नव्या वर्षाची हीच जिंगळ.....
अंगळ मंगळ टंगळ चंगळ
शनीवारात येता चम्बळ
फुफाट्यातला फाटका फटाका
मोजून सटका.
चालुनी चालुनी ;चप्पल दमली
घालु जाता अंगठा तुटका
येता ध्वनी फीमेल कानी.
क्यूमेल होऊनी काया फुलते.
हलते डूलते निर्लज्ज लाजते
अंगळ मंगळ टंगळ चंगळ
चेहेरा मात्र अम्मळ अमंगळ
नव्या वर्षाची हीच जिंगळ
घेऊनी सज्ज मद्यमंडळ
खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ
खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ
दादोजींचा दुर्दम्य दंगा ,
औरंगनगरी थेट पंगा
अशोकाची निष्पर्ण छाया
बारामतीत जाई वाया
विलासातले सुशील सारे
नारायणाच्या शीडात वारे.
दंगा घाला पिंगा घाला
हातात हात ..हळू चाला
नव्या वर्षाची हीच जिंगळ
घेऊनी सज्ज मद्यमंडळ
खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ
खॅट्याक खळ्ळ खॅट्य
मिसळपाव
सगळेच मद्य मुळात 'फॅट फ्री' असते. अगदी खरच! पोर्ट वाईन आणि रोझे वाईन सारख्या काही ड्रिंक्स मधे नेग्लीजीबल प्रमाणात ट्रेस फॅट असते. पण अगदी 'आहे काय न नाही काय' असे. मग तरी, सर्व सामान्य समाजाप्रमाणे जी व्यक्ती मद्य पान करतात ती जाड का असतात?
फर्स्ट थिंग्स फर्स्ट: जाडी हा खूप 'unexclusive' विषय आहे. अमुक अमुक माणसंच जाड असतात आणि बाकी नाही असे अजिबात नाही. व्हेजिटेरियन, नोन व्हेजिटेरियन, व्हेगन किंवा इंडियन, अमेरिकन, ओस्त्रेलीयन ई. कुणी पण जाड असू शकत किंवा जाड होऊ शकत.