Skip to main content

काय असते कविता ?

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 13/01/2011 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
अथांग प्रश्नांचा सरोवर म्हणजे आयुष्य मग ..शब्द काय आहेत ? बहुतेक लाटा असाव्यात उसळणार्‍या ..दुसरे काय .. आणि कविता ..? काय असते कविता म्हणजे..? अव्यक्त मनाला व्यक्त करण्याचे साधन..? की मनात काहीच नाही म्हनुन विचार करणारे एक चलन ? काहीच कळत नाही... भावनांना ..विचारांना न्याय देणारी ..कविता ? की आनंदाला दु:खाला सामावणारी ..कविता ? अस असेल तर काय असत मग .. वृत्त ..लय .. मुक्तछंद.. ? मला वाटत आपणच नियम केले आहेत सारे आणि गुरफ़टलोय या नियमात ..या प्रश्नात आयुष्य .. आयुष्य ही असच गुरफ़टलय .. या नियमात का नाही कळल मला.. आयुष्य .. अन आयुष्याची कविता...?

१२३.४

लेखक गवि यांनी गुरुवार, 13/01/2011 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
फ्लाईंग शिकणं हा माझ्या एरव्हीच्या लाईफपेक्षा भलताच जास्त झापडिंग काळ होता.. त्यात मी जाम मजा केली..जाम लोचे केले आणि जाम झगडा केला..भीतीशी, निराशेशी,अभ्यासाशी, आकाशाशी, हवेशी आणि व्हॉट नॉट..!! हवेत उडताना एका एरियाताली सर्व विमानं एकाच फ्रिक्वेन्सीवर बोलत असतात..तरट फाटल्यागत आवाजात घोगरं घोगरं बोलून पायलट कोणावर स्टाईल मारतात कोण जाणे.. पण त्यामुळे होतं काय की सर्वांचं बोलणं सगळेच ऐकत असतात..आणि एकजण बोलायला लागला की त्याने माईक सोडेपर्यंत बाकी सगळ्यांची बोलती बंद.. म्हणून अत्यंत मुद्द्याचं तथा थोडक्यातच बोलायचं असतं.. मोठ्या विमानात पायलट आणि को-पायलट एकमेकांशी टी.पी.

चित्रपटातील रंगसंगती ~~ "अनेक भावनांचे प्रतीक : लाल रंग"

लेखक इन्द्र्राज पवार यांनी गुरुवार, 13/01/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ "चित्रपटातील तानापिहिनिपाजा..." या पहिल्या भागाला प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे (आणि तसेच तो वाचणार्‍यांचे, व खरडीतून तसे आवर्जुन कळविणार्‍यांचे) मनःपूर्वक आभार. आज इथे दुसरा भाग प्रकाशित करताना थेट "रंग...त्यांचे संकेत आणि चित्रपटात दिग्दर्शकाने कोणत्या भावनेने त्या रंगाचे केलेले प्रयोजन' यावर भर दिला आहे. विषयाची व्याप्ती मोठी आणि 'कला दिग्दर्शका'च्या नजरेतूनही ती एक महत्वाची बाब असल्याने काहीशी तांत्रिक महत्तेचीही आहे.

त्री स्तरीय

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 13/01/2011 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
धकधकत्या र्‍हदयाने किंवा धपापत्या उराने त्या बालेने प्रवेश केला. तारुण्याच्या तृष्णेने तरारलेल्या नजरेने सभोवतालच्या तरुणांनी तीला तस्मात तिष्ठयामी म्हणत तेरा तोफांची सलामी द्यावी त्या प्रमाणे नजरेनेच तहे दिलसे तृप्तीची पावती दिली. तिच्या एका नजरेने तरून जावे तरुतल निवास करण्याची त्यांची तयारी होती. लाखो दिलांच्या पायघड्यांवरून ती नाजूक पदन्यास करीत त्या आसनावर स्थापन झाली. ज्याला ती धुडकावेल त्यालासुद्धा ती त्याच्याशी बोलली याचे समाधान लाभायचे . तीच्या तीव्र स्वरात देखील त्याला तेजस्वी पंचमाचा भास व्हायचा त्या मदालसेच्या मैत्रीसाठी हपापलेले ते तरून तीचा शब्द हुकूम म्हणून झेलायला तयार हो

मौका सभी को मिलता है

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 13/01/2011 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
मनसे आमदाराल झालेल्या मारहाणी बद्दल औरंगाबाद येथे झालेल्या सभेत राज ठाकरे जे बोलले ते मटा ने कव्हर केलय. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7270300.cms यात राष्ट्रवादीच्य नेत्यांवर त्यानी केलेली टीका ही मुद्देसूद आहे. भाषा एकदम फटाकेबाज आहे. जनतेच्या भावनाना हाक घालणारी आहे. अर्थात राष्ट्रवादीच्या तथाकथीत नेत्याना यामुळे काही फरक पडणार नाही. पण राज च्या लोकप्रियतेत बरीच वाढ होईल.

मी पण एक कविता करणार आहे ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 13/01/2011 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
थांबा मित्रानो ..!! थोडेसे क्षणभर थांबा दम घेउद्या मला सूर जराशे लावूद्या अन बघा मी काय करतोय ते मित्रानो..!
काव्यरस

केवढे हे क्रौर्य! - ना वा टिळक

लेखक शुचि यांनी गुरुवार, 13/01/2011 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
ना वा टिळक यांची अतिशय सुंदर आणि कारुण्यरसाने ओतप्रोत भरलेली रचना म्हणजे "केवढे हे क्रौर्य!". ही कविता वाचून , डोळ्यात पाणी न आलेला माणूस विरळाच. ही कविता खूप चटका लावते. माझ्या आवडत्या कवितांपैकी ही एक कविता आहे. अतिशय चित्रमय वर्णन असलेल्या या कवितेच्या पहील्या कडव्यात कवीने एका जखमी पक्षीणीच्या वेदनामय आणि करुण शारीरीक स्थितीची वर्णन रेखाटले आहे. ही पक्षीण बाणाने विद्ध झाल्याने तिच्या कोमल शरीरातून भळभळा रक्त वहात आहे. अतिरक्तस्त्रावामुळे तिला वारंवार ग्लानी येत आहे आणि तरीही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर ही पक्षीण आपले घरटे शोधीत उडत आहे.

सबला

लेखक कवितानागेश यांनी बुधवार, 12/01/2011 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
सबला 'स्त्री आणी तिची मुक्ती' अशा विषयावर सध्या चाललेल्या चर्चा वाचून मला राहून राहून एकाच स्त्रीची आठवण होत रहातेय. माझी आजी. मी तिच्याकडून कळतनकळत खूप शिकले. हे व्यक्तीचित्र मी आदर्श म्हणून अजिबात लिहीत नाहीये. कारण कुणीच कुणासाठी 'आदर्श' असू शकते असे मला वाटत नाही. पण तरी तिच्याकडे बघताबघ्ता मला माझ्या आतल्याच खूप गोष्टी 'सापडल्या'. तिचा 'स्त्रीमुक्ती' या शब्दाला कायम विरोध होता, कारण मुक्ती म्हणजे 'डायरेक्ट मोक्ष' हाच इतकाच अर्थ तिला पटायाचा.