Skip to main content

नाती

लेखक अभिसरिका यांनी शुक्रवार, 14/01/2011 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
नाती नाती नाती नाती........... जुळ्लेली, जोडलेली, लादलेली...... खरच हवी असतात का आपल्याला ही नाती ? वाटत', बरेच वेळा आपल्याला ग्रुहितच धरतात ही नाती....! नाती....काही प्रेमाची, काही मैत्रीची, काही कर्तव्याचीही, दमछाकच होते मात्र निभावताना ही नाती...! नाही तोडून टाकता येत त्याच्यापासून आपल्याला..... मग वह
काव्यरस

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 14/01/2011 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना २०११ मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त्त आमच्याकडे आमच्या सॉ. नि आज बाजरीच्या भाकरी व भाजी असा बेत केला होता. आपल्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी / जळजळ होण्यासाठी खाली काही फोटो देत आहे. पहिला फोटो बाजरीची भाकरी व लोणि आणि या फोटोत त्याबरोबर भाजी पण आहे, असो संक्रांतीचं स्पेशल स्लोगन काय तर - तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आणि त्याची पण सोय केलेली आहे.

मन माझं गोगलगाय !

लेखक मितान यांनी शुक्रवार, 14/01/2011 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
मन माझं गोगलगाय खुट्टं वाजता शंखात जाय प्राजक्ताचा दरवळ घेऊन रांगत पहाटवारा आला शिंका येतील ! आल्या शिंका !! नाक हाती शंखात पाय ! मन माझं गोगलगाय । खुट्टं होताच शंखात जाय खुणावताना हिरव्या वाटा मनास दिसतो केवळ काटा काटा टोचेल ! टोचला काटा !! मान फिरवून शंखात जाय मन माझं गोगलगाय । खुट्टं होताच शंखात जाय समोर फुटती लाट अनावर सरसरून ये नभ धरणीवर थेंब उडतिल ! कपडे भिजतिल भिजेल डोकं !

आम्ही कविता करतो

लेखक असुर यांनी शुक्रवार, 14/01/2011 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली सरळ काही सुचत नाही एक वाक्य धड लिहीता येत नाही पण व्याकरणावर रण माजवतो सध्या आम्ही कविता करतो चार ओळी इकडून उचलून चार ओळी तिकडून उचलून तरीही वामनाचे आम्हीच वारस आम्हीदेखील कविता करतो कुणी वाचो, अथवा न वाचो कुणी निंदो, कुणी वंदो घंटा कुणाला फरक पडतो म्हणूनच आम्ही कविता करतो मदत, कौल, काथ्याकुटाचा आता जरी का कंटाळा आला वाचनीय तरी हल्ली कोण वाचतो त्यासाठीच तर आम्ही कविता करतो कुणा काही बोलणे त्याज्य, कुणा काही सांगणे त्याज्य बोर्डावरच्या खेळातही आपल्यावरच राज्य 'हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा' समजतो बोर्ड भरवण्यासाठी आम्ही कविता करतो कवितेच्या खेळात या लेख जगती, लेख मरती चांगल्या
काव्यरस

[ज्योतिष] दिलगीरी

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 14/01/2011 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अमावस्येवरील लेखात अनवधानाने अमावस्या सायन मिथुन राशीत आहे असा उल्लेख झाला आहे. कट न पेस्ट केलेला मजकूर नजरचूकीने पूर्ण संपादित झाला नाही. त्याबद्दल दिलगीर आहे. कुंभ रास बरोबर आहे. मिपा च्या नवीन अवतारात लेख संपादित कसा करायचा हे माहित नसल्याने ती चूक दूरूस्त करता आली नाही. त्याबद्दल क्षमस्व!

आपले काय मत ?

लेखक रोमना यांनी शुक्रवार, 14/01/2011 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्ते मिपाकरांनो, सर्वप्रथम मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. साधारण १० ते १२ वर्षापासून काही धार्मिक साधना सुरु केली. नंतर मांसाहाराचे आकर्षण वाटेनासे झाले, पुढे कितीहि जन्म आले तरी मांस खायचे नाही हा निर्धार केला. म्हणून दिले सोडून. हे माहित असतानही कि मांसाहारातून सर्वात जास्त शक्ती, प्रथिने वगैरे मिळतात (घरचे सर्व मांसाहारी पण वार सण पाळून आहेत). परंतु आपण प्राण्याला मारुन खावे हे काही मनाला पटत नव्हते. यानिमित्ताने काही कट्टर मासभक्षक नातेवाईकांचा मी मांसाहाराकडे पुन्हा वळावे म्हणून प्रयत्न सुरु झाला.

[ज्योतिष] दिनांक ३ फेब्रुअरी २०११ रोजीची अपघातदर्शक अमावस्या

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 14/01/2011 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ३ फेब्रुअरी २०११ रोजी सायन मिथुन राशीत १३ अंश ५१ मि वर अमावस्येची चंद्र-सूर्य युती होत असून ही अमावस्या मंगळाशी युती करते. मंगळ हर्षल बरोबर अर्धकेंद्र योग करत असल्याने अमावस्या प्रामुख्याने अपघातदर्शक बनली आहे. ज्या जन्म दिनांकाना ही अमावस्या विशेष त्रास देउ शकते त्या जन्म तारखांचे गणित करून पुढे दिल्या आहेत.

आमंत्रण सहलीचं

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 14/01/2011 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मिपावर आल्यानंतर काही दिवसातच माझ्या भुलेश्वरच्या सहलीचा व्रुतांत इथे टाकला होता, त्यावर ब-याच प्रतिसाद्कांनी या ठिकाणी जाण्यांत इंटरेस्ट दाखवला होता. काही मिपाकरां बरोबर खव मधुन चर्चा झाली होती, आज श्री. गणेशा बरोबर बोलुन १६.०१. २०११ रविवार रोजी सकाळी भुलेश्वरला जायचं ठरलं आहे. काही मिपाकरांना खव व व्यनितुन कळवलं आहे, तरी ही नविन मित्र मॅत्रिणि जोडायची हॉस भारी म्हणुन खुलं आमंत्रण देतो आहे. साधारण प्लॅन असा आहे, १६.०१.२०११ ला सकाळी पुण्यातुन १०च्या सुमारास निघुन भुलेश्वर येथे जाणे , अर्थात जाताना वाटेत काहीतरी खाणं होईलच.

लखोबा लोखंडे हरपले!!!

लेखक निखिल देशपांडे यांनी गुरुवार, 13/01/2011 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांचे निधन झाल्याची बातमी आताच टीव्हीवर पाहिली. त्यांची नाटकं प्रत्यक्ष पाहायचा अनुभव नसला तरी दूरचित्रवाणीच्या सौजन्याने 'तो मी नव्हेच' , 'अश्रूंची झाली फुले' ही नाटके पाहल्याचे आठवते.त्यांच्या लखोबा लोखंडे बद्दल म्या पामराने काय बोलावे?? तीच त्यांची ओळख ठरून गेली होती.