Skip to main content

मदत हवी आहे पुण्यात राहण्याविषयी

लेखक चिप्लुन्कर यांनी बुधवार, 12/01/2011 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
माझे ऑफिसमधील एक सिनिअर सध्या पुण्यात नव्या कंपनीत १० फेब्रु. पासून रुजू होणार आहेत. त्यांची कंपनी येरवड्यात असून त्याच्या जवळ कोठे मराठी बहुल भागात कुटुंबासह राहण्यास जागेची सोय हवी आहे. पुण्यातील मिसळपाव प्रेमी मदत करतील अशी आशा आहे.

'पाकनिष्ठ' कांदा, लुडबूडतो कशाला?

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 12/01/2011 06:36 या दिवशी प्रकाशित केले.
'पाकनिष्ठ' कांदा, लुडबूडतो कशाला? भाजून पीक सारे, पाऊस तृप्त झाला उध्वस्त शेत आधी, मागून थेंब आला कांदा पुसे रडूनी, कांद्यास अक्कलेच्या तो ’पाकनिष्ठ’ कांदा, लुडबूडतो कशाला? चेचून वेदनांना, पायात गाडले; पण स्वप्नात भूत त्यांचे, रेंगाळती उशाला दचकून जाग येते, निद्रा लयास जाते ते घाव प्राक्तनाचे, छळती क्षणाक्षणाला सोडून भूतळाला, ती दैत्य जात गेली देऊन दान वृत्ती, या सभ्य माणसाला ना झाकते कधी ती, वस्त्रात अंग सारे मिळणार भाव कैसा, शेतीत कापसाला? समजून घे "अभय" तू नाहीत भ्याड सारे निपजेल शूर येथे, विश्वास दे उद्याला गंगाधर मुटे .............

मंदिरे @ बलसाणे.

लेखक हेम यांनी मंगळवार, 11/01/2011 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचा भाग इथे वाचा. ...भामेरकडे वळतांनाच 'बलसाणे २५किमी' ची पाटी बघितल्यावरच डोक्यात ट्युब पेटली होती की, प्राचिन मंदिराचा ठेवा असलेलं धुळे जिल्ह्यांतलं ते हेच गांव, पण आत्तापर्यंत कुठेही वाचनात हे नव्हतं की भामेरपासून बलसाणे इतक्या जवळ आहे. पोटपूजा आटोपून बलसाण्याकडे जाण्याबाबत सगळ्यांचं एकमत झालं होतं. साक्री- नंदुरबार मार्गावर बलसाण्याचा फाटा लागतो. फाट्यापासून ३-४ किमी. आत गांव आहे. मंदिराची चौकशी केल्यावर सगळे जैन मंदिराची माहिती सांगत होते, त्यांवरून जैन मंदिराचे या गांवात बर्‍यापैकी प्रस्थ असल्याचे जाणवत होते.

तडपत रैना दिन..

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 11/01/2011 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
तडपत रैना दिन.. (येथे ऐका) पं अजय चक्रवर्ती. पतियाळा गायकीचे एक दिग्गज कलाकार. 'दादाजी' बडे गुलामअलींचा वारसा समर्थपणे पुढे चालवणारे..! सदरचा दुवा त्यांच्या एका जमलेल्या मैफलीचा आहे. राग सुरू आहे मारुबिहाग.. राग मारुबिहाग. आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातला एक वेगळीच गोडी, एक वेगळीच खुमारी असलेला शृंगाररसप्रधान राग. परंतु हा शृंगार आमच्या नंद, हमीर सारखा कॉलेज गोईंग नाही बरं का मंडळी. त्या मानाने हा जरा मॅच्युअर शृंगार आहे.

वडिलांचे मुलीस पत्र

लेखक कच्चा पापड पक्का पापड यांनी मंगळवार, 11/01/2011 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मुली, सगळ्या घरांना दार असतात, पण सगळीच नसतात मायेची कोठार हे शिकाशिलच तू कधी ना कधी. मात्र हे ही लक्षात ठेव की प्रत्येक उन्हात असते एक तरी शीतल सावली अन प्रत्येक काट्यावर एखाद कोमल फूल जीवघेण्या दरया असतात तसेच असतात झूलते पूल दुष्ट माणसंच्या मनातही असते दडलेले कोवळे मूल मला माहित आहे सगळ्या गोष्टी शिकवल्यात आईने तुला जमेल तेवढ पहात रहा उघड्या डोळ्यानी जग जगायचा प्रयत्न कर चौकाटी वाचून पण लक्षात ठेव पक्ष्यानाही कस वाटत घरात अधारल म्हणून तारुण्याची चव राखताना जागी राहू देत तुझ्या मनात प्रेमळ आईची ऊब. आणि वाटू दे घरादाराला तुझा आधार कृष्णांन उचललेल्या गोवर्धनाखाली उभ र

मस्त थंडी घट्ट बर्फाळलेली ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 11/01/2011 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
कशी मस्त थंडी घट्ट बर्फाळलेली पहाटे पहाटे धुक्यात कालवलेली घरांचे फक्त आकार दिसत असतात भुतासारखे भुताचे कान डोळे तुटके हात अर्धवट ..कसेबसे तसे घरांचे अवशेष भासत असतात धुक्यात हरवलेले स्वप्नात हरवून जातात पाखरांचे थवे पाखरांचे आवाज थिजून जातात घट्ट मिटून बसतात झाडापानात मन त्यांचे कावरे बावरे .. झाडे स्वतातच मग्न ध्यान लावून बसतात काही झाडे ओकीबोकी पाने झडून टक्क बावरतात कोणीतरी दूरवरून कवडसा पाडावा तसा सूर्याचा गर्भ कोवळा प्रकाश गुदगुल्या करीत अंगावर उगाचच कुरवाळीत राहतो थंडीच्या जाणीवेचा उगाचच वाढत जातो अहंकार शेकोट्या पेटल्या जातात पेटवल्या जातात ह
काव्यरस

मदत हवी आहे.

लेखक चिप्लुन्कर यांनी मंगळवार, 11/01/2011 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
मी सध्या लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टम वर काम करू इच्छित आहे. त्या संदर्भात माझे ज्ञान शून्य आहे. त्या संदर्भातील शिक्षण मला ठाणे किंवा डोंबिवली मध्ये कोठे मिळू शकते? आणि साधारण त्यात खर्च , वेळ किती लागेल व कोणता नवा कोर्स आला आहे याची माहिती हवी आहे. आपला चिपळूणकर.

मासे १९) खुबे

लेखक जागु यांनी मंगळवार, 11/01/2011 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
खुबे हे खाडीच्या दलदलीत (चिखलात) सापडतात. खुबे पकडण्यासाठी खुबे पकडणारी माणस लाकडी फळी घेउन चिखलात उतरतात. फळीवर गुडगे ठेउन फळीचा आधार घेउन हे खुबे गोळा केले जातात. ह्या खुब्यांची शिंपली सारखी पांढरी शिंपली आपल्याला समुद्र किनारी सापडतात. कदाचीत ते समुद्रातील खुबे असतील. त्याच्या बाहुल्या, तोरणे बाजारात मिळतात. दलदलीच्या ह्या टाकलेल्या शिंपल्यांना आम्ही लहानपणी भातुकलीच्या खेळात चुल करण्यासाठी घ्यायचो. तसेच भांड म्हणूनही खेळ करायचो. तिन शिंपल्या तिन टोकांना एकत्र लावुन ह्याची चुल करायची व वरती एक शिंपलि भांड म्हणून ठेवायची.