटेन मी तुझ्यामध्ये
मिटेन मी तुझ्यामध्ये ......
लेखकअरुंधतीयांनी शनिवार, 01/01/2011 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
''बगड बबं बबं बम लहरी ऽऽ'' कैलाश खेरचा मनमोकळा स्वर कँटीनच्या म्युझिक सिस्टीममधून मदमस्त घुमत होता. चहाच्या पेल्यांच्या तळव्यांनी चिकट झालेल्या टेबलावर ठेवलेल्या काचेच्या पेल्यातील चहामृत प्राशन करत सर्व मित्रमंडळी एकेक लंब्या चवड्या बाता मारण्यात गर्क होती.
''गेल्या शिवरात्रीला आम्ही मित्रांनी भांग-पार्टी केली. काय सॉलिड मजा आली यार.... मी म्हणे व्हरांड्याच्या खांबाला धरून शोलेचे डायलॉग्ज म्हणत बसलो होतो.... मला तर काही आठवत पण नाही यार... हॅ हॅ हॅ!'' आमच्या ग्रुपमधील एकाचा नुकताच झालेला दोस्त सांगत होता. बाकीचे सर्व नग त्याचं बोलणं भक्तिभावाने ऐकत होते. मला नकळत हसू फुटले.
लेखकमयुरेश सानेयांनी शनिवार, 01/01/2011 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
नवे साल गाणे जुने गात आहे....
जुना मी तरीही नवी बात आहे
जुन्या चंद्रम्याची नवी रात आहे
तुझा चंद्र नाही तुझ्या बाहुपाशी
सदा राबता मी हापीसात आहे
काळोख आहे आता ही उद्या ही
जुन्या कंदीलाची नवी वात आहे
किती काळ दु:खात ऐसे रडावे
नवे हासणे अन् जुनी कात आहे
अशी गोड वचने देउ नको ना
नवे राहू दे ! गं- जुने खात आहे
संकल्प लिहिले जुने - ते नव्याने
बोलाची कढी बोलाचाच भात आहे
अरे ट्रेन नाही रवीवार आहे
कडी पकडण्याला पुढे हात आहे
जगावे कशाला कुणाला कळेना
हप्ता विम्याचा तरी जात आहे
मयुरेशला सांगुनीही कळेना
नवे साल गाणे जुने गात आहे.
मयुरेश साने...०१-जानेवारी-११
लेखकजयंत कुलकर्णीयांनी शनिवार, 01/01/2011 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख माझ्या आजोबांना म्हणजे कै. केशव चिंतामण कुलकर्णी यांना अर्पण. यांनी मला शास्त्रीय संगीताची ओळख करून दिली तो दिवस मला आजूनही आठवतो. सवाई गंधर्वला मी त्यांच्या मांडीवर मस्त झोपलो होतो. तेव्हा पं भिमसेन जोशी गात होते. पण मी त्या दिवशी बरेच ऐकले हेही तितकेच खरे. मी मला वाटते चवथीत असेन. माझे आजोबा स्वत: उत्तम पखवाज वाजवायचे. दुर्दैवाने मला न ऐकवताच ते गेले.
उस्ताद अमीरखाँसाहेब !
१७ फेब्रुवारीला या घटनेला बरोबर सदतीस वर्षे पूर्ण होतील.
लेखकश्रावण मोडकयांनी शनिवार, 01/01/2011 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाचे समर्थ लेखक रामदास यांची 'सामना' या वृत्तपत्रात आजपासून लेखमालिका सुरू झाली आहे. हे आहेत अर्थबोधाचे धडे. रामदासांचा हा अर्थबोध 'सामना'च्या वाचकांना श्रीमंत करेल, तसाच तो मिपाकरांनाही लाभदायी ठरावा.
'सामना'च्या फुलोरा या दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या पुरवणीत "पैसा कसा कमवाल" या नावाचे हे सदर आहे. वर दुवा दिला आहेच. तेथे हेडरमध्ये उजवीकडे 'फुलोरा' ही लिंक आहे. तेथे आज रामदासांचे दोन लेख मिळतील. एक प्रास्ताविक स्वरूपाचा आहे. दुसरा थेट त्या विषयात वाचकाला नेणारा.
पुढच्या काळात या धाग्यावर आणखी असे काही लिहिण्याची संधी मिळेल अशी ही लक्षणे आहेत.
लेखकमयुरेश सानेयांनी शनिवार, 01/01/2011 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
तुला पाहून माझा शब्द - तेव्हा लाजला होता
मुका राहुनही मझा - अबोला गाजला होता
तुझा तो स्पर्श चंदेरी - तुझा तो हात पुनवेचा
उन्हाचा हात ही माझा - अचानक भाजला होता
जरी बेताल मी आहे - नव्हे हा कैफ मदिरेचा
तिने सौंदर्य वर्खाचाच - प्याला पाजला होता
तुझा मुखचंद्रमा पाहून- मुखडा गाइला होता
चेहरा रोजचा दु:खी - सुखाने माजला होता
असे स्वप्नात ही व्हावे ? तुला मी फूल देताना
घड्याळातून काटेरी -गजर ही वाजला होता
मला पाहून आताशा - म्हणे हा आरसा मजला
असा मयुरेश नाही पाहिला - जो आजला होता.
मयुरेश साने...दि...२९-डिसेंबर-१०