Skip to main content
लेखक निवेदिता-ताई यांनी बुधवार, 20/10/2010 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:- एक वाटी काजू, साखर अर्धी वाटी, साय एक चमचा,पाकासाठी पाणी दोन चमचे. कॄती:- प्रथम काजूची पूड करुन घ्या.त्याला साय लावा, साखरेमधे पाणी घालून दोन तारी पाक तयार करा. त्यात काजूची पूड घालून चांगले घोटत रहा, लगेच गोळा तयार होतो, तो गोळा पसरुन एकाच दिशेने लाटा. व लगेच वड्या पाडा. मस्त काजू कतली तय्यार. पटकन खाउन टाकावी.
From

वाचने 8726
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

ए दुकानात जाउन नाही आणली ..मि स्वता: बनवलीय...नवरात्रात देवीच्या नेवैद्याला बनवली होती.

रेशिपी??? रेशिपी??? रेशिपी??? रेशिपी??? रेशिपी??? रेशिपी??? रेशिपी??? रेशिपी??? रेशिपी??? रेशिपी??? रेशिपी??? रेशिपी??? रेशिपी??? रेशिपी??? रेशिपी??? रेशिपी??? कुठेय ताई ;-)

मी एका दिवसात अर्धा किलो काजु कतली खाल्लेली आहे बर्‍याच वेळा. :) गुलाबजाम (एका वेळी ५२ चे रेकॉर्ड आहे) नंतर कुणाचा नंबर असेल तर तो काजुकतलीचाच :)

In reply to by मराठमोळा

मी एकावेळी ४३ खाल्ले होते. (हॉस्टेलवर फिस्ट मधे)... नंतर महीनाभर नुसते दिसले तरी कसंतरी व्हायचं..

In reply to by गणपा

आद्य आचारीगुरूंनी आळवलेल्या अनुप्रासामुळे अक्षि अश्रू अवतरले!

सध्या वारण्याचा मूड नाही.. तर हादडायचा मूड आहे.. चला घरी काजु-कतली बनवायला मुहुर्त शोधतो.. - (काजू कत्तलकार) पिंगू

ए निवेदिता ताई, मी केली बरं का काजू कतली एकदम सक्सेसफुल्ली. माझ्या नवर्यानी आणि सासर्यांनी अगदी फडशा पाडला. मी पहिल्यांदा काहि रेसिपी वगैरे वाचुन ट्राय केली आणि ती पण इतकी मस्तं! थँक्यु थँक्यु थँक्यु थँक्यु थँक्यु थँक्यु थँक्यु थँक्यु सो मच!!!